Daily Archives: June 19, 2019

गरज नियोजनाचीच

राज्यातील वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे जनतेमध्ये नाराजी वाढत चाललेली असल्याच्या पार्श्वभूमीवर वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी राज्याच्या वीज स्थितीबाबत विस्तृत श्वेतपत्रिका जारी करून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. वीजपुरवठ्याबाबत समस्या का निर्माण होतात याचे एक वस्तुनिष्ठ दर्शन या श्वेतपत्रिकेमुळे जनतेला घडू शकेल, त्यामुळे ती मराठीमध्ये अनुवादित करून याच अंकात अन्यत्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय आम्ही घेतला. वीजमंत्र्यांचे निवेदन पाहिले तर असे दिसते की वीज ... Read More »

अनिवासी नवरदेव रडारवर!

ऍड. प्रदीप उमप परदेशातला नवरा हवा, अशी अनेक मुलींची इच्छा असते. मुलीच्या आईवडिलांनाही परदेशातला जावई मिळाला की भरून पावल्यासारखे वाटते. अशा लग्नांमध्ये ङ्गसवणुकीचे अनेक प्रकार घडले असूनसुद्धा ही ‘क्रेझ’ कायम असणे अधिक चिंताजनक आहे. आनंदाच्या भरात परदेशातल्या स्थळाची व्यवस्थित चौकशीही केली जात नाही. अनिवासी भारतीय नवरदेवांकडून बर्‍याच वेळा होणार्‍या ङ्गसवणुकीला वेसण घालण्यासाठी राज्यसभेत विधेयक सादर करण्यात आले आहे. अनिवासी भारतीय ... Read More »

लोकहितार्थ धोरणांविरोधात कोणीही येऊ नये

>> पणजीतील क्रांतीदिन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन राज्य सरकारच्या लोकहितार्थ धोरणांच्या विरोधात कुणीही येऊ नये. सरकारी धोरणाला विरोध खपवून घेतला जाणार नाही, असा सूचक इशारा देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या क्रांती पर्वासाठी मंत्री, आमदार यांच्याबरोबरच नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोवा क्रांती दिन सोहळ्यात बोलताना येथे काल केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी येथील आझाद मैदानावरील ... Read More »

लोकसभा सभापतीपदासाठी भाजपचे ओम बिर्ला उमेदवार

>> आज होणार निवडणुकीची औपचारिकता भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांच्या नावाची निवड एनडीएचे लोकसभा सभापतीपदाचे उमेदवार म्हणून काल करण्यात आली. दोन वेळचे खासदार असलेले बिर्ला यावेळी राजस्थानमधील कोटा-बुंदी मतदारसंघातून निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांचे नाव सभापतीपदासाठी सुचविले असून या पदासाठी आज निवडणूक होणार आहे. केंद्रात एनडीएच्या बाजूने भक्कम बहुमत असल्याने त्यांची सभापतीपदी निवड ही औपचारिक बाब ... Read More »

३७ वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्य सरकारने ३७ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काल जारी करून प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले आहेत. गेली कित्येक वर्षे वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहणारे मायकल डिसोझा यांची बदली करण्यात आली असून तेथे सुनील मसूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मायकल डिसोझा यांची गृहनिर्माणच्या अतिरिक्त सचिव तसेच जीआयपीएआरडी संचालक (प्रशिक्षण) पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. खाण खात्याच्या संचालकपदी ... Read More »

पुलवामा : सोमवारच्या दशहतवादी हल्ल्यातील जखमी जवान शहीद

>> दहशतवाद्यांच्या पुलवामातील कारवाया सुरूच जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अरिहाल येथे सोमवारी वाहनामधून गस्त घालणार्‍या लष्करी जवानांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यातील जखमी ९ जवानांपैकी दोन जवानांची प्राणज्योत काल मालवली अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे दिली आहे. दरम्यान अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत एक जवान काल शहीद झाला. तर या चकमकीत गेल्या १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले दोन दहशतवादी ... Read More »

राज्याचे विविध ज्वलंत प्रश्‍न सोडवण्यात सरकारला अपयश

>> विधानसभेत धारेवर धरणार : कवळेकर गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होत असून ते ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात राज्यातील सर्व महत्त्वाचे प्रश्‍न कॉंग्रेस पक्ष विधानसभेत मांडणार आहे असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. भाजप सरकार राज्यात सत्तेवर येऊन जवळ-जवळ पावणेतीन वर्षांचा काळ पूर्ण झालेला आहे. मात्र, खाणबंदी, बेरोजगारी, कोळसा प्रदूषण ... Read More »

इंग्लंडसमोर अफगाणिस्तानची शरणागती

>> यजमानांचा १५० धावांनी विजय >> कर्णधार ऑईन मॉर्गनचे झंझावाती शतक यजमान इंग्लंडने काल मंगळवारी विश्‍वचषक क्रिरेट स्पर्धेतील सामन्यात दुबळ्या अफगाणिस्तानवर १५० धावांनी एकतर्फी विजय मिळवला. कर्णधार ऑईन मॉर्गनच्या झंझावाती १४८ धावांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानसमोर ३९८ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. पण अफगाणिस्तानला केवळ ८ बाद २४७ धावांपर्यंतच पोहोचता आले. इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांतून ८ गुण मिळवत गुणतक्त्यात अव्वलस्थानी ... Read More »

२र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

>> गोव्याच्या खेळाडूंची सकारात्मक सुरुवात २र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला काल ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियममध्ये शानदार प्रारंभ झाला. स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंनी सकारात्मक सुरुवात केली आहे. २३ देेशांतील मिळवून ३७ ग्रँडमास्टर्स, जेतेपदे मिळविलेले विविध देशांतील १०० बुद्धिबळपटू मिळून सुमारे १२००च्या वर खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. त्यापैकी ५ जण हे सुपर ग्रँडमास्टर्स आहेत. स्पर्धेचे उद्घाटन गोव्याचे वीजमंत्री ... Read More »