Daily Archives: June 17, 2019

खरा उपाय

कोलकात्यातील दोघा कनिष्ठ डॉक्टरांना झालेल्या मारहाणीवरून सुरू झालेले डॉक्टरांचे आंदोलन चिघळत चिघळत देश पातळीवर पोहोचले. आपल्या व्यवसायबंधूंच्या समर्थनार्थ डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेने देशव्यापी संपाची हाक दिली आणि त्याचे परिणाम देशभरातील कोट्यवधी रुग्णांना नाहक भोगावे लागत आहेत. काट्याचा नायटा व्हावा तसे हे आंदोलन पसरत गेले, त्याला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तोंडची दादागिरीची भाषा कारणीभूत आहे. कोलकात्याच्या नीलरतन सरकार इस्पितळात ... Read More »

राहुल नही सुधरेंगे

ल. त्र्यं. जोशी राहुल गांधी मोदींचा सतत दुस्वास आणि द्वेषच करीत राहिले. लोकसभेत त्यांनी मोदींना मिठी मारण्याचा बालीश चाळा जरुर केला, त्यानंतर डोळा मारुन त्यातील उरलेसुरले गांभीर्यही घालवून टाकले. आजही जेव्हा राहुल आणि पवार मोदी द्वेषाचेच घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यातून ‘हम नही सुधरेंगे’ हाच संकेत मिळतो! केरळमधील वायनाड मतदारसंघातील दौर्‍यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर, राजीनामा दिलेले कॉंग्रेसाध्यक्ष ... Read More »

शिवोलीतील भीषण अपघातात पिता-पुत्र जागीच ठार

>> महाराष्ट्रातील वाहनाने पुलावर बेफामपणे ठोकरले मोरजीतील वाहनाला >> स्थानिकांकडून कारणीभूत वाहनास आग शिवोली – चोपडे पुलावर काल सकाळी दोन वाहनांदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मोरजी येथील पिता-पुत्र जागीच ठार झाले. त्यांच्या गाडीतील अन्य चौघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मोरजीतील फर्नांडिस कुटुंबियांच्या गाडीस ठोकरलेल्या महाराष्ट्रातील वाहनाला स्थानिक ग्रामस्थांनी पुलावरच पेटवून दिल्याने सुमारे अर्धा तास पुलावर आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. या ... Read More »

आयुष इस्पितळाच्या जागेतील माती रस्त्यासाठी

>> मंत्र्यांनी दखल घेत इस्पितळाचे काम सुरू करण्याची मागणी केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी धारगळ येथील वादग्रस्त क्रीडा नगरीतील ३ लाख चौरस मीटर जागेत आयुर्वेदतर्ङ्गे पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपये खर्च करून आयुष इस्पितळ बांधण्याची योजना आखली व त्याचा शुभारंभ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आला. मात्र ङ्गलक लावण्यापलीकडे आजपर्यंत कोणतीच प्रगती या इस्पितळाबाबत झालेली दिसून येत नाही. परंतु याच ... Read More »

सोनसडा यार्डात आजपासून मिश्र कचरा टाकण्यास मनाई

सोनसडा येथील यार्डात कचरा प्रक्रिया प्रकल्पात आज सोमवारपासून मिश्र स्वरूपाचा कचरा स्वीकारला जाणार नाही. वर्गीकरण केलेला कचरा टाकावा अशी मागणी फोमेंतो ग्रीन कंपनीने करताच पालिका जागी झाली व आजपासून वर्गीकृत कचरा उचलण्याची ताकीद लोकांना दिली. बर्‍याच प्रमाणात लोकांनी वर्गीकृत कचरा दिला. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून देण्याची जाहीर सूचना पालिकेने केली होती. ओला कचरा दररोज घरोनघर गोळा केला ... Read More »

गोव्यात मान्सून लांबणीवर

राज्यात मान्सूनचे आगमन लांबल्याने नागरिकांना वाढत्या उष्णतेला तोंड द्यावे लागत आहे. येथील हवामान विभागाने १५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तविली होती. परंतु, मान्सूनला गोव्यात पोहोचण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सूनचे आगमन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील जनता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. येथील हवामान विभागाने राज्यातील काही भागात चोवीस तासात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अरबी समुद्रातील ... Read More »

खाणग्रस्तांनी घेतली खासदार सार्दिनची भेट

खाणग्रस्त लोकांनी काल दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची भेट घेऊन खाणी बंद झाल्याने खाण अवलंबीत लोकांना फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याची कल्पना दिली व दिल्लीत खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. दोन दिवसांमागे त्यानी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांची भेट घेतली होती. त्यांनी येत्या विधानसभा अधिवेसनगत आवाज उठविण्याचे आश्‍वासन दिले. काल त्यांनी दक्षिण ... Read More »

भारताने पाकिस्तानला लोळवले

>> मिळविला ८९ धावांनी विजय >> रोहित शर्माचे तुफानी शतक क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील काल रविवारी झालेल्या एकतर्फी लढतीत टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ८९ धावांनी पराभव केला. पावसाने बाधित या लढतीत पाकसमोर विजयासाठी ४० षटकांत ३०२ धावांचे लक्ष्य होते. परंतु, त्यांना ६ बाद २१२ धावांपर्यंतच जाता आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३३६ ... Read More »

राष्ट्रीय निवड समितीचे रालिन डिसोझा सदस्य

गोवा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव फा. रालिन डिसोझा यांची भारतीय फुटबॉल महासंघाने युवा मुलींच्या निवड समितीमध्ये सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. यासाठी एकाद्या गोमंतकीयाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण आशियाई बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा तसेच आशियाई आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेपूर्वीच्या राष्ट्रीय शिबिरासाठी खेळाडू निवडणार्‍या समितीचे ते भाग असतील. कोईंबतूर येथे २१ मे रोजी संपलेल्या २६व्या युवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्यांचा सक्रीय ... Read More »

अनुरा उपविजेती

योनेक्स सनराईज अखिल भारतीय सीनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे सदर स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी सातवे मानांकन लाभलेल्या अनुराला अंतिम फेरीत तिसर्‍या मानांकित आकार्षी कश्यपने २१-१२, २१-१६ असे सहज पराभूत केले. उपविजेतेपदानंतर अनुराने मध्य रेल्वे, जीनो फार्मास्युटिकल्स, गोवा क्रीडा प्राधिकरण व गोवा बॅडमिंटन संघटनेचे सहकार्याबद्दल आभार मानले. अनुरा आता मंगोलिया आंतरराष्ट्रीय चॅलेंज ... Read More »