ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: June 2019

कचरा न स्वीकारल्यास मैलावाहू टँकर रोखू

>> मनपाचा सरकारला इशारा >> साळगावला कचरा अडविल्याने महापौर आक्रमक साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात पणजी महानगर पालिकेचा एक ट्रक ओला कचरा स्वीकारण्यास सोमवारपासून नकार दिल्याने कचरा विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली आहे. सदर कचरा प्रकल्पात मंगळवारी कचरा न स्वीकारल्यास बुधवारपासून कळंगुट, कांदोळी आदी किनारी भागातील हॉटेलची सिव्हरेज घेऊन सांतइनेज, पणजी येथील सिव्हरेज प्रकल्पात येणारे टँकर अडविण्यात येणार आहेत, असा इशारा ... Read More »

कुठ्ठाळी-वेर्णा महामार्ग रात्री ते सकाळपर्यंत बंद

>> रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत वाहतुकीस निर्बंध नव्या झुवारी पुलावर कमानी बसवण्याचे काम तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करता यावे यासाठी काल २४ जूनपासून कुठ्ठाळी ते वेर्णा या दरम्यानचा महामार्ग रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. २४ जूनपासून १५ ऑक्टोबरपर्यंत कुठ्ठाळी ते वेर्णा दरम्यानचा महामार्ग रात्री ११ ते सकाळी ... Read More »

‘पे पार्किंग’मधून दुचाकींना वगळण्याचा मनपाचा निर्णय

पणजी महानगरपालिका शहरातील दोन प्रमुख मार्गांवरील पे पार्किंगमध्ये दुचाकी वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क न आकारण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. ही माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. शहरातील वाहतुकीमध्ये शिस्त आणण्यासाठी पहिल्या टप्प्यात १८ जून रस्ता आणि आत्माराम बोरकर या दोन प्रमुख रस्त्यावर पे पार्किंग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पे पार्किंगसंबंधी निविदा जारी करून ठेकेदाराची निवड केली जाणार ... Read More »

मान्सून पुन्हा सक्रिय

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात आगामी तीन – चार दिवस काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या २८ जून पर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे. दाबोळी येथे मागील चोवीस तासात ५ इंच आणि केपे येथे ४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजी आणि मुरगाव ... Read More »

पश्‍चिम बंगालमध्ये ५० बॉम्ब सापडले

पश्‍चिम बंगालमधील भाटपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांकिनारा भागातून जवळपास ५० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मात्र, सध्या येथील परिस्थिती साधारण असल्याची माहिती पोलीस आयुक्त अजय ठाकूर यांनी दिली. लोकसभा निवडणुकांच्या अगोदरपासूनच भाटपारा परिसर कायम अशांत राहिलेला आहे. रविवारीच या ठिकाणी तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर कलम १४४ लागू करण्यात आहे होते. पोलिसांकडून येथील परिस्थिती कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. Read More »

आंतरराष्ट्रीय ड्रग्स पॅडलर पेद्रो डुराटेला गोव्यात अटक

विदेश विभागाने इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स डीलर पेद्रो डुराटे ओलिवेरा सोऊ याला ताब्यात घेतले आहे. गोवा पोलिसांनी यासंबंधीची माहिती ब्राझीलच्या भारतातील दूतावासाला दिली आहे. ड्रग्स डीलर पेद्रो ओलिवेरा याला म्हापसा येथील विदेशी नागरिक स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ब्राझीलमधील अनेक गुन्हेगारी प्रकरणात ड्रग्स डीलर पेद्रो ओलिवेराचा सहभाग असून अंमली पदार्थांच्या तस्करीत ... Read More »

वेळ नसल्यास मुख्यमंत्र्यांनी शिक्षण खाते अन्य मंत्र्यांकडे सोपवावे

>> कॉंग्रेसची पत्रकार परिषदेत मागणी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शिक्षण खात्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसेल तर त्यांनी ते खाते अन्य मंत्र्यांकडे सोपवावे, अशी मागणी काल कॉंग्रेस पक्षाने केली. पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांचे शिक्षण खात्याकडे लक्ष नसल्याचा आरोप केला. उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून कर्ज मंजूर होऊनही ... Read More »

बांगलादेशचा अफगाणवर ६२ धावांनी विजय

>> शकिब अल हसनची अष्टपैलू चमक बांगलादेशने काल सोमवारी अफगाणिस्तानवर ६२ धावांनी विजय संपादन केला. अष्टपैलू शाकिब अल हसनने अर्धशतकाबरोबरच घेतलेले पाच बळी बांगलादेशी संघाच्या विजयाची खासियत ठरली. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या २६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाण संघ २०० धावांत संपला. बांगलादेशने या विजयासह क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेशाची आशा कायम ठेवली आहे. बांगलादेशच्या विजयामुळे यजमान इंग्लंडवर यामुळे दबाव ... Read More »

पेट्रोसियानने ७.५ गुणांसह आघाडी राखली

>> नऊ भारतीय बुद्धिबळपटूंना इंटरनॅशनल नॉर्म्स अर्मेनियाचा ग्रँडमास्टर पेट्रोसियन मानुएलने नवव्या फेरीअंती ७.५ गुणांसह २र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत आघाडी मिळविली आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे अखिल भारत बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविली जात आहे. नवव्या फेरीअंती काल नऊ भारतीय बुद्धिबळपटूंना इंटरनॅशनल नॉर्म्स प्राप्त केले. गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हमलला काल नवव्या फेरीत ... Read More »

आयुर्वेदीय ईमर्जन्सी उपचार

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) आयुर्वेदाचा हेतू रोगाला मुळातून काढण्याचा असतो. त्यात योजलेले उपचार अत्यंत सोपे, त्यापासून काही अन्य त्रास उत्पन्न न होणारे असल्यामुळे आयुर्वेदामध्ये लगेच गुणकारी ठरतील असे अनेक उपाय सुचवलेले आहेत. इंग्रजीत एक म्हण आहे- ‘स्टिच इन टाईम सेव्ह्ज् नाईन्’ – वेळच्या वेळी केलेला छोटा व योग्य उपचार एखाद्या मोठ्या रोगापासून किंवा एखाद्या शस्त्रक्रियेपासून वाचवू शकतो. त्याचप्रमाणे तो दीर्घकाळपर्यंत ... Read More »