Monthly Archives: June 2019

संगणकीय धोक्याखालील अण्वस्त्रे

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) अमेरिकेतील न्यूक्लियर थ्रेट इनिशिएटिव्ह, सायबर न्यूक्लियर वेपन्स स्टडी ग्रुपने मे २०१९ मध्ये रशियामध्ये सादर केलेल्या ‘न्यूक्लियर वेपन्स इन न्यू सायबर इरा’ या नव्या अहवालानुसार केवळ संगणकीय धरबंद तंत्रज्ञानाचा (सायबर डेटरण्ट सिस्टिम्स) वापर करून आण्विक अस्त्रांना संगणकीय हल्ल्यापासून (सायबर थ्रेट टू न्यूक्लियर वेपन्स) वाचवता येणे अशक्य नसले तरी अत्यंत कठीण आहे. कुठल्याही राष्ट्राच्या आण्विक धरबंध प्रणालीवर (न्यूक्लियर ... Read More »

किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा फेटाळला

>> सत्ताधार्‍यांसह विरोधकांचा आरोप >> ७ जुलैची जनसुनावणी रद्द ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनीबल कोस्टल मॅनेजमेंट’ या संस्थेने तयार केलेल्या गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात अगणित चुका असून तो स्वीकारता येणार नसल्याचे गोवा सरकारला आढळून आल्याने सरकारने तो न स्वीकारण्याचा निर्णय सरकारने काल घेतला. दरम्यान, या आराखड्यावर ७ जुलै रोजी ठेवलेली जनसुनावणीही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काल हा ... Read More »

टॅक्सीप्रश्‍न तोडग्यासाठी सोमवारी बैठक

‘गोवा माईल्स’ या ऍपधारीत टॅक्सी सेवेला विरोध करीत ‘गोवा माईल्स’मध्ये सहभागी होण्यास गोमंतकीय टॅक्सीवाल्यांनी दिलेला नकार व गोवा माईल्स टॅक्सी विरोधी संबंधित टॅक्सीवाले व गोमंतकीय टॅक्सीचालक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला वाद यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परवा सोमवार दि. १ जुलै रोजी एक विशेष बैठक बोलावली आहे. ही माहिती कळंगुटचे आमदार व उपसभापती मायकल लोबो ... Read More »

नगरविकास मंत्र्यांना हटवा

>> आमदार कार्लुस आल्मेदा समर्थकांची मागणी मुरगाव पालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवडणूक तहकूब केल्याने नगरविकास मंत्री मिलिंद नाईक आणि वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काल कार्लुस समर्थक नगरसेवकांनी आमदारांसमवेत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांचे मंत्रिपद काढून त्यांना उपमुख्यमंत्री करावे अशी खोचक मागणी केली. आमदार कार्लुस आल्मेदा समर्थक नगरसेवक दीपक नाईक व नंदादीप नाईक ... Read More »

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकरांचा राजीनामा

गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या दारुण पराभवानंतरही एकाही नेत्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारली नाही. तसेच राज्यातील मुख्यमंत्री, महासचिव, प्रदेशाध्यक्षांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्याची हिम्मत दाखवली नाही, अशी खंत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल ... Read More »

विनोद देसाईविरुद्ध अजामीनपत्र अटक वॉरंट

नोकर्‍यांचे आमिष दाखवून युवकांना लाखो रु. चा चुना लावल्याचा आरोप असलेला संशयित आरोपी विनोद देसाई हा न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल पणजीचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरतीकुमार नाईक यांनी काल त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याचा आदेश दिला. यासंबंधीची पुढील सुनावणी आता ५ जुलै रोजी होणार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मेर्विन फर्नांडिस यांनी आपले वकील आयरीश रॉड्रिग्ज यांच्याद्वारे विनोद देसाई याच्याविरुद्ध न्यायालयात खटला ... Read More »

ड्रग्ज व्यवहारात गुंतलेल्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी मागविली

>> कठोर पावले उचलणार : मुख्यमंत्री अमली पदार्थ व्यवहार प्रकरणी सरकारने गंभीर पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला असून जे कोण या अनैतिक व बेकायदेशीर धंद्यात गुंतलेले आहेत त्यांच्या नावांची यादी तयार करून ती उद्यापर्यंत (शनिवार) आपणाकडे पाठवण्याचा आदेश अमली पदार्थविरोधी पोलिसांना दिला आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी आपण अमली पदार्थविरोधी पोलीस विभागाच्या अधीक्षकांशी सविस्तरपणे ... Read More »

फिल्म सिटी उभारण्यास सर्वतोपरी मदत : मुख्यमंत्री

>> गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन ‘फिल्म सिटी’ उभारणे हे काम सरकारचे नव्हे. मात्र, सर्वांना एकत्र आणून गोव्यात फिल्म सिटी उभारण्यास ‘विन्सन वर्ल्ड’ने पुढाकार घेतल्यास सरकार सर्वतोपरी मदत करील अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर केली. विन्सन वर्ल्ड आयोजित व ‘इंडिका इशी’ प्रस्तुत या महोत्सवाला शानदार प्रारंभ झाला. यावेळी विशेष अतिथी ... Read More »

द. आफ्रिकेकडून श्रीलंकेचा धुव्वा

>> पराभवामुळे लंकेचा ‘उपांत्य’ प्रवेश धोक्यात गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर हाशिम आमला व कर्णधार फाफ ड्युप्लेसी यांच्या बहारदार अर्धशतकांवर आरुढ होत काल शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा ९ गडी व ७६ चेंडू राखून पराभव केला. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले २०४ धावांचे माफक लक्ष्य द. आफ्रिकेने ३७.२ षटकांत गाठले. या सामन्यापूर्वीच विश्‍वचषक स्पर्धेतील आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले होते. परंतु, या पराभवामुळे लंकेची वाटचाल अधिक ... Read More »

यश फडते उपांत्य फेरीत

>> एशिनय ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप गोव्याचा १७ वर्षीय युवा खेळाडू यश फडतेने तुषार शाहनीला (भारत) नमवित मकाउ येथे सुरू असलेल्या एशिनय ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धेत अंडर-१९ मुलांच्या विभागाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यशने तुषारवर ३-० (११-७, ११-९, ११-९) अशी सहज सरळ सेट्‌समध्ये मात केली. उपांत्य फेरीतील प्रवेशामुळे यशचे पदक निश्‍चित झालेले आहे. हे त्याचे या स्पर्धेतील आतापर्यंतचे तिसरे पदक होय. ... Read More »