Daily Archives: June 6, 2019

सरकार बळकट

डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांच्यासारख्या एका साध्या, सालस व्यक्तीची निवड गोवा विधानसभेच्या सभापतीपदी झाली आहे. पाटणेकर यांना सभापतीपदी आणून भाजपाने त्यांच्या ज्येष्ठतेचा मान तर राखला आहेच, परंतु त्याचबरोबर सत्ताधारी पक्षामध्ये राहूनही संशयास्पद वर्तणूक करणार्‍यांना चार हात दूर ठेवून आणि सभापतीपदासारख्या महत्त्वाच्या पदावर एक विश्वासार्ह चेहरा आणून राजकीय स्थैर्याची अप्रत्यक्ष तजवीजही केली आहे. हंगामी सभापतीपद भूषविलेल्या मायकल लोबो यांचे एकंदरित वर्तन ... Read More »

आता दाऊदचा नंबर?

शैलेंद्र देवळणकर केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आल्यामुळे पाकिस्तानात अस्वस्थता आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकपाठोपाठ मौलाना मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून भारताने पाकिस्तानची नियोजनबद्ध कोंडी केली. आता येणार्‍या पाच वर्षांच्या काळात दाऊद इब्राहीमला भारतात आणण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. खुद्द दाऊदने याबाबत भीती व्यक्त करत त्याने आयएसआयकडे संरक्षणाची मागणी केली आहे… देशाची आर्थिक राजधानी मुंबई १९९३ मध्ये साखळी ... Read More »

रोजगारवाढीसाठी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समित्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी दोन नव्या मंत्रिमंडळ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. केंद्रात नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर लगेच देशातील बेरोजगारीची गंभीर समस्या समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी या पार्श्‍वभूमीवर काल आर्थिक विकास व गुंतवणूक तसेच रोजगार निर्मितीवाढ करण्याच्या हेतूने नव्या मंत्रिमंडळ समित्या तयार केल्या. यापैकी गुंतवणूक व विकास समितीवर गृहमंत्री ... Read More »

वर्ल्ड कप ः भारताचा दिमाखदार शुभारंभ

सामनावीर रोहित शर्माच्या नाबाद (१२२) शतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या विश्‍वचषक २०१९ स्पर्धेतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६ गड्यांनी पराभव करीत भारताने आपल्या मोहिमेचा दिमाखदार शुभारंभ केला. प्रथम फलंदाजीस उतरल्यानंतर द. आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे उद्दिष्ट ४७.३ षटकांत ४ गडी गमावून पार केले. रोहित शर्माची नाबाद शतकी खेळी १३ चौकार व २ उत्तुंग षटकारांनी सजली. ... Read More »

आणखी कॉंग्रेस आमदारांना भाजपात न घेण्याचा निर्णय

>> विनय तेंडुलकर ः तीन कॉंग्रेस आमदार अजून संपर्कात पणजी, म्हापसा, मांद्रे व शिरोडा या चार मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीत तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपचा विजय झाल्याने राज्यातील भाजप नेतृत्वाखालील आघाडी सरकार बळकट झालेले आहे. त्यामुळे विरोधी कॉंग्रेस पक्षातील काही आमदार भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असले तरी त्यांना पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर ... Read More »

मानकुराद लागवडीचे प्रमाण राज्यात वाढविणार ः सरदेसाई

गोव्यातील प्रसिद्ध मानकुराद आंब्याचे पीक वाढवण्याची गरज असून त्यासाठी कृषी खाते राज्यभरात मोठ्या प्रमाणात मानकुराद आंब्याची लागवड करणार असल्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी काल मडगाव येथे सांगितले. काल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मडगाव रवींद्र भवन येथे मानकुराद आंब्यांच्या कलमांची लागवड केल्यानंतर ते बोलत होते. सध्या गोव्यात मानकुराद आंब्याचे पीक फारच कमी येत आहे. त्यामुळे गोमंतकीयांना सिंधुदुर्गातून येणार्‍या मानकुराद आंब्यावर अवलंबून रहावे ... Read More »

मान्सून केरळात ४८ तासात शक्य

देशाच्या बहुतेक राज्यांमध्ये प्रचंड वाढलेले तापमान तसेच उष्म्याने लोक हैराण झालेले असतानाच येत्या ४८ तासात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. शेतकर्‍यांप्रमाणेच प्रत्येकजण सध्या पावसाच्या आगमनाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. गोव्यातील शाळा आजपासून सुरू होत असल्या तरी येत्या दोन दिवसात पाऊस सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना उशिरापर्यंत वर्गांमध्ये बसणे उकाड्यामुळे कठीण ठरणार असल्याची पालकांमध्ये चर्चा आहे. यंदाच्या मान्सूनला अपेक्षेएवढा ... Read More »

काश्मीरात काही भागांमध्ये प्रार्थनांनंतर जवानांवर दगडफेक

काश्मीरच्या काही भागांत काल ईद सणानिमित्तच्या प्रार्थना झाल्यानंतर निदर्शक व सुरक्षा दलाचे जवान यांच्यात संघष निर्माण झाला. निदर्शकांनी जवानांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याचे वृत्त आहे. मात्र त्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. राज्यात ठिकठिकाणच्या इदगाह, मशिदी व अन्य धार्मिक जागांवर नमाज पठण तसेच प्रार्थनांसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मात्र प्रार्थना संपल्यानंतर सुरक्षा दलांवर निदर्शकांकडून दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले. उत्तर ... Read More »

गोवा माईल्सबाबत वाद चिघळण्याची शक्यता

गोवा पर्यटक टॅक्सी चालक व गोवा माईल्स टॅक्सी चालकांमधील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. काल बाणावली, कोलवा किनारपट्टी भागांतील व पंच तारांकित हॉटेल प्रवाशांची भाडी मारणार्‍या पर्यटक टॅक्सी मालकांनी आमदार चर्चिल आलेमाव यांची भेट घेतली. चर्चेनंतर आमदार चर्चिल आलेमाव यांनी सांगितले, की काल गोवा माईल्स टॅक्सीपैकी एकही टॅक्सी कोलवा येथे फिरकली नाही. ते गोमंतकीय असल्यास येथे दिसले असते. गोवा ... Read More »

देशभरातील शाळांमध्ये सरकारतर्फे लवकरच रोपवाटिका उपक्रम ः प्रकाश जावडेकर

पर्यावरण मंत्रालय लवकरच देशभरातील शाळांमध्ये रोपवाटिका उपक्रम सुरू करणार असून यामध्ये शालेय विद्यार्थी बियाणे पेरतील, त्याची देखभाल करतील आणि वार्षिक निकालाच्या दिवशी हे रोपटे बक्षीस म्हणून स्वीकारतील असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या उपक्रमात स्थानिक वन विभाग आवश्यक सहकार्य पुरवेल. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला शालेय विद्यार्थी आणि रोपट्यांमध्ये एक कायमस्वरूपी नाते विकसित करायचे आहे असे जावडेकर ... Read More »