Daily Archives: June 5, 2019

यथोचित सन्मान

भारतीय सुरक्षानीतीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रोत्साहित करून सक्रिय साथ देणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुन्हा पाच वर्षांसाठी मोदींनी आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमले आहे. डोवाल यांना यावेळी कॅबिनेट दर्जाही देण्यात आला आहे. ही फेरनियुक्ती त्यांच्या कर्तबगारीचा आणि विश्वासार्हतेचा सन्मान तर आहेच, परंतु त्या नेमणुकीतून मोदींनीही जगाला एक सुस्पष्ट संदेश दिलेला आहे की भारत यापुढे ... Read More »

चर्चा ‘फेसबुक’च्या चलनाची

ऍड. प्रदीप उमप फेसबुकने ‘ग्लोबलकॉईन’ हे स्वतःचे आभासी चलन म्हणजे क्रिप्टोकरन्सी बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेसह अनेक देशांमधील नियामक यंत्रणांकडून त्याविषयी विविध शंका आणि हरकती उपस्थित केल्या गेल्या असून, अनेक अडथळ्यांची शर्यत फेसबुकला अद्याप पार करायची आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत ङ्गेसबुकचे चलन दैनंदिन जीवनाचा भाग बनेल, असे छातीठोकपणे सांगणारे आहेतच!.. फेसबुकने क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ... Read More »

राजेश पाटणेकर विधानसभेचे सभापती

>> प्रतापसिंह राणेंचा २२ वि. १६ मतांनी पराभव ः चर्चिल आलेमाव राहिले अनुपस्थित गोवा विधानसभेचे नवे सभापती म्हणून काल भाजपचे राजेश पाटणेकर यांची निवड झाली. सभापतीपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत भाजपचे राजेश पाटणेकर यांनी कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे यांचा २२ विरुद्ध १६ मतांनी पराभव केला. पाटणेकर यांना भाजपचा १६ आमदारांसह गोवा फॉरवर्डच्या ३ व ३ अपक्षांची मिळून २२ मते मिळाली, तर कॉंग्रेसचे ... Read More »

सोनसडा कचरा प्रक्रिया प्रकल्पाची जबाबदारी घनकचरा महामंडळाकडे

सोनसडा-मडगाव येथील कचरा विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणार्‍या फोमेंतो कंपनीने या कामातून अंग काढून घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सरकारने सोनसडा येथील कचर्‍याची जबाबदारी गोवा घन कचरा महामंडळाकडे सोपवण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत घेतला. सोनसडा येथील कचर्‍याला आग लागण्याची घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल ही उच्चस्तरीय बैठक झाली. पुढील तीन ... Read More »

बारावीची पुरवणी परीक्षा ७ ते १४ जून दरम्यान

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जूनमध्ये घेण्यात येणारी इयत्ता १२ वी ची पुरवणी परीक्षा ७ ते १४ जून दरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १८०० मुलांनी नोंदणी केली असून परीक्षा म्हापसा आणि नुवे- मडगाव येथे दोन केंद्रातून घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या मध्ये १०९४ मुलगे आणि ७०६ मुलींचा समावेश आहे. परीक्षा सकाळी ९.३० आणि संध्याकाळी २.३० ... Read More »

शौचालय नसलेल्यांना सरकार जैविक शौचालये पुरविणार

येत्या ३१ ऑगस्टपर्यंत गोवा हागणदारीमुक्त राज्य बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असून त्यासाठी ज्या लोकांना शौचालयाची सोय नाही त्यांना जैविक शौचालये पुरवण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. ज्यांना जैविक शौचालये हवी आहेत त्यांना आपल्या पंचायतीत अथवा नगरपालिकेत उपलब्ध असलेले अर्ज घेऊन ते भरून द्यावे लागतील. ३० जूनपर्यंत हे अर्ज उपलब्ध असतील. सर्वसामान्य गटातील लोकांना शौचालयासाठी ... Read More »

विजयारंभास टीम इंडिया सज्ज

>> पराभवांची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा जिंकण्याच्या आपल्या मोहिमेला टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरुवात करणार आहे. स्पर्धेत सहभागी संघांचे एक किंवा दोन सामने झालेले असताना भारत आपला पहिलाच सामना आज खेळणार आहे. खेळपट्टींचे स्वरुप व प्रतिस्पर्ध्यांच्या क्षमतेची झलक सुरुवातीच्या आठवड्यांत भारतीय संघाला पहायला मिळाल्यामुळे याचा फायदा संघाला होऊ शकतो. इंग्लंडमधील वातावरणाचा अंदाज आल्याने तसेच टीम ... Read More »

महिला नूतन हायस्कूलला अजिंक्यपद

रिजुल पाठकने १५ चौकार व एका षटकाराच्या ७० चेंडूत ९२ धावांच्या जोरावर तसेच सार्थक देसाईने ३२ धावात ४ बळींच्या बळावर दक्षिण गोवा विभाग विजेत्या महिला नूतन हायस्कूलने उत्तर गोवा विजेत्या शारदा मंदिरचा ३६ धावांनी पराभूत गोवा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या १४ वर्षाखालील अध्यक्षीय करंडक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. कांपाल साग मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात महिला नूतन हायस्कूलने प्रथम फलंदाजी ... Read More »