Daily Archives: June 14, 2019

आयारामांची आयात

आपले आमदार फोडण्यासाठी भाजपाने पॅकेज तयार ठेवल्याचा कॉंग्रेसचा दावा, कॉंग्रेसचे दहा आमदार भाजपास येण्यास उत्सुक असल्याचा भाजपचा प्रतिदावा हा सगळाच प्रकार उबगवाणा आहे. विकाऊ वृत्तीचे हे जे प्रदर्शन संबंधितांनी मांडले आहे, ते अतिशय लाजीरवाणे आणि गोमंतकीय मतदारांची मान शरमेने खाली घालायला लावणारे आहे. विरोधी पक्षात गेली सात वर्षे बसूनही सत्ता दृष्टिपथात नसल्याने घायकुतीला आलेले कॉंग्रेसचे आमदार आणि एकेका आयारामाला आपल्याकडे ... Read More »

पाकिस्तानचा उद्दामपणा सुरुच…

शंभू भाऊ बांदेकर तुम्ही शांततामय बोलणे करा, सामंजस्य करार करा, व्यापारउदिम वाढवा, दळणवळण चालू ठेवा, पण पाकिस्तानला वळणावर आणण्यासाठी, त्यांच्या उद्दामपणाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, असेच म्हणावेसे वाटते! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी सोपविली आहे. जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांतील दहशतवाद मोडून काढण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. शिवाय पश्‍चिम ... Read More »

भाजपकडून दिशाभूल; कॉंग्रेसचे आमदार एकसंध

>> कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा >> पॅकेज उघड झाल्याने बिनबुडाचे आरोप कॉंग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी भाजपने तयार केलेल्या पॅकेजचा भांडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर उघडे पडले असल्याने त्यांनी बचावासाठी बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे १० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा भाजपचा आरोप तथ्यहीन व दिशाभूल करणारा आहे. कॉंग्रेसचे सर्व आमदार एकसंध आहेत, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ... Read More »

दक्षिण गोव्याला पश्‍चिम क्षेत्र ग्रीडमधून वीजपुरवठा करणार

>> वीजमंत्री काब्राल यांची माहिती गोव्याला दक्षिण क्षेत्र ग्रीडकडून मिळणार्‍या वीज पुरवठ्यामध्ये वरच्यावर बिघाड होत असल्याने दक्षिण गोव्यातील वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असून नागरिकांना वीज समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मागील १८ तास कर्नाटकातून होणारा वीज पुरवठा बंद आहे. दक्षिण गोव्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी पश्‍चिम क्षेत्र ग्रीडमधून दक्षिण गोव्यात वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश ... Read More »

मुख्यमंत्री दिल्ली दौर्‍यावर रवाना

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्ली दौर्‍यावर काल रवाना झाले असून १४ ते १६ जून दरम्यान ते नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध असणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे. दिल्ली दौर्‍यात मुख्यमंत्री १५ जूनला होणार्‍या नीती आयोगाच्या बैठकीत सहभाग घेतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश ... Read More »

बेपत्ता विमानातील सर्व १३ जवान शहीद

बेपत्ता झालेल्या वायूदलाच्या एएन-३२ विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात आढळले आहे. बचाव दलाने याची पुष्टी केली असून या विमानात असणारे सर्व १३ जवान शहीद झाले आहेत. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडलेल्या ठिकाणी काल सकाळी १५ सदस्यीय बचाव पथक दाखल झाले होते. मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाचे अवशेष सियांग जिल्ह्यात आढळून आले होते. अपघाताचे ठिकाण अतिशय उंचावर आणि घनदाट ... Read More »

लष्करी अधिकार्‍याला समुद्रात बुडताना वाचविले

>> तटरक्षक      दलाची कामगिरी भारतीय तटरक्षक दलाने काब दी राम येथे खवळलेल्या समुद्रात बुडताना एका लष्कराच्या अधिकार्‍याला जीवदान दिले. सदर घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली. भारतीय तटरक्षक दल गोवा विभागाचे उपमहानिदेशक हिमांशू नौटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी दोनच्या सुमारास तटरक्षक पोलीस तसेच दृष्टी लाईफगार्ड यांच्याकडून काब द राम येथे खोल समुद्रात एक व्यक्ती बुडत असल्याचा संदेश ... Read More »

योगदिन यशस्वीतेसाठी शिक्षण खात्याचा पुढाकार

>> शिक्षण संचालकांचे परिपत्रकाद्वारे आवाहन राज्य शिक्षण खात्याने पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वी करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांनी आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण संचालक नागराज होन्नकेरी यांनी जारी परिपत्रकातून केले आहे. शिक्षण खात्याने यासंबंधी एक परिपत्रक तयार करून राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना पाठविले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात पाचवा आंतरराष्ट्रीय ... Read More »

विरोधी पक्षनेत्यांनी खाणीप्रश्‍न सोडवण्यास पाठपुरावा करावा

>> खाण अवलंबितांची मागणी खाण अवलंबितांनी काल विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या बेतुल येथील निवासस्थानी भेट घेऊन तत्काळ खाणी सुरू करण्याची मागणी केली. केंद्र सरकारकडे अनेकदा निवेदने पाठवूनही खाणी सुरू न केल्याने खाण अवलंबित व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. गोवा सरकारही हा विषय गंभीरपणे घेत नसल्याने खाण अवलंबित संकटात सापडले आहेत. कॉंग्रेस पक्षाने खाणी ... Read More »

भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील कालचा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. २ विजय (४ गुण) आणि १ सा’ना रद्द (१ गुण) झाल्यामुळे टीम इंडियाचे सध्या ५ गुण आहेत. तर न्यूझीलंडचे आता ७ गुण झाले आहेत. बुधवारपासूनच या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार नाणेफेकीच्या ... Read More »