Daily Archives: June 18, 2019

संसद सुरू

सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कालपासून सुरू झाले. हे अधिवेशन पुढील चाळीस दिवस चालणार आहे. म्हणजे लोकसभेच्या कामकाजाचे ३० आणि राज्यसभेच्या कामकाजाचे २७ दिवस हे पावसाळी अधिवेशन चालेल. प्रचंड बहुमतानिशी केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हे पहिलेच संसद अधिवेशन आहे. साहजिकच अनेक गोष्टींबाबत देशाला कुतूहल आहे. पहिली बाब म्हणजे या लोकसभेमध्ये सत्ताधार्‍यांचे पारडे बरेच वर गेेलेले असल्याने विरोधकांची ... Read More »

जलसंवर्धनाचे महत्त्व आपण जाणणार कधी?

देवेश कु. कडकडे दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा देशाच्या बहुतेक राज्यांना बसत असतात. परंतु या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेने कोणीही पावले उचलताना दिसत नाही. प्रचंड पाऊस होणार्‍या गोव्यासारख्या राज्यालाही भीषण पाणीटंचाई भेडसावत असेल तर कोठे चुकते याचा विचार राज्यकर्त्यांनी करायलाच हवा… अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टी जीवनावश्यक मानल्या जातात, तरी पाणी आणि हवा या घटकांशिवाय आपण काही तास सुद्धा ... Read More »

आता गोव्याला पश्‍चिम ग्रीडवरून वीज पुरवठा

>> दक्षिण ग्रीडवरून वारंवारच्या व्यत्ययामुळे गोवा सरकारचा निर्णय : मंत्री काब्राल दक्षिण ग्रीडकडून गोव्याला होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागल्याने जनतेची होणारी गैरसोय तसेच व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन या ग्रीडवरून गोव्याला होणारा वीजपुरवठा बंद करण्याचा व तो पश्‍चिम ग्रीडवरून घेण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकातील आंबेवाडी हा ... Read More »

चोपडेत पर्यटकांच्या वाहनांची तोडफोड ः दोघांना अटक

शिवोली-चोपडे पुलावरील रविवारच्या भीषण अपघाताच्या दुसर्‍याच दिवशी काल याच भागात चोपडे येथे पर्यटक वाहनाने ओव्हरटेक केले व त्यात दारुच्या बाटल्या आढळल्याने त्या अडवून स्थानिक वाहनातील युवकांनी पर्यटकांच्या वाहनांची तोडफोड करून त्यांना मारहाणही केली. अन्य एका पर्यटक वाहनातही दारू आढळल्याने त्याचीही तोडफोड करण्यात आली. पर्यटकांनी पेडणे पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी तुकाराम दाभोलकर (मोरजी) व सुलेन ढिल्लन भाईडकर (भाईडवाडा-कोरगाव) यांना अटक ... Read More »

हैदराबाद, आंध्रमधील मासळी फॉर्मेलिनयुक्त; खाणे टाळावे

>> चर्चिल आलेमाव यांचा पत्रकार परिषदेत दावा हैदराबाद, आंध्र प्रदेश येथून येणार्‍या मासळीवर फॉर्मेलिन रसायन शिंपडले जात असल्याने गोव्यातील मच्छीमारी बंदीच्या काळात लोकांनी वरील राज्यांमधून येणारी मासळी खाऊ नये असे आवाहन आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल पत्रकार परिषदेत केले. आंध्र प्रदेश, हैदराबाद व अन्य दूर प्रांतांमधून निर्यात केल्या जाणार्‍या मासळीवर ती अनेक तास ताजी राहण्यासाठी फॉर्मेलिनचे पाणी शिंपडले जाते. तेथे ... Read More »

