Monthly Archives: July 2019

कला अकादमी जपूया

गोव्याची शान असलेली गोवा कला अकादमीची वास्तू जर्जर झाली असून एक तर तिची संपूर्ण डागडुजी करावी लागेल, किंवा सध्याचे संकुल पाडून पूर्णतः नवीन इमारत उभारावी लागेल ही वार्ता प्रत्येक गोमंतकीयाच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे. सध्याची इमारत पाडावी लागेल असे आपण कधी म्हटले नसल्याचे स्पष्टीकरण कला व संस्कृतीमंत्र्यांनी राज्य विधानसभेत दिले असले, तरी येत्या महिन्यात पुढील तीन – चार महिन्यांसाठी तरी ... Read More »

दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार!

ऍड. प्रदीप उमप भारताने दहशतवादाबाबत ‘झीरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, दहशतवाद्यांची सर्व मार्गांनी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एनआयएला ताकद देणार्‍या विधेयकानंतर सरकारने दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करणारा कायदा अस्तित्वात आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. या बाबतीत विरोधी पक्षांचीही सरकारला साथ आहे, ही आनंददायी गोष्ट आहे. दहशतवाद ही आपल्या देशासमोरील मोठी समस्या आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांची व्याख्या मात्र बडे देश आपापल्या ... Read More »

डंप खनिजाचा २२ ऑगस्टपासून ई-लिलाव

>> मार्च २०१८ नंतर नोकरी गेलेल्या खाण कामगारांना मासिक ५ हजार रु. पॅकेज राज्यातील खाण बंदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्च २०१८ च्या खाण बंदीनंतर खाण कंपन्यांनी कामावरून कमी केलेल्या खाण कामगारांना मासिक ५ हजार रुपये एक रकमी आर्थिक सहाय्य करण्यावर विचार केला जात आहे. ५ दशलक्ष टन खनिजाचा ई – लिलाव २२ ... Read More »

कॅफे कॉफी डे चे मालक बेपत्ता झाल्याने खळबळ

भाजप नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई तथा कॅफे कॉफी डे या प्रसिद्ध कंपनीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ हे मंगळुरू येथे जाण्यास निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. या वृत्तानंतर प्रशासकीय यंत्रणांनी सिद्धार्थ यांच्या शोधाची मोहीम सुरू केली. एनडीआरएफ, तटरक्षक दल, किनारी पोलीस या यंत्रणांना या कामाला जुंपण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार सिद्धार्थ यांना ... Read More »

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेतही मंजूर

अखेर तिहेरी तलाक विधेयक काल राज्यसभेत संमत झाले. लोकसभेत हे विधेयक तीन वेळा संमत झाले होते. मात्र राज्यसभेत सत्ताधारी एनडीएला बहुमत नसल्याने तेथे त्याला मंजुरी मिळणे शक्य होत नव्हते. तथापि काल हे विधेयक मतदानास आले त्यावेळी विविध राजकीय पक्षांचे खासदार अनुपस्थित राहिल्याने राज्यसभेचे संख्याबळ तसेच बहुमतासाठीचे संख्याबळ घटले. परिणामी विधेयक ९९ वि. ८४ अशा फरकाने संमत झाले. दरम्यान, विरोधकांनी विधेयकावरील ... Read More »

गणेश चतुर्थीपूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविणार

राज्यातील बारा तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल विधानसभेत दिली. आमदारांनी राज्यातील विविध भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील खड्‌ड्याबाबत चिंता व्यक्त केली होती. रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे दुचाकी वाहन चालकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे नागरिकांचे हकनाक बळी जात आहेत. तसेच अनेक नागरिक अपघातात गंभीर जखमी होत ... Read More »

साबांखात कंत्राटी कर्मचारी नियुक्तीवर बंदी घालणार

सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नियुक्तीवर बंदी घातली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत आमदार सुभाष शिरोडकर यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना काल दिली. सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटी पद्धतीवर घेण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेवर पगार मिळत नाही. कंत्राटदाराच्या मार्ङ्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विविध कारणांमुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पगार मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांना पीडब्लूडी कर्मचारी सोसायटीमध्ये ... Read More »

रवींचा अस्त

>> आयसीसी एलिट पंच पथकातून डच्चू आयसीसी पंचांच्या एलिट पथकातील भारताचे एकमेव प्रतिनिधी असलेले पंच सुंदरम रवी यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी इंग्लंडच्या मायकल गॉफ यांचा समावेश करण्यात आला आहे. निवृत्ती स्वीकारलेले पंच इयान गौल्ड यांची जागा विंडीजच्या जोएल विल्सन यांनी घेतली आहे. यापूर्वी आयसीसी आंतरराष्ट्रीय पथकात असलेल्या गॉफ व विल्सन यांना पंच निवड समितीने पदोन्नती दिली. या ... Read More »

वेणुगोपाळ राव निवृत्त

भारताचा माजी फलंदाज व आंध्र प्रदेशचा कर्णधार वेणुगोपाळ राव याने काल मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताकडून १६ एकदिवसीय सामने तसेच ६५ आयपीएल सामने खेळलेल्या वाय. वेणुगोपाळ राव याने निवृत्ती जाहीर केल्याचे आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेने पत्रक जारी करत सांगितले. विशाखापट्टणमच्या ३७ वर्षीय वेणुगोपाळला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या संधीचा अपेक्षित लाभ उठवता आला नाही. ११ डावात एका अर्धशतकासह केवळ ... Read More »

सौरभ वर्माचा मुख्य स्पर्धेत प्रवेश

भारताच्या सौरभ वर्मा याने पात्रता फेरीतील दोन्ही सामने जिंकून थायलंड ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर ‘सुपर ५००’ स्पर्धेच्या मुख्य फेरीत काल स्थान मिळविले. सौरभने आपल्या पहिल्या सामन्यात यजमान देशाच्या कांतावत लीलावेचाबुतर याचा ५३ मिनिटे चाललेल्या संघर्षपूर्ण लढतीत २१-१८, २१-१९ असा पाडाव केला. तर दुसर्‍या लढतीत चीनच्या झोव झे की याचा १ तास ३ मिनिटे चालेल्या सामन्यात ११-२१, २१-१४, २१-१८ असा पाडाव ... Read More »