Daily Archives: June 20, 2019

राजस्थानमधील कोट्याचे खासदार ओम बिर्ला यांची काल लोकसभेच्या सभापतीपदी एकमुखाने निवड झाली. भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचे तर त्यांना पाठबळ लाभलेच, परंतु लोकसभेच्या आजवरच्या गौरवशाली परंपरेनुसार कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आदी विरोधी पक्षांनीही त्यांच्या नावाला आपले अनुमोदन देत लोकसभा सभापतींच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली. पूर्वी लोकसभेचे अध्यक्षपद एखाद्या ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तीकडे सोपविले जाई, परंतु नंतरच्या काळामध्ये तो पायंडा मोडला ... Read More »

नवे परराष्ट्रमंत्री आणि आव्हानांचा डोंगर

शैलेंद्र देवळणकर जयशंकरन यांच्या सेवानिवृत्तीला अवघे एक वर्षच झाले असताना त्यांना या खात्याच्या मंत्रीपदी नियुक्त करण्यात आले आहे. जयशंकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा ङ्गार मोठा ङ्गायदा हा परराष्ट्र धोरणाला होणार आहे.असे असले तरीही त्यांच्यासमोर काही मोठी आव्हाने आहेत. पंतप्रधानांनी आपल्या शपथविधी समारंभासाठी बिमस्टेक परिषदेच्या देशांना बोलावले होते. ‘बिमस्टेक’मध्ये सात सदस्य देश असून त्यातील पाच दक्षिण आशियाई आणि दोन दक्षिणपूर्व आशियाई देश ... Read More »

गोवाभरात उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन

>> ‘हृदयासाठी योग’ आशयावर आयोजन : खासगी संस्थांनाही आयोजनासाठी सहकार्य गोवाभरात उद्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी काल दिली. योग दिनाचा प्रमुख कार्यक्रम ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरमध्ये होणार असून त्यात ३५० जण सहभागी होणार असल्याची माहितीही नाईक यांनी दिली. त्याशिवाय सर्व सरकारी खात्यांतर्फेही योग दिन साजरा केला जाणार असून आरोग्य ... Read More »

गोवा माईल्स टॅक्सी सेवेला सरकारचा पूर्ण पाठिंबा ः सोपटे

राज्य सरकारचा गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेला पूर्ण पाठिंबा आहे. गोवा माईल्स टॅक्सी सेवेत सहभागी होणारे टॅक्सी मालक व चालकांसाठी आर्थिक व इतर साहाय्य योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. ईडीसीकडून टॅक्सी खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच कर्जदाराला अनुदान आणि वाहन विम्यासाठी ... Read More »

खाणबंदीप्रश्‍नी जुलैत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी येत्या जुलै महिन्यात नवी दिल्ली येथे उच्च पातळीवरील बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी व इतर सहभागी होणार आहे. साधारण येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत खाण बंदीच्या प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत ... Read More »

जि. पंचायत सदस्याची गाडी सांताक्रूझमध्ये अज्ञातांनी फोडली

>> गुंडगिरीला आळा घालण्याची मागणी सांताक्रुझ येथे पार्क करून ठेवलेली जिल्हा पंचायत सदस्य जॉनी शेरावो यांची कारगाडीची अज्ञात व्यक्तीने मंगळवारी मध्यरात्री नासधूस केल्याने १ लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर ली ब्रागांझा (बोंडीर-तिसवाडी) याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांताक्रुझ, कालापूर, मेरशी परिसरात काही महिन्यांपूर्वी अज्ञाताकडून नागरिकांच्या वाहनांची नासधूस केली जात होती. याविरोधात आवाज उठविण्यात ... Read More »

पणजीत व्यावसायिकावर तलवारीने हल्ल्याची तक्रार

तांबडीमाती-सांतइनेज पणजी येथील व्यावसायिक शकील जमादार यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी पणजी पोलिसांनी सहा ते सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री शकील जमादार या व्यावसायिकावर सात अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला केला. यासंबंधी जमादार यांनी पणजी पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे. जमादार हे मंगळवार १८ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास आपले काम संपल्यानंतर घरी आले. त्याच वेळी ... Read More »

तीन दिवस जोरदार पाऊस शक्य

>> योग्य वातावरण नसल्याने मॉन्सून लांबला राज्यातील पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत असून २० ते २३ जून या काळात जोरदार वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी योग्य वातावरण नसल्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. १५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल असे जाहीर करण्यात आले होते. तथापि, मान्सून पाऊस लांबणीवर पडल्याने पावसाळी पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली ... Read More »

ओम बिर्ला यांची लोकसभा सभापतीपदी एकमताने निवड

भाजपचे खासदार तथा एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची काल लोकसभेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. या पदासाठी कोणत्याही विरोधी पक्षाने उमेदवार उभा केला नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उमेदवारीचा ठराव सभागृहात मांडल्यानंतर तो आवाजी मतदानाने संमत झाला. हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांनी बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्यासह विरोधी नेत्यांनीही यावेळी बिर्ला यांना सभागृहाचे सुरळीत कामकाज ... Read More »

राज्यात रस्ता अपघातांत ५ महिन्यांत १३२ बळी

राज्यात जानेवारी २०१९ ते मे २०१९ या पाच महिन्याच्या काळात रस्ता अपघातात १३२ जणांचा बळी गेला आहे. गत २०१८ च्या तुलनेत रस्ता अपघातातील बळींच्या संख्येत वाढ झाली आहे. गत वर्षी याच काळात रस्ता अपघातात ११८ जणांचा बळी गेला होता. बेशिस्त व वेगाने वाहन चालविण्यामुळे रस्ता अपघातातील बळीची संख्या वाढल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या पाच महिन्यात बळी पडलेल्या ... Read More »