Daily Archives: June 3, 2019

गुन्हेगारी कथांच्या वाचकांसाठी

गुन्हेगारी कथा वा सत्यकथा उघडेवागडे बटबटीत सत्य आपल्यासमोर ठेवत असल्याने माझ्यासारख्या अनेकांना अशी पुस्तके वाचावीशी वाटत नाहीत, परंतु अशा पुस्तकांचाही स्वतःचा असा एक वाचकवर्ग असतो. त्यांना ही दोन्ही पुस्तके नक्कीच भावतील. एडिटर्स चॉईस परेश प्रभू या साप्ताहिक स्तंभामधून मराठी व इंग्रजीतील नवनवीन पुस्तकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नामांकित प्रकाशनसंस्थांच्या या नव्या कोर्‍या पुस्तकांमध्ये काय दडले आहे याचे कुतूहल शमविण्याचा ... Read More »

दंगल.. क्रिकेटची अन् वादांची

नितीन कुलकर्णी क्रीडा अभ्यासक बहुतांशी क्रीडास्पर्धांमध्ये वादविवाद ठरलेले असतात. बरेचदा अनाठायी वादातून किंवा खेळाडूंच्या असभ्य वर्तनाने देशाची, संघाची बदनामी होते. हे टाळण्यासाठी स्पर्धेत खिलाडूवृत्ती आवश्यक असते. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे हे विजयासाठीची रणनीती म्हणून योग्य असले तरी ते करत असताना उन्माद नसावा. क्रिकेटच्या विश्‍वचषक स्पर्धांना बहुतांश वेळा वादाची झालर राहिली आहे. चुरशीइतकेच या स्पर्धांतील वाद चर्चिले गेले आहेत. ताज्या विश्‍वचषक स्पर्धांच्या ... Read More »

कलियुग

 दत्ताराम प्रभू साळगावकर तो मनुष्य म्हणजे कलियुगाचा अधिपती कली. तो जोपर्यंत बांधून घातलेला होता तोपर्यंत सर्वकाही सुरळीत चालू होतं. पण सुटल्यावर त्यानं आपला प्रताप दाखवला. त्या सासू-सुनेच्या समजूतदारपणात तो घुसला व त्याचं पर्यावसान त्यांच्या हमरी-तुमरीमध्ये झालं!’’ सध्या चालू असलेलं युग हे कलियुग आहे असं म्हटलं जातं. या युगाचा अधिपती कली आहे. मला वाटतं की कली हा कोणी सूत्रधार नसून ती ... Read More »

काटेरी वाट

पुढील पाच वर्षांसाठी देशाचे सुकाणू हाती घेतलेल्या मोदी सरकारपुढील आव्हाने पहिल्याच दिवशी समोर आली आहेत. देशाचा आर्थिक विकास दर आणि बेरोजगारी यांच्या संदर्भातील जी ताजी अधिकृत आकडेवारी समोर आली आहे, त्यामध्ये या दोन्हींमधील घसरण स्पष्ट दिसते आहे. बेरोजगारीसंदर्भातील अहवाल खरे तर निवडणुकीपूर्वीच देशासमोर येणार होता, परंतु तो निवडणुका होईस्तोवर पुढे ढकलला गेला आणि मोदी सरकार सत्तारूढ होताच उघड करण्यात आला. ... Read More »

कॉंग्रेससमोर पर्याय मर्यादितच

ल. त्र्यं. जोशी आज कॉंग्रेस पक्षात सुरु असलेल्या हालचाली कुणाला नाटक वाटतील किंवा कुणाला त्यातून वेगळा अर्थही काढता येईल पण कसाही विचार केला तरी ‘कॉंग्रेससमोर आज अतिशय मर्यादित पर्याय आहेत’ या निष्कर्षाप्रतच यावे लागणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचंड पराभवानंतर आज कॉंग्रेस पक्षात सुरु असलेल्या हालचाली कुणाला नाटक वाटतील किंवा कुणाला त्यातून वेगळा अर्थही काढता येईल, पण कसाही विचार ... Read More »

शत्रुराष्ट्रांच्या घुसखोरीविरोधात कडक पावले उचलणार

>> गोव्यात आगमनानंतर संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती पाकिस्तान, चीनसारख्या राष्ट्रांकडून भारतात घुसखोरी करण्याचे जे प्रकार घडत असतात त्याविरुद्ध आता कडक पावले उचलण्यात येणार आहेत, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यानी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या श्रीपाद नाईक यांचे काल गोव्यात आगमन झाले. विशेषतः पाकिस्तानकडून घुसखोरीबरोबरच भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागलेले असून या ... Read More »

भाजप, कॉंग्रेसचे सभापतीपदाचे उमेदवार आज अर्ज भरणार

गोवा विधानसभेच्या सभापतींची निवड करण्यासाठी मंगळवार ४ जून २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता विधानसभेचे खास अधिवेशन घेतले जाणार असून आज सोमवारी ३ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सभापती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना गती प्राप्त झाली आहे. भाजप आणि कॉंग्रेस पक्ष सभापतिपदासाठी उमेदवार निश्‍चित करण्याच्या तयारीला लागले आहेत. भाजपमध्ये सभापतिपदासाठी चुरस लागलेली आहे. भाजपच्या प्रदेश ... Read More »

बाबूश मोन्सेरात विरोधात आरोप निश्‍चितीबाबत आज निवाडा

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावरील अल्पवयीन युवतीवरील कथित बलात्कारप्रकरणी पणजी जिल्हा व सत्र न्यायालय आज सोमवार ३ जून रोजी आरोप निश्‍चितीबाबत निवाडा जाहीर करणार आहे. या कथित बलात्कार प्रकरणाच्या निवाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अल्पवयीन य्ुवतीवरील बलात्कार प्रकरणी आमदार मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चितीबाबत युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने या प्रकरणाचा निवाडा राखून ठेवलेला आहे. वर्ष २०१६ मध्ये एका अल्पवयीन मुलीने ... Read More »

मद्यपी पतीचा पत्नीनेच केला खून

>> वास्को नौदल वसाहतीतील प्रकार वरुणापुरी – वास्को येथे पती-पत्नीच्या भांडणात, पत्नीने पतीचा लाकडी पट्टीने डोक्यावर वार करून खून केला. पत्नीला वास्को पोलिसांनी अटक केली आहे. वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी वरुणापुरी नौदल वसाहतीत राहणार्‍या कौशलेंद्र प्रतापसिंग चौहान (३३) व संध्या चौहान (३२) यांच्यात भांडण झाले. सदर भांडणाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. कौशलेंद्र चौहान हा दारू पिऊन रोज भांडण करून ... Read More »

राज्य सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या वर्षभरात सक्षम होण्याचा दावा

राज्यातील सहकार क्षेत्रातील शिखर बँक असलेल्या गोवा राज्य सहकारी बॅकेंची खालावलेली आर्थिक स्थिती गेल्या दीड वर्षात सुधारण्यात यश प्राप्त झाले असून सुमारे ६३ कोटी रुपयांची बुडीत कर्जाची थकबाकी वसुली करण्यात यश मिळाले आहे. आगामी वर्षाच्या काळात बँक पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे, अशी माहिती सरकारने नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष तथा चार्टर्ंड अकाउंटंट वासुदेव प्रभू वेर्लेकर यांनी या ... Read More »