Daily Archives: June 4, 2019

दांडगाई नको!

गोवा माइल्स या गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालित ऍप आधारित टॅक्सीसेवेच्या चालकाला कोलवा येथे बाहुबली राजकारणी चर्चिल आलेमाव व समर्थकांकडून झालेली मारहाण निषेधार्ह आहे. सरकारने या प्रकरणात केवळ बघ्याची भूमिका न घेता संबंधितांना गोव्यात कायद्याचे राज्य आहे हे दाखवून देण्याची आवश्यकता आहे. गोव्यातील टॅक्सी व्यवसायातील मुजोरी आणि मनमानी याचा पाढा आम्ही कित्येकदा वाचला आहे. टॅक्सी व्यवसायात हितसंबंध गुंतलेल्या मंडळींनी या ... Read More »

असामान्य निवडणुकीचा असामान्य निकाल

देवेश कु. कडकडे दर वेळी धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाजपाला राजकीय अस्पृश्य मानणार्‍या पक्षांचे दिवस आता संपले आहेत. त्यांना मतदारांनी कठोर इशारा दिला आहे. त्यामुळे अशा विषयांवर आपली राजकीय पोळी भाजणार्‍यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. कारण यावेळी भाजपाला देशातील सर्व भागांतून आणि सर्व थरांतून मतदान केल्याचे समोर येत आहे.. सध्या देशात निवडणुकींच्या निकालांबद्दल गल्लीबोळांतून चर्चा चालू आहे. दावे – प्रतिदावे होत ... Read More »

सभापतीपदासाठी आज निवडणूक

>> राजेश पाटणेकर – प्रतापसिंह राणे यांच्यात लढत गोवा विधानसभेच्या आज मंगळवार दि. ४ रोजी होणार असलेल्या खास अधिवेशनात राज्याच्या नव्या सभापतींची निवडणूक होणार असून त्यासाठी या कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे व भाजपचे राजेश पाटणेकर यांच्यात लढत होणार आहे. कार्यवाहू सभापती मायकल लोबो यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११.३० वा. ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. काल सकाळी ... Read More »

मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चित करण्याचा आदेश

उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर कथित बलात्कार प्रकरणी आरोप निश्‍चित करण्याचा आदेश काल दिला असून येत्या १२ जूनला मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चिती केली जाणार आहे. या प्रकरणातील पीडितेच्या सावत्र आई विरोधात आरोप निश्‍चित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांनी आमदार मोन्सेरात यांची कथित बलात्कार प्रकरणाच्या आरोपातून वगळण्याची याचिका ... Read More »

विनयभंगप्रकरणी मोन्सेरातांसह तिघांना सशर्त अटकपूर्व जामीन

येथील जुन्या सचिवालयाजवळील बिग डॅडी कॅसिनो कार्यालयाबाहेर महिलेच्या कथित विनयभंग प्रकरणी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि माजी महापौर यतीन पारेख यांना उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी एका महिलेने पणजी पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे आमदार मोन्सेरात, महापौर मडकईकर आणि माजी महापौर पारेख यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात ... Read More »

१३ जणांसह हवाई दलाचे विमान बेपत्ता

जोरहाट-आसाम येथून काल दुपारी उड्डाण केलेले भारतीय हवाई दलाचे आंतोनोव एएन हे विमान अरुणाचल प्रदेशमधून नाहीसे झाले असल्याचे वृत्त आहे. १३ जणांसह जोरहाट येथून या विमानाने दुपारी १२.२५ वा. उड्डाण केले होते व त्याच्याशी शेवटचा संपर्क १ वा. झाला होता. भारतीय हवाई दलाने या घटनेनंतर त्वरित सुखोई-३० लढाऊ व सी-१३० विशेष कार्य विमानांच्या सहाय्याने सर्व साधनसुविधांसह बेपत्ता विमानासाठी शोध मोहीम ... Read More »

कुटुंबियांसह रस्त्यावर येण्याचा पर्यटक टॅक्सी मालकांचा इशारा

>> चर्चिल आलेमाव यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा पर्यटक टॅक्सी मालक हे गोमंतकीय असून त्यांना डावलून परप्रांतियांच्या गोवा माईल्स ऍप टॅक्सींना परवाना देवून सरकार गोमंतकीयांवर अन्याय करीत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून सर्व माहिती दिली आहे. त्यांनी आपण टॅक्सी संघटनांची बैठक घेवून तोडग्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, तोडगा न निघाल्यास गोव्यातील सर्व पर्यटक टॅक्सी चालक कुटुंबियांसह रस्त्यावर येतील असा इशारा ... Read More »

यजमान इंग्लंडचा १४ धावांनी पराभव

>> पाकिस्तानच्या विजयात हफीझ, सर्फराज, वहाबची चमक पाकिस्तानने काल सोमवारी यजमान इंग्लंडचा १४ धावांनी पराभव करत यंदाच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करत ३४८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडचा डाव ९ बाद ३३४ धावांत रोखला. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला ठराविक अंतराने धक्के बसत राहिले. २२व्या षटकांत त्यांची ४ बाद ११८ अशी नाजुक स्थिती ... Read More »

धेंपो क्लबची स्पोर्टिंगवर मात

डॉन बॉस्को ओरेटरी मैदानावर काल सोमवारी झालेल्या जीएफए १८ वर्षांखालील लीग स्पर्धेतील सामन्यात धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने स्पोर्टिंग क्लब दी गोवावर १-० असा निसटता विजय मिळविला. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत उभय संघांनी आक्रमणाचे फार कमी प्रयत्न करताना चेंडूवर ताबा राखण्याला प्राधान्य दिले. स्पोर्टिंगच्या अमन गोवेकर व कामितियो यांनी धेंपोचा बचाव भेदण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. पहिल्या सत्राअखेर सामना गोलशून्य बरोबरीत होता. दुसर्‍या ... Read More »

स्त्रीचा मासिक धर्म आणि तिचे आरोग्य

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) धर्मशास्त्रानुसार या काळात अशुचित्व मानलेले आहे, परंतु जे स्त्रीच्या संरक्षणासाठी असावे, कारण योनिमार्ग या काळात मोकळा असतो, रजस्राव होत असतो आणि सर्व शरीरातील सारभूत रक्त वाहणार्‍या केशवाहिन्या या गर्भाशयाशी संलग्न असतात. त्यामुळे या काळात सांसर्गिक रोग चटकन लागण्याची शक्यता असते. २८ दिवसांची मेन्स्ट्रुअल सायकल असल्याने २८ मे हा ‘जागतिक महिनावारी स्वच्छता दिवस’ (वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन ... Read More »