Daily Archives: June 15, 2019

बिश्केकचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे चीन प्रणित शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. तेथे उपस्थित असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी द्विपक्षीय भेट तर त्यांनी टाळलीच, शिवाय आपल्या भाषणातून पाकिस्तानला उद्देशून चार ठोसेही लगावले. दहशतवाद प्रायोजित करणार्‍या, त्याला मदत करणार्‍या वा आर्थिक सहकार्य करणार्‍या देशांना त्यासाठी जबाबदार धरण्यात यावे, प्रादेशिक दहशतवादविरोधी संरचना उभारली जावी, दहशतवादाविरुद्ध जागतिक परिषद ... Read More »

संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्र

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) ज्या वेळी जगात ऊर्जेची फार मोठी गरज भासू लागते त्यावेळी राष्ट्रांवर कमी किमतीत, पर्यावरणाला धक्का न लागू देता आणि ऊर्जेची सुरक्षा ध्यानात ठेऊन, ऊर्जेचे नवे क्षेत्र, नवी साधने, नवीन उगमस्थान शोधावे लागतात. आपल्या ध्येयाकडे जातांना संरक्षणदले त्यांची तैनाती, संशोधन वृत्ती आणि तंत्रज्ञानाकडे असलेला कल याचा पुरेपूर उपयोग करतात. भारतही याला अपवाद नाही. कुठल्याही देशाची आर्थिक प्रगती ... Read More »

खाणप्रश्‍नी तोडग्याचे केंद्रीय खाणमंत्र्यांचे आश्‍वासन

>> मुख्यमंत्र्यांची प्रल्हाद जोशींबरोबर चर्चा >> केंद्रीय मंत्री अमित शहा, रमेश पोखरीयाल, स्मृती इराणींनाही भेटले गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्‍वासन केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले. मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौर्‍यावर असून काल त्यांनी खाण प्रश्‍नावर केंद्रीय खाण मंत्र्यांची भेट घेऊन गोव्यात बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू ... Read More »

आत्माराम बोरकर, १८ जून रस्त्यांवर पे पार्किंग योजना

>> मनपाच्या बैठकीत निर्णय पणजी महानगरपालिका क्षेत्रातील १८ जून रस्ता आणि आत्माराम बोरकर (एबी) रस्त्यावर पे पार्किंग योजना राबविण्याचा निर्णय महानगरपालिका मंडळाच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. शहरातील पार्किंगमध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर १८ जून रस्ता आणि एबी रस्ता या दोन प्रमुख रस्त्यांवर पे पार्किंग योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला ... Read More »

दहशतवादावरून मोदींचे पाकिस्तानला खडे बोल

आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या राष्ट्रांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले. याविरोधातील आपले संकुचित विचार सोडून मानवतावादी शक्तींनी पुढे आलेच पाहिजे, असे खडे बोल त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता किर्गिस्तानातील बिश्केक येथे सुनावले. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) दहशतवादाच्या मुद्यावरून ... Read More »

गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले

>> व्हॅटमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) १५ ते २० टक्के आणि डिझेलवरील व्हॅट करात १५ ते १८ टक्के वाढ केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात २ रुपये ७८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपया ६५ पैसे अशी वाढ झाली आहे. व्हॅटमध्ये वाढीमुळे पेट्रोलचा दर ६६ रुपये ५३ पैसे आणि डिझेलचा ... Read More »

गोव्याच्या मुलांनी टेबल टेनिसमध्येही शिखर गाठावे

धेंपो उद्योगसमूहाने आपल्या क्रीडाक्षेत्रातील कामगिरीला आता टेबल टेनिसचीही जोड दिली असून अल्टिमेट टेबल टेनिस लीगमधील ‘गोवा चॅलेंजर्स’ या संघाची ९० टक्के मालकी प्राप्त केली आहे. यासंदर्भात ऑगस्टो रॉड्रिग्स यांनी धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्याकडून त्याविषयी अधिक जाणून घेतले, त्याचा हा गोषवारा – ‘गोवा चॅलेंजर्स’चे प्रणेते श्रीनिवास धेंपो यांची आकांक्षा ‘‘टेबल टेनिस हा धेंपो उद्योग समूहाशी जोडला गेलेला चौथा क्रीडाप्रकार ... Read More »

कॅसिनोंसाठी गेमिंग कमिशनरची नियुक्ती लवकरच : मंत्री काब्राल

कॅसिनोंसाठी गेमिंग कमिशनरची शक्य तेवढ्या लवकर नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. सरकारने कॅसिनोसाठीचा प्रवेश कर रद्द केल्याने सरकारला ५ हजार कोटी रु. चे नुकसान होत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याचे ते म्हणाले. कॅसिनोचाच नव्हे तर सगळाच प्रवेश कर २०१७ साली बंद करण्यात आला होता. मात्र, सरकारने परवाना शुल्क वाढवले ... Read More »

इंग्लंडकडून वेस्ट इंडीजचा फडशा

>> ज्यो रुटची अष्टपैलू चमक >> आर्चर, वूडने टिपले तीन बळी माजी कर्णधार ज्यो रुट याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने काल शुक्रवारी झालेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील १९व्या सामन्यात वेस्ट इंडीजचा ८ गडी व १०१ चेंडू राखून पराभव केला. विंडीजने विजयासाठी ठेवलेले २१३ धावांचे माफक लक्ष्य इंग्लंडने ३३.१ षटकांत गाठले. सलामीवीर रुटने सलामीला येत आपले सोळावे एकदिवसीय शतक झळकावले तसेच गोलंदाजीत ... Read More »

जपानला नमवित भारत अंतिम फेरीत दाखल

>> एफआयएच सीरिज फायन्सल्स >> सात गोलांची केली बरसात टीम हॉकी इंडियाने काल आशियाई जेत्या जपानचा ७-२ असा एकतर्फी पराभव करीत पराभव करीत आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आयोजित केलेल्या एफआयएच सीरिज फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक दिली. आता अंतिम फेरीत भारत भारताची गाठ दक्षिण आफ्रिकन संघाशी पडणार आहे. टोकियो ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकताना काल झालेल्या उपांत्य लढतीत आशियाई जेत्या ... Read More »