ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: June 2019

ओम बिर्ला यांची लोकसभा सभापतीपदी एकमताने निवड

भाजपचे खासदार तथा एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची काल लोकसभेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. या पदासाठी कोणत्याही विरोधी पक्षाने उमेदवार उभा केला नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उमेदवारीचा ठराव सभागृहात मांडल्यानंतर तो आवाजी मतदानाने संमत झाला. हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांनी बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्यासह विरोधी नेत्यांनीही यावेळी बिर्ला यांना सभागृहाचे सुरळीत कामकाज ... Read More »

राज्यात रस्ता अपघातांत ५ महिन्यांत १३२ बळी

राज्यात जानेवारी २०१९ ते मे २०१९ या पाच महिन्याच्या काळात रस्ता अपघातात १३२ जणांचा बळी गेला आहे. गत २०१८ च्या तुलनेत रस्ता अपघातातील बळींच्या संख्येत वाढ झाली आहे. गत वर्षी याच काळात रस्ता अपघातात ११८ जणांचा बळी गेला होता. बेशिस्त व वेगाने वाहन चालविण्यामुळे रस्ता अपघातातील बळीची संख्या वाढल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या पाच महिन्यात बळी पडलेल्या ... Read More »

न्यूझीलंडचा विजयी चौकार

>> केन विल्यमसनचे समयोचित शतक >> चौथ्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका संकटात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी व ३ चेंडू राखून पराभव करत क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील आपला चौथा विजय नोंदविला. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले आहे. चौथ्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका संघाची ‘अंतिम चार’ प्रवेशाची आशा जवळपास मावळली आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले २४२ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४८.३ षटकांत गाठले. ... Read More »

अनुराग, नितिशचा सलग दुसरा विजय

>> २री गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा गँडमास्टर अनुराग म्हामल आणि फिडे मास्टर नितिश बेलुरकर यांनी आपली विजयी वाटचाल कायम राखताना २र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत काल सलग दुसर्‍या विजयांची नोंद केली. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविली जात आहे. अनुरागने आपल्या दुसर्‍या फेरीतील लढतीत फिडे मास्टर सुयोग वाघला पराभूत केले. फिडे मास्टर नितिश बेलुरकरने ... Read More »

गरज नियोजनाचीच

राज्यातील वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे जनतेमध्ये नाराजी वाढत चाललेली असल्याच्या पार्श्वभूमीवर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी राज्याच्या वीज स्थितीबाबत विस्तृत श्वेतपत्रिका जारी करून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. वीजपुरवठ्याबाबत समस्या का निर्माण होतात याचे एक वस्तुनिष्ठ दर्शन या श्वेतपत्रिकेमुळे जनतेला घडू शकेल, त्यामुळे ती मराठीमध्ये अनुवादित करून याच अंकात अन्यत्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय आम्ही घेतला. वीजमंत्र्यांचे निवेदन पाहिले तर असे दिसते की वीज ... Read More »

अनिवासी नवरदेव रडारवर!

ऍड. प्रदीप उमप परदेशातला नवरा हवा, अशी अनेक मुलींची इच्छा असते. मुलीच्या आईवडिलांनाही परदेशातला जावई मिळाला की भरून पावल्यासारखे वाटते. अशा लग्नांमध्ये ङ्गसवणुकीचे अनेक प्रकार घडले असूनसुद्धा ही ‘क्रेझ’ कायम असणे अधिक चिंताजनक आहे. आनंदाच्या भरात परदेशातल्या स्थळाची व्यवस्थित चौकशीही केली जात नाही. अनिवासी भारतीय नवरदेवांकडून बर्‍याच वेळा होणार्‍या ङ्गसवणुकीला वेसण घालण्यासाठी राज्यसभेत विधेयक सादर करण्यात आले आहे. अनिवासी भारतीय ... Read More »

लोकहितार्थ धोरणांविरोधात कोणीही येऊ नये

>> पणजीतील क्रांतीदिन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन राज्य सरकारच्या लोकहितार्थ धोरणांच्या विरोधात कुणीही येऊ नये. सरकारी धोरणाला विरोध खपवून घेतला जाणार नाही, असा सूचक इशारा देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या क्रांती पर्वासाठी मंत्री, आमदार यांच्याबरोबरच नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोवा क्रांती दिन सोहळ्यात बोलताना येथे काल केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी येथील आझाद मैदानावरील ... Read More »

लोकसभा सभापतीपदासाठी भाजपचे ओम बिर्ला उमेदवार

>> आज होणार निवडणुकीची औपचारिकता भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांच्या नावाची निवड एनडीएचे लोकसभा सभापतीपदाचे उमेदवार म्हणून काल करण्यात आली. दोन वेळचे खासदार असलेले बिर्ला यावेळी राजस्थानमधील कोटा-बुंदी मतदारसंघातून निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांचे नाव सभापतीपदासाठी सुचविले असून या पदासाठी आज निवडणूक होणार आहे. केंद्रात एनडीएच्या बाजूने भक्कम बहुमत असल्याने त्यांची सभापतीपदी निवड ही औपचारिक बाब ... Read More »

३७ वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्य सरकारने ३७ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काल जारी करून प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले आहेत. गेली कित्येक वर्षे वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहणारे मायकल डिसोझा यांची बदली करण्यात आली असून तेथे सुनील मसूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मायकल डिसोझा यांची गृहनिर्माणच्या अतिरिक्त सचिव तसेच जीआयपीएआरडी संचालक (प्रशिक्षण) पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. खाण खात्याच्या संचालकपदी ... Read More »

पुलवामा : सोमवारच्या दशहतवादी हल्ल्यातील जखमी जवान शहीद

>> दहशतवाद्यांच्या पुलवामातील कारवाया सुरूच जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अरिहाल येथे सोमवारी वाहनामधून गस्त घालणार्‍या लष्करी जवानांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यातील जखमी ९ जवानांपैकी दोन जवानांची प्राणज्योत काल मालवली अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे दिली आहे. दरम्यान अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत एक जवान काल शहीद झाला. तर या चकमकीत गेल्या १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले दोन दहशतवादी ... Read More »