Daily Archives: June 27, 2019

हरवलेले विरोधक

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी संसदेतील आपल्या कालच्या भाषणामध्ये विरोधकांना खडे बोल सुनावले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वैधतेबाबत साशंकता व्यक्त करणार्‍यांना तर त्यांनी खडसावलेच, शिवाय हिंमत असेल तर लढून दाखवा असे आव्हानही दिले. गेल्या निवडणुकीपासून कोमात गेलेल्या कॉंग्रेसच्या नाकाला या मिरच्या नक्कीच झोंबतील. कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी अजूनही आपला रुसवा सोडायला तयार झालेले नाहीत आणि होतील असे वाटत नाही. त्यामुळे ‘‘ज्या ... Read More »

हॉंगकॉंगचा वरचष्मा, चीनची माघार

शैलेंद्र देवळणकर हॉंगकॉंगमध्ये प्रत्यार्पणाच्या कायद्यातील बदलांविरोधात छेडल्या गेलेल्या आंदोलनात १० लाखांहून अधिक नागरीक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी चीनच्या अरेरावीला प्रचंड विरोध दर्शवला. शांततामय मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला यश आले आणि या विधेयकाला स्थगिती देण्यात आली. हा चीनचा खूप मोठा पराभव आहे. चीनचा विशेष प्रशासकीय प्रभाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि जगातील श्रीमंत शहरांपैकी एक असणार्‍या हॉगकॉंग शहराने त्यांच्या गेल्या २० ... Read More »

महिलांना रात्रपाळीवर काम करण्यास मान्यता

>> मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय >> पावसाळी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक राज्यातील महिलांना रात्रपाळीला काम करता यावे यासाठी कारखानेविषयक कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती घडवून आणण्याच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दुरुस्तीनुसार महिलांना रात्री ७ ते सकाळी ६ ह्या शिफ्टमध्ये काम करता येईल. मात्र, त्यासाठी रात्रपाळीत काम करणार्‍या महिलांना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची अट असेल, असे काल ... Read More »

मुसळधार पावसामुळे सर्वत्र पडझड

पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या गोमंतकीयांना तृप्त करताना काल पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही भागांतील रस्ते पाण्याखाली जाणे, झाडे कोसळणे, वाहतुकीची कोंडी होणे अशा गोष्टी घडल्याने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने शालेय विद्यार्थी, कर्मचारी वर्ग, उघड्यावर बसून मालविक्री करणारे विक्रेते, बाजारहाट करण्यासाठी जाणारे लोक आदींची धांदल उडाली. काल ढवळी-फोंडा येथे रस्त्यावरून धावणार्‍या एका ... Read More »

नव्या सीआरझेड कायद्यामुळे किनारपट्टीचे अस्तित्व धोक्यात

>> आम आदमी पक्षाला भीती केंद्र सरकारची नवी ‘किनारपट्टी विभाग व्यवस्थापन योजना’ (सीझेडएमपी) जर संमत झाली तर राज्यातील किनारपट्टी उद्ध्वस्त होईल, अशी भीती आम आदमी पार्टीने व्यक्त केली आहे. त्यासंबंधी सामाजिक संघटनांच्या सहकार्याने आम आदमी पक्ष जनतेमध्ये जागृती घडवून आणणार असल्याचे पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी काल सांगितले. आम आदमी पार्टी या प्रश्‍नी विविध पंचायत क्षेत्रात जागृती घडवून आणणार असल्याचेही ... Read More »

भाजपची प्राथमिक सदस्य नोंदणी नि:शुल्क

>> ऑनलाईन सुविधा उपलब्ध >> सरचिटणीस सदानंद तानावडे यांची माहिती भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड नोव्हेंबरअखेरपर्यंत केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य सदस्य नोंदणी प्रमुख तथा सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला येत्या ... Read More »

भारत – विंडीज सामना आज

भारत व वेस्ट इंडीज यांच्यात आज गुरुवारी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील सामना रंगणार आहे. भारताने आपले पाच पैकी चार सामने जिंकले असून विंडीजला ६ पैकी चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. विंडीजचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेला असून आजचा विजय भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास नक्की करणार आहे. मँचेस्टरच्या या मैदानावर भारताने पाकिस्तानला लोळविले होते. फलंदाजी विभागात रोहित, विराट, ... Read More »

न्यूझीलंडने चाखली पराभवाची चव

>> पाकिस्तानच्या विजयात बाबर, सोहेल, आफ्रिदीची चमक बाबर आझमने ठोकलेले दहावे वनडे शतक व हारिस सोहेल (६४) याच्यासह त्याने केलेल्या १२६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने काल न्यूझीलंडचा ६ गडी व ५ चेंडू राखून पराभव केला. यंदाच्या क्रिकेट विश्‍वचषकातील किवी संघाचा हा पहिलाच पराभव ठरला. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले २३८ धावांचे किरकोळ लक्ष्य पाकिस्तानने ४९.१ षटकांत गाठले. तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम ... Read More »