Daily Archives: June 1, 2019

टीम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवे मंत्रिमंडळ केंद्रात सत्तारूढ झाले आहे. काल त्यांचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले. देशाच्या चार सर्वोच्च मंत्रिपदांमध्ये मोदींनी यावेळी बदल केल्याचे दिसते आहे. यावेळी प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेतलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मोदींनी गृह खाते सोपवले, मागच्या सरकारमधील गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण खाते दिले, तर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ खाते सोपवले. अर्थातच मोदींनी ... Read More »

नवीन त्रिदलीय संघटना

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) संरक्षण दलांच्या तीनही अंगांंमध्ये ‘जॉइंटमनशीप’ राखण्याचे आणि चपळ, जलद व मारक हालचालींसाठी ‘बेटर टीथ टू टेल रेशो’ निर्माण करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले होते. त्या अनुषंगाने संरक्षण दलांसाठी संवेदनशील असणार्‍या संगणकीय अंतरिक्ष, अंतरिक्ष आणि सांप्रत युगातील नव्या युद्धप्रणालीनुसार होणार्‍या स्पेशल ऑपरेशन्ससाठी एक त्रिदलीय संघटना निर्माण करण्याच्या प्रणालीला मोदींनी हिरवा कंदील दाखवला आहे! जानेवारी २०१७ मध्ये संरक्षण दलांच्या ... Read More »

अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री

>> राजनाथ यांना संरक्षण तर, अर्थमंत्रिपदी >> एस. जयशंकर परराष्ट्रमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप काल दुपारी जाहीर करण्यात आले आहे. भाजपला सलग दुसर्‍यांदा अभूतपूर्व यश मिळवून देण्याबरोबरच गुजरातच्या गांधीनगरमधून निवडणूक जिंकून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व मोदींचे अत्यंत विश्‍वासू सहकारी अमित शहा यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या राजनाथ ... Read More »

विकासदर ६ टक्क्यांपेक्षा खाली

>> मोदी सरकारसमोर आव्हान केंद्रात दुसर्‍यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारला पहिल्याच दिवशी आर्थिक पातळीवर मोठा झटका बसला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आर्थिक विकासदर ६ टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर ५.८ टक्के इतका होता. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७.२ टक्क्यांवर असणारा जीडीपी दर २०१८ -२०१९ या आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांवर आला ... Read More »

अर्थसंकल्प ५ जुलै रोजी

खातेवाटप जाहीर होताच मोदी सरकारने संसदेच्या अधिवेशनाची तारीख जाहीर केली असून १७ जून ते २६ जुलैपर्यंत संसदेचे अधिवेशन चालेल. यादरम्यान ५ जुलैला अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. संसदेचे अधिवेशन १७ जूनला सुरू झाल्यानंतर १९ जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. संसदेचे संयुक्त सत्र २० जूनला होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे यावेळी अभिभाषण होईल. Read More »

सर्व शेतकर्‍यांना पेन्शन

>> पहिल्याच बैठकीत निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसर्‍या पर्वाची धडाक्यात सुरुवात केली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकर्‍यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा देशातील १४.५ कोटी शेतकर्‍यांना थेट लाभ ... Read More »

सोनसोडोवरील आग तीन दिवसांत नियंत्रणात आणणार

>> मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चाधिकार समितीची बैठक सोनसोडो, मडगाव येथील कचर्‍याला लागलेली आग विझविण्यासाठी माती व पाण्याचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली असून आग व धूर येत्या तीन दिवसांत पूर्णपणे नियंत्रणात आणली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोनसोडो कचरा आग प्रश्‍नी आयोजित उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, नगरविकास मंत्री मिलिंद ... Read More »

वेस्ट इंडीजसमोर पाकिस्तानचे लोटांगण

>> केवळ २१.४ षटकांत संपूर्ण संघ १०५ धावांत गारद >> ओशेन थॉमसचे चार बळी ः रसेल, होल्डरचा प्रभावी मारा वेस्ट इंडीजच्या आखूड टप्प्यांच्या गोलंदाजीसमोर काल पाकिस्तान संघाने शरणागती पत्करली. विश्‍वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील विंडीजकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. विंडीजच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव २१.४ षटकांत अवघ्या १०५ धावांत गुंडाळून १३.४ षटकांत विजयी ... Read More »

रॉजर फेडरर चौथ्या फेरीत; प्लिस्कोवा पराभूत

स्वित्झर्लंडच्या तृतीय मानांकित रॉजर फेडररने आपल्या विक्रमी ४००व्या ग्रँडस्लॅम लढतीत विजयाला गवसणी घालताना फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिसर्‍या फेरीत त्याने नॉर्वेच्या कास्पर रुड याचा ६-३, ६-१, ७-६ असा पराभव केला. चौथ्या फेरीत ३७ वर्षीय फेडररसमोर अर्जेंटिनाचा ३२ वर्षीय लियोनार्डो मायेर असेल. जपानच्या सातव्या मानांकित केई निशिकोरी याने पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत सर्बियाच्या लास्लो जेरे याचा कडवा ... Read More »

जग किती बदललंय ना!

 सरिता नाईक (फातोर्डा, मडगाव) त्या गोष्टी ऐकता ऐकता आम्ही त्या काळामध्ये जाऊन पोहोचलो. खरंच, किती वेगळेपण होतं तेव्हाच्या विवाह समारंभात! लग्न होईपर्यंत वधू-वरांनी एकमेकांना पाहिलेलंही नसायचं. मोठ्यांनी पसंत केलं की मग साखरपुडा…… हे सगळं परत एकदा आठवून देणार्‍या आमच्या सहकार्‍यांचे मी मनोमन आभार मानले. गेल्या महिन्यात गोव्यातील काही लोकांचा एक गट शृंगेरीला जाणार होता. त्यांच्याबरोबर मीही जायचे ठरविले. सर्वांनी मडगाव ... Read More »