Monthly Archives: June 2019

त्वचा विकार भाग – १

– डॉ. स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) त्वचा विकारांबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी आपल्याला काही मुलभूत गोष्टी त्वचेच्या बाबतीत समजून घेणे फार आवश्यक आहे. त्यात प्रथम आयुर्वेदानुसार त्वचा म्हणजे काय? ती कशी उत्पन्न होते? त्याचे कार्य व उपयोग काय? तसेच अर्वाचीन मतानुसार त्वचा म्हणजे काय?… ह्या सर्व गोष्टी आपल्याला अवगत असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचाविकार ह्या लेखमालेची सुरुवात आपण ह्या लेखापासून ... Read More »

निरुत्साही राहुल

गेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाच्या धक्क्यातून राहुल गांधी अद्याप बाहेर पडलेले दिसत नाहीत. निवडणूक झाल्यापासून त्यांना एवढी विरक्ती आलेली दिसते आहे की, त्यांनी सर्व भगतगणांची विनंती धुडकावून आपले पक्षाध्यक्षपद सोडून तर दिले आहेच, परंतु संसदेमधील त्यांचे एकूण वर्तनही त्यांना राजकारणात आता रस उरला नसल्याचे दर्शविते आहे. एखाद्या मुलाने आपण आपले बालपण गमावले असल्याची खंत करावी, तसे एकंदर राहुल यांचे वर्तन ... Read More »

‘एक देश एक निवडणूक’ कितपत शक्य?

ल. त्र्यं. जोशी एकाच वेळी निवडणुका घेण्याचा मुद्दा तर्काच्या आधारावर कितीही आकर्षक वाटत असला तरी तो व्यवहार्य मात्र अजिबातच नाही. त्यामुळे त्यावरील चर्चेत किती उर्जा व वेळ खर्च करायचा याचा सर्वांनाच विचार करावा लागणार आहे. मोदी सरकारने आपल्या दुसर्‍या कार्यकालाचा शुभारंभ करताना ‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पनेचा पाठपुरावा सुरू केला असला व ‘मोदी है तो मुमकीन है’ या लोकप्रिय ... Read More »

गैरव्यवहार चौकशीला असहकार्य करणार्‍यांवर कारवाई

>> बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचा इशारा >> २५ ते ३० विकासकामांची चौकशी गतिमान सार्वजनिक बांधकाम खात्यातील २५ ते ३० विकास कामांतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आणखीन कालावधीची आवश्यकता आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सहकार्य न करणार्‍या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी काल दिला. सार्वजनिक बांधकाम खात्यातील मागील दोन ते तीन वर्षांतील रस्ता, पाणीपुरवठा, जायका, मलनिस्सारण विभागातील काही विकास ... Read More »

रामकथेदरम्यान मंडप कोसळून राजस्थानमध्ये १४ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील बाडमेर येथे रामकथेचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आलेल्या वादळी वार्‍यासह पावसामुळे मंडप कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तर ४५ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा मंडपात बसलेले अनेकजण दबले गेले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मंडपातील काही भागात विद्युत प्रवाह देखील उतरला होता. तर मंडप अंगावर कोसळल्याने घटनास्थळी ... Read More »

इराणचा अमेरिकेला इशारा

आखातात वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे. येथे सुरू झालेला संघर्ष कधीही नियंत्रणाबाहेर जाऊन अमेरिकेच्या सैनिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात असा इशारा इराणने दिला आहे. इस्लामिक रिपब्लिकवर आणखी निर्बंध लादण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणच्या सैन्यातील एका वरिष्ठ कमांडरने काल हा इशारा दिला. Read More »

अनाथ, निराधारांना गोमेकॉत चांगली सेवा देणार : विश्‍वजित

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणार्‍या अनाथ, निराधार व दारिद्य्र रेषेखालील लोकांना चांगली सेवा मिळावी यासाठी गोमेकॉने पावले उचलली असून ह्या कामासाठी ‘स्ट्रीट प्रोव्हिडन्स’ ह्या बिगर सरकारी संघटनेशी हातमिळवणी केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली. गोमेकॉत रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी तसेच तपासणीसाठी येत असतात. मात्र, उपचारासाठी येणार्‍या रुग्णांपैकी अनाथ, निराधार असे जे लोक असतात ते मुळातच कुपोषित ... Read More »

राज्यात आतापर्यंत ५०% पाऊस कमी

राज्यात मान्सून कमकुवत बनला आहे, असे हवामान विभागाने कळविले आहे. आतापर्यंत केवळ १२ इंच पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ही तफावत सुमारे ५० टक्के आहे. मागील चोवीस तासात पेडणे येथे १.१३ इंच पावसाची नोंद झाली. तर दाबोळी आणि मुरगाव येथे अर्धा इंच पावसाची नोंद झाली असून अन्य ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झालेली नाही. राज्यात गेल्या २० जून रोजी ... Read More »

उघड्यावरील शौचमुक्ती; नवीन डेडलाइन ३१ जुलै

गोव्याला उघड्यावरील शौचमुक्त करण्यासाठी (ओडीएफ) आता ३१ जुलै २०१९ ही नवीन डेडलाइन निश्‍चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उघड्यावरील शौचमुक्त योजनेचा नुकताच आढावा घेतला. वरील योजनेंतर्गत ज्या नागरिकांनी जैव टॉयलेटसाठी अर्ज केले आहेत, त्यांना ३१ जुलै पूर्वी ते उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. बायो टॉयलेट पुरविण्यासाठी पाच ठेकेदारांची निवड करण्यात आली आहे. सरकारने केलेल्या आवाहनानुसार बायो ... Read More »

भाजप प्रदेशाध्यक्षपदास तिघे इच्छुक

दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी कृषी व क्रीडामंत्री रमेश तवडकर हे प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी इच्छुक असून ह्या पदासाठी फातोर्डा मतदारसंघाचे माजी आमदार दामू नाईक यांचेही नाव चर्चेत आहे. दरम्यान, माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्यात विळ्या भोपळ्याचे सख्य असून रमेश तवडकर यांनी नरेंद्र सावईकर यांना अध्यक्षपद देण्यास कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ... Read More »