Daily Archives: June 12, 2019

संशय दूर व्हावा

राज्यामध्ये मच्छीमारी बंदी लागू असल्याने परराज्यांतून आयात होत असलेल्या मासळीतील फॉर्मेलीनच्या वापराचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी कॉंग्रेस पक्षाकडून तो उपस्थित केला गेला असल्याने त्याला राजकीय परिमाण मिळाले असले, तरी हा विषय सर्वसामान्य गोमंतकीयांच्या जीविताशी संबंधित आहे. त्यामुळे त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे. कॉंग्रेसने फॉर्मेलीनचा विषय उपस्थित करताच आरोग्यमंत्र्यांनी व स्वतः मुख्यमंत्र्यांनी तो आरोप फेटाळून लावला आणि गोव्यातील ... Read More »

पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचा आंध्र पॅटर्न!!

ऍड. प्रदीप उमप आंध्र प्रदेशात निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तब्बल पाच उपमुख्यमंत्री नेमून वेगळाच पायंडा पाडला आहे. राज्यातील विविध पाच समाजांमधील हे पाच मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्रिपद असो वा उपपंतप्रधानपद असो, या ‘उपमुख्यमंत्री’ पदाचा कोणताही उल्लेख आपल्या राज्यघटनेत नाही. त्यामुळे संबंधित नेते मंत्री म्हणूनच शपथ घेतात आणि मुख्यमंत्र्यांएवढे त्यांना अधिकारही नसतात! विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री निवडला जातो आणि ... Read More »

बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचलमध्ये सापडल

आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या एएन-३२ या भारतीय वायुसेनेच्या विमानाचे काही अवशेष अरुणाचल प्रदेशातील सिंयांग जिल्ह्यात आढळून आले आहेत. या विमानात एकूण १३ जण होते. भारतीय वायुदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अरुणाचल प्रदेशच्या टाटो भागाच्या ईशान्य भागात १६ किलोमीटर दूर १२ हजार फुटांवरून हे अवशेष काल पाहण्यात आल्याचे म्हटले आहे. आता या विस्तृत भागात शोधमोहीम घेण्यात येणार आहे. वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या एएन-३२ विमानाचे ... Read More »

कॅसिनो पर्यटनाचा भाग, बंद करणे अशक्य : मुख्यमंत्री

गोव्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कॅसिनो आवश्यक असून सरकार ते बंद करू शकत नाही अथवा पूर्णपणे त्यांना हटवू शकत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल गोवा पर्यटन विकास महामंडळात अनौपचारिकरीत्या पत्रकारांशी बोलताना सांगितले. मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत गोवा पर्यटन विकास महामंडळाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी वरील उद्गार काढले. पर्यटन म्हटले की अन्य ... Read More »

‘वायू’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून आगामी दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पणजी हवामान विभागाचे संचालक डॉ. के. व्ही. पडगलवार यांनी काल दिली. मंगळवारी संध्याकाळी पणजी व इतर भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. समुद्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात ... Read More »

‘वायू’च्या भीतीने चीनची जहाजे भारताच्या आश्रयाला

संभाव्य चक्रीवादळ ‘वायू’ पासून वाचण्यासाठी चीनची दहा जहाजे भारताच्या आश्रयाला आली असून या जहाजांना रत्नागिरीच्या बंदरावर आश्रय देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक महानिरीक्षक के. आर. सुरेश यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय तटरक्षक विभागाने या दहा जहाजांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत राहण्यास परवानगी दिली आहे. हवामान खात्याच्या मते अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे वायू हे ... Read More »

वायू’चा सामना करण्यासाठी अमित शहांनी घेतली बैठक

‘संभाव्य चक्रीवादळ ‘वायू’ला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असून काल गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांसह हवामान विभागाशी निगडीत संस्थांच्या अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अमित शहा यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना संभाव्य चक्रीवादळापासून नागरिकांना कोणतेही नुकसान होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्याचे निर्देश दिले. याशिवाय वीज, टेलिफोन, आरोग्य व पिण्याचे पाणी या गरजेच्या सेवांची उणीव भासणार ... Read More »

आणखी फुटीर आमदार भाजपात नको

>> सांतआंद्रेचे भाजप कार्यकर्ते आक्रमक दुसर्‍या पक्षातील आमदारांना भाजपमध्ये प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर सांतआंद्रे मतदारसंघातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून काल रामराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांची भाजप कार्यालयात जाऊन भेट घेऊन सांतआंद्रे मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी केली. यावेळी सांतआंद्रेतील भाजप कार्यकर्त्यांनी फ्रान्सिस सिल्वेरा ... Read More »

भाजपच्या नूतन प्रदेशाध्यक्षांची निवड आगामी तीन महिन्यांत

>> विनय तेंडुलकर यांची माहिती भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड आगामी तीन महिन्यात केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. देशभरात भाजपची संघटनात्मक निवडणूक घेतली जाणार आहे. येत्या १३ जून रोजी नवी दिल्ली येथे होणार्‍या बैठकीत संघटनात्मक निवडणुकीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. संघटनात्मक निवडणुकीपूर्वी भाजपची सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात ... Read More »

बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांची निदर्शने

>> थकीत वेतन त्वरित देण्याची मागणी >> साखळी पद्धतीने धरणे व निदर्शने बीएसएनएलमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना गेल्या ५ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कालपासून या कर्मचार्‍यांनी साखळी पद्धतीने निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. काल पहिल्या दिवशीच्या धरणे व निदर्शनाच्या कार्यक्रमात सुमारे २० कर्मचारी सहभागी झाले होते. सर्व महिन्यांचे थकीत वेतन विनाविलंब देण्यात यावे, अशी मागणी निदर्शकांनी यावेळी केली. कंत्राटदार कर्मचार्‍यांच्या ... Read More »