Daily Archives: June 13, 2019

कबुली!

कॅसिनो हा गोव्याच्या पर्यटनाचाच एक भाग आहे आणि सरकार ते बंद करू शकत नाही, अशी कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. कॅसिनोंना विद्यमान सरकारचे समर्थन आहे आणि ते त्याचा पुरस्कार करू पाहते आहे हे त्यांच्या या विधानातून आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या जाहिरातबाजीतून स्पष्ट झाले हे बरे झाले, कारण आजवर कॅसिनो आम्ही आणलेले नाहीत, ते कॉंग्रेसने आणले ... Read More »

बेपत्ता विमानाचे गूढ अखेर उकलले..

शैलेंद्र देवळणकर हे विमान बेपत्ता झाले तेव्हा त्याबाबत संशयाची सुई चीनकडे दाखवली गेली, याचे कारण या भूभागावर चीन पूर्वीपासूनच आपला दावा सांगतो आहे. त्यामुळे यामध्ये चीनचा काही घातपाती सहभाग असू शकतो अशीही चर्चा होते आहे. अर्थात, याबाबत अजूनही काही स्पष्टता झालेली नाही, भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहू विमान (कार्गो प्लेन) अरूणाचल प्रदेशच्या पर्वतीय प्रदेशात अचानक बेपत्ता झाले. नुकतेच त्याचे ... Read More »

कॉंग्रेसचे दहा आमदार फुटणार होते

>> भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट >> भाजपमध्ये विलीनीकरणाची होती तयारी कॉंग्रेस पक्षाच्या कुठल्याही आमदारांशी भाजप प्रवेशाबाबत चर्चा केलेली नाही. कॉंग्रेसच्या १० आमदारांनी पंधरा दिवसांपूर्वी आपल्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यासाठी संपर्क साधला होता. परंतु, भाजपच्या श्रेष्ठींनी कॉंग्रेस आमदारांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडे कॉंग्रेस आमदारांशी चर्चेबाबत ... Read More »

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद

शतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील निरीक्षकाचाही समावेश आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार मारण्यात यश आले. त्यानंतर रात्री ८ वाजता दुसरा दहशतवादी सुरक्षा दलाने ठार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी प्रथम जवानांवर ग्रेनेडद्वारे हल्ला केला. स्फोटानंतर त्यांनी एके – ४७ रायफलने अंदाधुंद ... Read More »

‘वायू’ चक्रीवादळामुळे राज्यात सर्वत्र पडझड

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू या चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली असून सोसाट्याच्या वार्‍यामुळे विविध ठिकाणी झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. राज्यभरात झाडांच्या पडझडीच्या शंभर पेक्षा जास्त कॉल्सची नोंद अग्निशामक दलाकडे झाली आहे. मागील चोवीस तासात फोंडा येथे सर्वाधिक ५६.० मिलिमीटर, मडगाव येथे ५१.३ मिलिमीटर ... Read More »

मुख्यमंत्र्यांकडून कॅसिनो माफियांना घटनात्मक दर्जा

>> गोसुमंचे वेलिंगकर यांची टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॅसिनोंची पाठराखण करणारे वक्तव्य केल्याने गोवा सुरक्षा मंचने जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅसिनो व्यवसाय व कॅसिनो माफियांना जणू अधिकृत आणि घटनात्मक दर्जा सरकारतर्फे बहाल केला असल्याचा आरोप मंचचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी जारी केलेल्या पत्रकातून केला आहे. गोव्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कॅसिनो आवश्यक असून ते हटवता येणार नाहीत, असे ... Read More »

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचे सर्वेक्षण करण्याची गरज

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नोकरी व शिक्षणामध्ये १० टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. सर्वसामान्य गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज आहे, असे माजी खासदार तथा भाजपचे सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर यांनी काल सांगितले. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे सर्वेक्षण नसल्याने या आरक्षणाचा किती लोकांना लाभ होईल हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. पंचायत ... Read More »

विनोद देसाई आपला कर्मचारी कधीच नव्हता!

>> फसवणूक प्रकरणात आयुष मंत्र्यांची साक्ष केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल पणजीच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात हजर राहून त्यांच्या कार्यालयातील कथित माजी कर्मचारी विनोद देसाई यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणी न्यायालयापुढे साक्ष दिली. विनोद देसाई यानी आपणाला गोवा सचिवालयात नोकरी देण्याचे आश्‍वासन देऊन आपणाकडे सहा लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच आपणाकडे आगाऊ २ लाख रुपये घेतले होते, अशी ... Read More »

‘चांद्रयान-२’ १५ जुलैच्या पहाटे झेपावणार

चंद्रावर दुसर्‍यांदा पाऊल ठेवण्यासाठी भारत आता सज्ज झाला असून पुढील महिन्यात १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावणार आहे. तामिळनाडूमधील महेंद्रगिरी आणि बेंगळुरूमधील ब्याळालू येथे यानाच्या अंतिम चाचण्या होतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी काल भारताच्या महत्त्वाकांक्षी व बहुप्रतीक्षित मोहिमेची पत्रकार परिषदेत ही माहिती दिली, तसेच या मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर ... Read More »

भारत- न्यूझीलंड आज आमनेसामने

>> मुसळधार पावसामुळे हिरमोड होण्याची शक्यता भारत व न्यूझीलंड हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी आज क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. उभय संघांनी आत्तापर्यंत आपली अपराजित घोडदौड कायम राखली असूून पाऊस दूर राहिल्यास एका संघाच्या दौडीला आज ब्रेक लागू शकतो. न्यूझीलंडने तीन व भारताने आपल्या दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला आहे. पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड ... Read More »