Daily Archives: June 8, 2019

आधी हे करावे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रशासनावरील आपली पकड मजबूत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. जनतेची सतावणूक करणार्‍या सरकारी कर्मचारी वा अधिकार्‍यांची आपण गय करणार नसल्याचे त्यांनी आपल्या पहिल्या ‘जनता दरबारा’त ठणकावले. डॉ. सावंत हे स्वतः ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे त्यांना जनसामान्यांना सरकारी कार्यालयांमध्ये ज्या प्रकारच्या सतावणुकीला सामोरे जावे लागते, त्याची नक्कीच जाणीव आहे. त्यामुळे सामान्य जनतेला सरकारी खात्यांमध्ये चांगली ... Read More »

जम्मू काश्मीर विधानसभा पुनर्रचनेचा मास्टरस्ट्रोक!

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जम्मू काश्मीर विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा विचार केंद्रीय गृहमंत्रालय करीत असल्याच्या वार्ता आल्या आणि काश्मीरमधील राजनेते, फुटिरतावादी आदींचे धाबे दणाणले. सरकार खरोखरच अशी पुनर्रचना करण्यासाठी पावले टाकणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु तसे घडले तर तो नक्कीच जम्मू काश्मीर समस्येवरील एक मास्टरस्ट्रोक ठरेल! नवीन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदभार स्वीकारताच आयबी प्रमुख राजीव ... Read More »

अतिरिक्त खाते वाटप निर्णय तूर्त स्थगित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खात्याचे वाटप करण्याचा निर्णय घेऊन खात्यांच्या वाटपासंबंधी एक अधिसूचना तयार करून राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्याची तयारी केली होती. तथापि, अतिरिक्त खाते वाटपाची माहिती मान्यतेपूर्वीच जाहीर झाली. अतिरिक्त खाते वाटपाबाबत काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याने अतिरिक्त खाते वाटपाचा निर्णय तूर्त स्थगित ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी काल दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत ... Read More »

कुडतरीतील तरुणी रिवणमध्ये मृतावस्थेत

>> खूनाच्या संशयावरून युवकास अटक मायणा-कुडतरी येथील वेलन्सिया फर्नांडिस (वय ३०) या तरुणीचा अज्ञाताने गळा दाबून खून करून तिचा मृतदेह वाणशी-रिवण येथील निर्जन ठिकाणी झुडपात टाकून दिल्याने त्या भागात काल मोठी खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना धागेदोरे मिळाले असून पोलिसांनी संशयावरून शैलेश वेळीप (वय ३५) या रिवणमधील युवकास अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की मडगाव येथील एका आस्थापनात वेलन्सिया ... Read More »

आंध्र प्रदेशात ५ उपमुख्यमंत्री!

>> मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा निर्णय देशाच्या राजकीय इतिहासात आंध्र प्रदेश राज्य एक नवा पायंडा पाडणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या २५ सदस्यीय मंत्रिमंडळात एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय काल घेतला. नव्या मंत्रिमंडळाची स्थापना आज शनिवारी अमरावती येथील जाहीर सोहळ्यात होणार आहे. हे उपमुख्यमंत्री पाच विविध समाजांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ... Read More »

निती आयोगाच्या बैठकीवर ममतांचा बॅनर्जींचा बहिष्कार

>> आयोगाला आर्थिक अधिकार नसल्याचे दिले कारण फेररचना करण्यात आलेल्या निती आयोगाची विशेष बैठक येत्या दि. १५ जून रोजी बोलावण्यात आली असून त्यासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळविले आहे. मोदी सरकारच्या या आधीच्या बैठकांनाही बॅनर्जी यांनी उपस्थिती लावण्याचे टाळले ... Read More »

किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण आराखड्याच्या मसुद्यावर जनसुनावणी

>> ७ जुलैला ताळगाव व फातोर्ड्यात सुनावणी गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे (जीसीझेंडएमए) किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याच्या (सीझेंडएमपी) मसुद्यावर येत्या ७ जुलै रोजी जिल्हा पातळीवर पणजी व मडगाव येथे जन सुनावणी घेतली जाणार आहे. नागरिकांनी या आराखड्याच्या मसुद्याबाबत येत्या ३० दिवसात सूचना, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन जीसीझेडएमएचे सदस्य सचिव रवी झा यांनी केले आहे. ७ जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ... Read More »

काणकोण, फोंडा टॅक्सी संघटनांचाही गोवा माईल्सविरोधात आंदोलनाचा इशारा

गोवा सरकार गोवा माईल्स टॅक्सी असोसिएशनच्या नावाखाली गोव्यातील टॅक्सी चालकांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत असून येत्या मंगळवार पर्यंत वाहतूक संचालक निखिल देसाई यांची बदली केली नाही आणि गोवा माईल्स टॅक्सी असोसिएशनला हद्दपार केले नाही तर जिंकू किवा मरू हा नारा देत रस्त्यावर येण्याचा इशारा अखिल गोवा टॅक्सी युनियनने तारीर राजबाग येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात घेतलेल्या काणकोणच्या टॅक्सी युनियनच्या बैठकीच्या वेळी ... Read More »

नदाल अंतिम फेरीत

लाल मातीवरील निष्णांत खेळाडू राफेल नदाल याने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत काल शुक्रवारी स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याला ६-३, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराजित करत अंतिम फेरीत प्रवेश केला. फ्रेंच ओपनमधील नदालचा हा सलग २२वा विजय होता. तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धेत फेडररचा सलग तीन सेटमध्ये पराभव करण्याची नदालची ही तिसरी वेळ आहे. २००८ सालच्या फ्रेंच ओपनमध्ये नदालने ... Read More »

सीएफजी ग्रुपची मुंबई सिटी एफसीत भागीदारी

>> स्पेनचा स्टार डेव्हिड विला आयएसएलमध्ये खेळणार ? सिटी फुटबॉल ग्रुप (सीएफजी) या प्रीमियर लीग विजेत्या मँचेस्टर सिटी क्लबच्या मालक समुहाने इंडियन सुपर लीगमधील फ्रेंचायझी असलेल्या मुंबई सिटी एफसी संघात मोठी गुंतवणूक करून फ्रेंचायझीतील बहुतांश भागीदारी व नियंत्रण मिळविण्याची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आणली आहे. फ्रेंचायझीचे जवळपास २५० कोटी रुपये बाजारमूल्य असून बिमल पारेख व रणबीर कपूर यांच्या संयुक्त मालकीची ... Read More »