Daily Archives: June 11, 2019

चतुरस्त्र

नाटककार, लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, अनुवादक, प्रशासक, पुरोगामी विचारवंत…! काल अनंताच्या यात्रेला निघून गेलेले गिरीश कर्नाड यांची ओळख ही अशी बहुपदरी. या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची कर्तबगारी. भाषेच्या मर्यादाही त्यांना नव्हत्याच. मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि अन्य दाक्षिणात्य भाषांमधून कर्नाड आपल्या प्रतिभेचा ठसा चौफेर उमटवत मुक्तपणे वावरले. गिरीश कर्नाड या नावाभोवती वलय निर्माण करणारी एक प्रदीर्घ कारकीर्द त्यातून घडत गेली. ... Read More »

गिरीश अंकल, मी आणि चेलुवी

सोनाली कुलकर्णी ‘चेलुवी’ हा माझा पहिला चित्रपट. गिरीश कर्नाडांसारख्या दिग्गज कलाकाराबरोबर तो करण्याचा योग नशिबी आला, हे माझं सुभाग्य मानते, कारण या पहिल्याच चित्रपटाने माझ्या कारकीर्दीतल्या पंखांमध्ये भरारी भरली. चित्रीकरणादरम्यान गिरीश अंकलनी मला खूप संाभाळून घेतलं. अभिनयाबाबत खुप काही शिकवलं. माझ्याकडे आजही गिरिश अंकलची खूप पत्रं आहेत. त्या सर्व आठवणींचा बंद कप्पा त्यांच्या जाण्यानं उघडला… मी दहावीत असताना सत्यदेव दुबे ... Read More »

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना १० टक्के आरक्षण

>> शिक्षण व नोकर्‍यांमध्ये मिळणार आरक्षण >> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती राज्यातील सर्वसामान्य गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण व नोकर्‍यांत १० टक्के एवढे आरक्षण देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. केंद्र सरकारने आरक्षण नसलेल्या सर्वसामान्य गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण देण्याची सोय केली आहे त्यानुसार हे आरक्षण देण्यात येईल. सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ... Read More »

प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

सर्जनशील लेखन, नवदृष्टी देणारे दिग्दर्शन आणि प्रभावी पण, संयत अभिनयामुळे भारतीय साहित्य व कला क्षेत्रावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे काल सोमवारी बेंगळुरूत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना ... Read More »

वादळी वार्‍यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

वादळी वारा व गडगडाटासह आज मंगळवारी राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून त्याचे रुपांतर वादळात होणार आहे. हे वादळ गोव्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकणार आहे. मात्र, या वादळाचा तडाखा हा किनारपट्टीलाच बसणार असल्याचे पणजी वेधशाळेचे संचालक कृष्णमूर्ती यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंगळवारी राज्यात मोठ्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल. ... Read More »

कॉंग्रेसचा आरोप निराधार ः भाजप

भाजप ५०-६० कोटी रु. देऊन कॉंग्रेसचे आमदार फोडून विकत घेऊ पाहत आहे, असा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर केलेला आरोप निराधार व खोटा असून त्यांच्याकडे काही पुरावा असेल तर तो त्यांनी सादर करावा, असे आव्हान प्रदेश भाजप अध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी काल दिले. पुढील किमान २५ वर्षे केंद्रात भाजपचेच सरकार असेल. त्यामुळे सर्व राज्यांतील विरोधी पक्षांचे आमदार ... Read More »

पावसाचे पाणी खाण खंदकांमध्ये साठवणार

>> लवकरच कायद्यात दुरुस्ती : मुख्यमंत्री राज्यातील खाण खंदकांचा पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वापर करण्यासाठी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच, पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नद्यांवर लोकांच्या सहकार्यातून नवीन बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. मुख्यमंत्र्यांनी जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांच्यासमवेत जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन राज्यातील सध्याच्या ... Read More »

डॉ. प्रेमानंद रामाणी यांना गोमंत विभूषण पुरस्कार जाहीर

जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांना २०१८ चा गोमंत विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आल्तिनो, पणजी येथील मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गोमंत विभूषण पुरस्कार निवड समितीची बैठक काल झाल्यानंतर डॉ. रामाणी यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. या पुरस्कारासाठी ६ जणांनी अर्ज केले होते. या सर्व अर्जांवर बैठकीत चर्चा ... Read More »

युवराज सिंग निवृत्त

टीम इंडियाचा अष्टपैलू युवराज सिंग याने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. हा कटू निर्णय जाहीर करताना त्याचे डोळे पाणावले होते. नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात मिळवलेला विजय, लाहोरमध्ये ठोकलेले शतक, वर्ल्ड कपमध्ये केलेली कामगिरी या आयुष्यभर पुरणार्‍या आठवणी असल्याचे तो म्हणाला. स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही जे अशक्य आहे ते ही साध्य करू शकता असा मूलमंत्र युवीने तरूणांना ... Read More »

नंदिनी सारिपल्लीला बुद्धिबळाचे राज्य विजेेतेपद

मडगावच्या नंदिनी सारिपल्ली हिने अखिल गोवा महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या सहाव्या व अंतिम फेरीत तिने गुंजल चोपडेकरविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. ५ विजय, १ बरोबरी अशी कामगिरी करत तिने ५.५ गुणांची कमाई केली. पणजीच्या तन्वी हडकोणकर तर बार्देशच्या सयुरी नाईकने यांनी प्रत्येकी ५ गुणांसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. काणकोणच्या सान्वी नाईक गावकरने चौथा, तिसवाडीच्या गुंजल ... Read More »