Daily Archives: June 21, 2019

योग अनुसरूया!

जगभरामध्ये आज जागतिक योग दिवस साजरा होत आहे. भारतीयांसाठी ही निश्‍चितच गौरवाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोर योग दिवसाची संकल्पना चार वर्षांपूर्वी मांडली तेव्हा संपूर्ण जगाने त्याचे उत्स्फूर्तपणे व उत्साहाने स्वागत केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांपैकी १७५ देशांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले होते. केवळ अनुमोदन देऊनच हे देश थांबलेले नाहीत, तर आपापल्या देशामध्ये जनतेने योग ... Read More »

योग म्हणजे काय?

प्रज्ञा भट आज आंतरराष्ट्रीय योग दिन. या निमित्ताने पेंग्वीन इंडियातर्फे ‘बीयॉंड आसनास् ः द मिथ्स अँड लेजंडस् बिहाइंड योगिक पोस्चर्स’ हे प्रज्ञा भट लिखित पुस्तक आज प्रकाशित होत आहे. त्यातील योगाविषयीच्या आपल्या प्राचीन परंपरेतील काही मूलभूत गोष्टी समजावून सांगणार्‍या मूळ इंग्रजीतील पहिल्या प्रकरणाचा हा मराठी अनुवाद – ‘योग’ या शब्दाचे मूळ संस्कृत ‘युज’ मध्ये आहे, ज्याचा अर्थ आहे एकत्र जोडणे. ... Read More »

पैसे मागणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करणार

>> भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे अनेक तक्रारी >> भ्रष्ट अधिकार्‍यांची गय करणार नाही मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या नावे सरकारी नोकर्‍यांसाठी काही सरकारी कर्मचारी आणि काही व्यक्ती नागरिकांकडे पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार आहे. सरकारी नोकरीसाठी कुणालाही पैसे देऊ नये. नागरिकांनी पैसे मागणार्‍यांच्या विरोधात मुख्यमंत्री कार्यालय किंवा पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल करावी. काही सरकारी कर्मचारी नोकरीसाठी पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार आहे. या प्रकरणी ... Read More »

तेलगू देसमचे राज्यसभेतील चारही खासदार भाजपात

>> चंद्रबाबू नायडू विदेशात असताना केले बंड तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांना ते विदेश दौर्‍यावर असताना त्यांच्या पक्षाच्या ४ राज्यसभा खासदारांनी काल जोरदार हादरा दिला. वाय. एस. चौधरी, सी. एम. रमेश, जी. मोहन राव आणि टी. जी. व्यंकटेश हे तेलगू देसमचे राज्यसभा खासदार नाटयमय घडामोडीत भाजपात दाखल झाले. तसेच या चौकडीने राज्यसभेचे अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची ... Read More »

राज्यात आज आंतरराष्ट्रीय योगदिन

राज्यभरात पाचवा आंतरराष्ट्रीय् योग दिन आज शुक्रवारी उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर योग प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योग दिनाच्या कार्यक्रमातून हृदयरोगाबाबत जनजागृती केली जाणार असून हृदयरोग टाळण्यासाठी उपयुक्त आसनांची माहिती व प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहे. राज्य पातळीवरील प्रमुख योग दिन कार्यक्रम सकाळी ७ वाजता ताळगाव येथे कॉम्युनिटी हॉलमध्ये होणार असून या कार्यक्रमाला ... Read More »

अखेर मॉन्सून दाखल

राज्यात अखेर १४ दिवसांच्या उशिराने मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने काल जाहीर केले. गोव्याच्या मागील २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच खूपच उशिराने मान्सूनचे आगमन झाले आहे, अशी माहिती पणजी हवामान विभागाचे संचालक डॉ. के. व्ही. पडगलवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील सर्वच भागात पावसाची नोंद झाली असून आठवड्याच्या अखेरपर्यंत मान्सून सर्वच भागात सक्रिय होणार आहे. आगामी पाच दिवस काही ठिकाणी जोरदार ... Read More »

हिमाचलात बस दरीत कोसळून २५ मृत्यूमुखी

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात बंजार भागात काल एका खासगी प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात २५ जण मृत्यूमुखी पडले असून ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कुल्लूच्या पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ५०० फूट खोली दरीत कोसळून ही दुर्घटना झाली आहे. सदर बस बंजर येथून गदगुशानी येथे जात होती. कुल्लू जिल्ह्याच्या बंजारजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ७० प्रवासी होते. ... Read More »

पहिल्यांदाच खासदार बनलेल्या अभिनेत्री नुसरत जहॉं तुर्कस्तानात विवाहबद्ध

तृणमूल कॉंग्रेसतर्फे लोकसभा खासदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेल्या अभिनेत्री नुसरत जहॉं या कोलकातास्थित उद्योजक निखिल जैन यांच्याशी तुर्कस्तान देशात नुकत्याच विवाहबद्ध झाल्या. विवाह सोहळ्याच्या तयारीत असल्यामुळेच खासदारपदाची शपथ नुसरत घेऊ शकलेल्या नाहीत. प. बंगालमधील बसिरहाट लोकसभा मतदारसंघातून नुसरत जहॉं निवडून आल्या आहेत. त्यांनी स्वतःहून आपल्या विवाह सोहळ्याचे पती निखिल जैन यांच्यासह असलेले एक छायाचित्र सोशल मिडियावर टाकले असून त्याखाली निखिल ... Read More »

सामुदायिक दूध उत्पादन योजनेची अधिसूचना जारी

राज्यातील दूध उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने कॉम्य्ुनिटी डेअरी योजना अधिसूचित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कमीत कमी ५ जणांचा गट दुधाचा व्यवसाय सुरू करू शकतो. या योजनेच्या माध्यमातून युवक स्वयंरोजगार सुरू करू शकतात. या नवीन योजनेखाली ५० दुभती जनावरांची खरेदी केली जाऊ शकते. दूध व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेखाली एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान ... Read More »

ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी विजय

>> डेव्हिड वॉर्नर, मुश्फिकुर रहीमची शतके >> कडव्या संघर्षानंतर बांगलादेशची हार बांगलादेशचा चिवट प्रतिकार मोडून काढत ऑस्ट्रेलियाने काल गुरुवारी विश्‍वचषक क्रिकेच स्पर्धेतील सामन्यात बांगलादेशचा ४८ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ३८२ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने ८ बाद ३३३ पर्यंत मजल मारली. डेव्हिड वॉर्नरच्या १६६ धावांच्या जोरावर कांगारूंनी धावपर्वत रचल्यानंतर माजी कर्णधार मुश्फिकुर रहीम याचे सातवे एकदिवसीय शतक तसेच तमिम ... Read More »