Daily Archives: June 22, 2019

मध्यपूर्वेतील तणाव

इराणने आपले मानवरहित टेहळणी ड्रोण पाडल्याचा ठपका ठेवून त्या देशावर हल्ले चढवण्याचे आदेश अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते, मात्र नंतर परिणाम लक्षात घेऊन त्यांनीच त्याची कार्यवाही रोखली असे धक्कादायक वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने काल दिले आहे. इराणवर हल्ले चढवायला ट्रम्प यांना विदेशमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व सीआयएच्या प्रमुखांनी हिरवा कंदील दर्शवला होता, पण पेंटागॉनच्या प्रमुखांनी आखातातील अमेरिकी सैनिकांच्या सुरक्षेचा ... Read More »

अंतरिक्ष युद्धाभ्यासाची गरज का?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) मार्च २०१९ मध्ये क्षेपणास्त्रविरोधी प्रक्षेपणास्त्राचे परीक्षण करून मे महिन्यात, एका एयर व्हाईस मार्शलच्या नेतृत्वाखाली ट्राय सर्व्हिसेस डिफेन्स स्पेस एजन्सीची (त्रिदलीय अंतरिक्ष रक्षण संस्थान) स्थापना केल्यानंतर भारत आता जुलैमध्ये इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या अधिपत्याखाली संरक्षणदल, नागरिक संस्थान, इसरो आणि अंतरिक्ष शास्त्रज्ञांसह इंड स्पेस एक्स नावाचा सिम्युलेटेड स्पेस वॉर फेयर युद्धाभ्यास) करणार आहे… चीन व पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांकडून अंतरिक्ष युद्धाच्या ... Read More »

मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे आर्थिक पॅकेजची मागणी

>> नवा द्रुतगती महामार्ग, ग्रामीण पर्यटन, खाणबंदीमुळे अर्थसहाय्याची गरज राज्यातील खाण उद्योग बंद पडलेला असल्याने केंद्राने गोव्याला त्यासाठीची आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी आपण शुक्रवारी नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या बैठकीत बोलताना केल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. त्याचबरोबर धारगळ (राष्ट्रीय महामार्ग ६६) ते मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ या द्रूतगती महामार्गाच्या ... Read More »

रांची ः येथील प्रभात तारा मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशातील प्रमुख कार्यक्रम काल पार पडला. सुमारे ४० हजारजणांची उपस्थिती लाभलेल्या या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सहभाग होता. प्रत्येकाने जीवनभर योगाभ्यास करावा असे आवाहन यावेळी मोदी यांनी केले. Read More »

खास कचरा खाते स्थापन करण्याची गरज

>> लोबो ः मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी राज्यातील कचरा विल्हेवाटीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. कचरा विल्हेवाटीची समस्या सोडविण्यासाठी कचरा व्यवस्थापन महामंडळाबरोबरच खास कचरा मंत्रालय स्थापन करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी कचरा मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गोवा विधानसभेचे उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली. ... Read More »

आंतरराष्ट्रीय योगदिन राज्यात उत्साहात

गोव्यात काल आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त राज्यातील सर्व बाराही तालुक्यात योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे मंत्रीगण, विविध सरकारी खात्यांचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच राज्यातील जनतेने योग शिबिरांना हजेरी लावली. योग दिनानिमित्त सरकारी कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, रवींद्र भवन आदी ठिकाणी योग शिबिरे संपन्न झाली. योग दिनानिमित्त राज्यातील प्रमुख कार्यक्रम ताळगाव येथील समाज ... Read More »

‘बिग बॉस’च्या घरातूनच अभिजित बिचकुले यांना अटक

‘बिग बॉस मराठी’च्या दुसर्‍या पर्वातील स्पर्धक अभिजित बिचकुले यांना सातार्‍यातील धनादेश न वटल्याच्या प्रकरणातून बिग बॉसच्या घरातूनच काल अटक करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आरे पोलिसांच्या सहाय्याने बिचकुले यांना ही अटक केली. दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी बिचकुले यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाले होते. त्या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले. बिग बॉस मराठीचा सेट मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये ... Read More »

लंकेचा इंग्लंडला शॉक

लसिथ मलिंगाचा भेदक मारा आणि त्याला धनंजय डीसिल्वाच्या फिरकीने दिलेल्या साथीच्या जोरावर श्रीलंकेने विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत काल शुक्रवारी यजमान इंग्लंडवर २० धावांनी सनसनाटी विजय संपादन केला. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या २३३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४७ षटकांत २१२ धावांत आटोपला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने अंतिम क्षणांत फटकेबाजी करून संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, दुसर्‍या टोकाने त्याला साथ मिळाली नाही. ... Read More »

भारतासाठी सोपा पेपर

>> आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना विश्‍वचषक स्पर्धेत अपराजित असलेली टीम इंडिया व लागोपाठच्या पराभवामुळे अवसान गळालेला अफगाणिस्तान यांच्यात आज शनिवारी सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ दुबळ्या अफगाणिस्तानचा पराभव करून गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे प्रमुख फिरकीपटू राशिद खानला इंग्लंडने चोप दिल्यामुळे संपूर्ण अफगाण संघाने खांदे पाडले आहेत. शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार सारखे दिग्गज खेळाडू ... Read More »

कार्तिक गोपालला ‘ब’ विभाग जेतेपद

>> २री गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा आंध्रप्रदेशच्या कार्तिक गोपाल जी. याने २र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत ‘ब’ विभागाचे जेतेपद प्राप्त केलसे. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे अखिल भारत बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविली जात आहे. महत्त्वपूर्ण व शेवटच्या फेरीत कार्तिकने कार्तिकेयनला पराभूत करीत ९ गुणांसह जेतेपद प्राप्त केले. जेतेपदाबद्दल त्याला रु. २ ... Read More »