ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: June 2019

शूरा मी वंदिले!

गोवा मुक्तिसंग्रामातील एक धगधगती ज्वाला काल विझली. मोहन रानडे ऊर्फ मनोहर आपटे या झुंजार, लढवय्या सेनानीने आपला अखेरचा निरोप घेतला. ज्याचे अवघे आयुष्यच एक संगर बनले असा हा स्वातंत्र्यसेनानी. गोव्याशी ना नाते, ना पाते, परंतु नोकरीच्या निमित्ताने सांगलीचे मनोहर आपटे गोव्यात आले आणि गोव्याच्या मुक्तिसंग्रामाशी असे काही जोडले गेले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या कृतज्ञ उल्लेखाविना मुक्तिलढ्याचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. ... Read More »

कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी कायदे आवश्यक

ऍड. प्रदीप उमप आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स ही प्रणाली २१ व्या शतकातील सर्वाधिक विनाशकारी आणि सेल्ङ्ग ट्रान्स्ङ्गॉर्मेटिव्ह म्हणजेच आत्मपरिवर्तनशील प्रणाली ठरण्याची चिन्हे आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास, जर आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचे नियमन योग्य प्रकारे केले गेले नाहीत, तर त्याच्या चांगल्या परिणामांबरोबरच अनेक वाईट परिणामही होऊ शकतात. कृ त्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्टचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात ... Read More »

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पद्मश्री मोहन रानडेंचे निधन

>> पुण्यात घेतला अखेरचा श्‍वास >> शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती लढ्याचे सेनानी पद्मश्री मोहन रानडे (९० वर्षे) यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी पहाटे निधन झाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गोव्याचे नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी गोवा सरकारच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. रानडे यांचा जन्म १९२९ साली सांगली, महाराष्ट्र येथे झाला. ... Read More »

आणखी १५ दिवस पणजीतील कचरा साळगावात स्वीकारणार

>> तात्पुरता तोडगा : लोबो पणजी महानगरपालिका क्षेत्रातील ओला कचरा विल्हेवाटीवर तात्पुरता तोडगा काल काढण्यात आला आहे. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात आणखीन १५ दिवस पणजीतील ओला कचरा स्वीकारण्यात येईल, अशी माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. पणजी महानगरपालिका क्षेत्रातील ओला कचरा साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात न स्वीकारल्यास उत्तर गोव्यातील किनारी भागातील ... Read More »

पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार

>> कॉंग्रेस विधीमंडळाची व्यूहरचना गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची मंत्र्यांकडून योग्य ती उत्तरे मिळावीत यासाठी कॉंग्रेस पक्ष सतर्क राहणार असून पक्षाचे सर्व आमदार मिळून सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. भाजप नेतृत्वाखालील आघाडी सरकार कॉंग्रेस पक्ष विधानसभेत विचारीत असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे न देता वेळ मारून नेण्याचे ... Read More »

पेन्शन फाईल्स अडविणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई

>> मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश सेवेतून निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या फाईल्स गेली दोन-दोन वर्षे अडवून ठेवलेल्या मुजोर सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. कित्येक निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांकडून यासंबंधी प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. आम्ही गेली दोन-दोन वर्षे आमच्या निवृत्ती वेतनासाठी हेलपाटे मारत आहोत. पण आमच्या निवृत्ती वेतनासाठीच्या फाईल्स काही हातावेगळ्या केल्या जात नाहीत, ... Read More »

गोवा मराठी चित्रपट महोत्सवात यंदापासून अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार

>> कृतज्ञता पुरस्कार सुमित्रा भावे यांना जाहीर गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला यंदा १२ वर्षे पूर्ण झाल्याने आता महोत्सवानिमित्त काही पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ‘फक्त मराठी’ या वाहिनीचे बिझनेस हेड शाम मळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. दरम्यान, दरवर्षी देण्यात येणारा कृतज्ञता पुरस्कारही देण्यात येणार असून प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात ... Read More »

तेर साहाक्यान सामवेल ठरला विजेता

>> दुसरी गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुली बुद्धिबळ स्पर्धा अर्मेनियाचा ग्रँडमास्टर तेर साहाक्यान सामवेल याने गोवा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या दुसर्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. काल मंगळवारी झालेल्या शेवटच्या फेरीत त्याने जॉर्जियाचा ग्रँडमास्टर जोशुआ डेव्हिट याचा पराभव केला. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या दहा फेर्‍यांअंती तीन ग्रँडमास्टर्सचे समान ... Read More »

माया आटली

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध रोखायचा या एकमेव उद्देशाने एकत्र आलेल्या बसपा – सपा युतीचे अखेर बारा वाजले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पक्षाच्या चिंतन बैठकीनंतर, समाजवादी पक्षाशी गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेली युती संपुष्टात आली असल्याचे काल औपचारिकरीत्या जाहीर केले. अर्थात, हे अपेक्षितच होते, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये या युतीची डाळ काही शिजली नाही. त्यामुळे त्या अपयशाचे ... Read More »

कॉंग्रेस पक्षाला भवितव्य आहे का?

देवेश कु. कडकडे अनेक पक्षांना धक्के बसतात, ते संपण्याच्या वाटेवर असतात. कॉंग्रेस पक्षाला आज स्वतःचा जनाधार असलेला नवीन नेता पुढे आणून नवा कार्यक्रम घेऊन मार्गक्रमण करावे लागेल, तरच गेलेली पत परत मिळू शकते. १३३ वर्षांचा जुना असलेल्या कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्य आंदोलनात प्रमुख भूमिका बजावली. त्याग आणि बलिदानप्राप्त गांधी नेहरू घराण्याच्या करिष्म्यावर पाच दशकांहून अधिक काळ देशात कॉंग्रेस पक्षाची राजकीय, सामाजिक ... Read More »