आकाशवाणीची ‘विविध भारती’ आजपासून एफ. एम. वर

>> गोव्यात आज शुभारंभ >> १०१.१ ध्वनीलहरींवर ऐकता येणार आकाशवाणीच्या ‘विविध भारती’ सेवेने आजवर देशभरातील खेड्यापाड्यांतील कोट्यवधी श्रोत्यांना हिंदी सिनेसंगीताची अविरत अवीट मेजवानी दिली. दूरचित्रवाणीचे आगमन व्हायच्या आधी तर ‘विविध भारती’ हे खेड्यापाड्यांतील जनतेसाठी मोठे आकर्षण होते. श्रोत्यांचे फर्माइशी कार्यक्रम, त्यांना देशाच्या कानाकोपर्‍यातून येणारी श्रोत्यांची पत्रे, त्या श्रोत्यांशी आकाशवाणीच्या निवेदकांनी जोडलेले नाते या सार्‍याचा अनुभव मागील पिढीने नक्कीच घेतला आहे. ... Read More »

शपथग्रहणाने संसदीय अधिवेशन सुरू

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल नवनिर्वाचित खासदारांच्या शपथग्रहणाने कालपासून प्रारंभ झाला. सभागृहाचे नेते म्हणून सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर सभागृहात विविध लक्षवेधी घटना घडल्या. पंतप्रधान मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधी कोठे आहेत असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या सदस्यांच्या दिशेने अंगुली निर्देश करीत विचारला. तर पंतप्रधान मोदी यांचे नाव शपथविधीसाठी पुकारले जाताच भाजप सदस्यांनी ‘मोदी…मोदीचा’ ... Read More »

गोवा माईल्स – काळ्यापिवळ्या टॅक्सीवाल्यांत भांडण ः ६ अटकेत

मडगाव येथील कोंकण रेल्वे स्टेशनसमोर काल सकाळी गोवा माईल्स टॅक्सी चाकलाने प्रवाशांना आपल्या टॅक्सीत घेतल्याने स्टेशनवरील काळ्यापिवळ्या टॅक्सी चालकांमध्ये भाड्यावरून भांडण झाले व प्रकरण मारहाणीपर्यंत गेल्याने मडगाव पोलिसांनी सहाजणांना अटक केली. कलिंदर नाईकवाडा हा गोवा माईल्सचा टॅक्सी चालक मडगाव बाहेरून रेल्वे स्टेशनवर भाडे घेवून आला होता. परत जाताना त्याला रेल्वेचे आलेल्या प्रवाशाचे भाडे मिळाले. त्यावरून रेल्वे स्टेशनवरील काळ्यापिवळ्या टॅक्सी चालक ... Read More »

बांगलादेशचा विंडीजवर एकतर्फी विजय

>> शाकिब अल हसनची अष्टपैलू चमक >> लिटन दासची स्फोटक खेळी शाकिब अल हसनने ठोकलेले नववे एकदिवसीय शतक व त्याने लिटन दाससह चौथ्या गड्यासाठी केवळ २२.३ षटकांत केलेल्या १८९ धावांच्या अविभक्त भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने काल विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीजचा ७ गडी व ५१ चेंडू राखून पराभव केला. वेस्ट इंडीजने विजयासाठी ठेवलेले ३२२ धावांचे लक्ष्य बांगलादेशने ४१.३ षटकांत गाठले. केवळ ... Read More »

उरुग्वेकडून इक्वादोरचा धुव्वा

>> कोपा अमेरिका फुटबॉल स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेजच्या शानदार खेळाच्या जोरावर उरुग्वेने १० इक्वादोरचा ४-० असा धुव्वा उडवित कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत काल शानदार विजयी सलामी दिली. हा उरुग्वेचा १९६७ नंतरचा कोपा अमेरिका स्पर्धेतील सर्वांत मोठा विजय ठरला. विजयामुळे त्यांनी क गटात अव्वल स्थान मिळविले आहे. सामन्यात जुझे क्विंटेरोला रेफ्रीने रेड कार्ड दाखवित मैदानावर काढल्याने इक्वादोरला १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. ... Read More »