ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: May 2019

एक्झिट पोल अंदाजांनुसार केंद्रात पुन्हा एनडीएची सत्ता

लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होण्याआधी काल विविध एक्झिट पोल जाहीर झाले असून त्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. टाईम्स नाऊ – व्हीएमआर यांच्या एक्झिट पोलनुसार एकूण ५४२ जागांपैकी एनडीएला ३०६ जागांवर विजयाची शक्यता आहे. तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए १३२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एबीपी – नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला २६७, ... Read More »

इंग्लंडने वनडे मालिका ४-० अशी जिंकली

>> पाचव्या लढतीत पाकिस्तानवर ५४ धावांनी मात जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गेन यांची दमदार अर्धशतके आणि ख्रिस वोक्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानवर ५४ धावांनी मात करीत पाच सामन्यांची वनडे मालिका ४-० अशी एकतर्फी जिंकली. ५ बळी मिळविलेल्या ख्रिस वोक्सची सामनावीर तर जेसन रॉयची मालिकावीर पुरस्कारसाठी निवड झाली. इंग्लंडकडून मिळलेल्या ३५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४६.५ षट्कांत ... Read More »

रेसबोर्डमध्ये कात्याला रौप्य, आरएसःएक्समध्ये डेनला कांस्य

>> अखिल भारत बोर्ड सेलिंग चॅम्पियनशिप गोवा यॉटिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या अखिल भारत बोर्ड सेलिंग चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धेत गोव्याच्या कात्या कुयेल्होने रेसबोर्ड खुल्या गटात रौप्यपदक प्राप्त केले. तर आरएसःएक्स गटात डेन कुयेल्होला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. काल स्पर्धेच्या चौथ्या व शेवटच्या दिवशी ११व्या शर्यतीअंती आरएसःएक्स गटात गोव्याच्या तिसरे स्थान मिळाले. जेरॉनने सुवर्ण तर एव्हायएन मुंबईच्या मनप्रीत सिंगने रौप्यपदक प्राप्त केले. ... Read More »

मुंबईची पलटनच लई भारी!

 धीरज गंगाराम म्हांबरे मुंबईच्या विजयाचे दोन प्रमुख शिलेदार म्हणून जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या या दुकलीला श्रेय दिल्यास वावगे ठरणार नाही. करणच्या कॉफीमुळे मान खाली घालावी लागल्यानंतर हार्दिकने एका फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत आपल्या कामगिरीने टीकाकारांची तोंडे बंद केली. तर मधल्या षटकांत धावा आटवून दबाव टाकणे व डेथ ओव्हर्समध्ये अचूक दिशा व टप्पा राखून प्रतिस्पर्धी खेळाडूस धोका पत्करण्यास भाग पाडण्याचे ... Read More »

नारायण राणेंच्या राजकीय चढउतारांची कहाणी

एडिटर्स चॉइस – परेश प्रभू   नारायण राणे… महाराष्ट्राच्या – विशेषतः दक्षिण कोकणच्या राजकारणातील एक वादळी नाव. त्यांचा ‘नार्‍या’पासून ‘नारायणरावां’पर्यंतचा राजकीय प्रवास शब्दांकित करणारे ‘No Holds Barred’ हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. याला आत्मचरित्र जरी म्हटले गेले, तरी हे काही परिपूर्ण आत्मचरित्र नाही. हे केवळ राणे यांचे राजकीय आत्मकथन आहे. तेही त्यांच्या नजरेतून मांडलेले अनुभव आहेत, त्यामुळे बरेचसे एकांगीही ... Read More »

हळूच या हो हळूच या!

–  डॉ. सचिन कांदोळकर इवलीशी अन् कोमल त्यांची हृदयं. पण त्यांच्यामध्ये गंधाच्या किती राशी दडलेल्या आहेत! त्याचं सेवन करण्यासाठी कवितेतली फुलं भोवतालच्या फुलपाखरांना नव्हे तर आपल्यालाच बोलावीत आहेत, असं सारखं वाटू लागतं. शाळेत असताना कुसुमाग्रजांच्या ‘अनामिकास’ व ‘सहानुभूती’ या कविता अभ्यासलेल्या होत्या. पण त्याआधी त्यांची आणखी एक कविता येऊन गेली होती. दुसरीच्या ‘बालभारती’ पाठ्यपुस्तकातली ‘हळूच या हो हळूच या’ ही ... Read More »

पणजीचा कौल

संपूर्ण गोव्याचे लक्ष ज्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे, त्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. ही पोटनिवडणूक सरकारच्या स्थैर्यासाठी किती महत्त्वाची आहे हे स्वतः भाजपचे केंद्रीय नेेते नितीन गडकरी यांनीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत सांगितले असल्याने भाजपाच्या लेखी या निवडणुकीला किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ... Read More »

अमेरिका-इराण युद्धाचा पांञ्चजन्य

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जेंव्हा अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर निघते आहे त्या वेळी देखील जर पाकिस्तानने अफगाण तालीबानची बाजू घेतली तर अफगाणिस्तान व युरेशियन देशांकडे जाण्यासाठी भारताला इराणचीच मदत घ्यावी लागेल. युरोपियन देश जास्त स्तरावर अमेरिकेच्या विरोधात जाऊ शकणार नाहीत. कारण अमेरिकेचा आर्थिक प्रकोप किंवा सामरिक मदत बंदी त्यांना परवडणारी नाही. गतवर्षी मे महिन्यामध्ये अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ‘इराण न्यूक्लियर डील ... Read More »

युद्ध हवं की बुद्ध हवा?

 प्रा. रमेश सप्रे अलिकडच्या काळात भारतानं सार्‍या जगाची नजर चुकवून जे दोन चाचणी-अणुस्फोट घडवले, त्यांच्या यशस्वितेचे सांकेतिक शब्द होते ‘बुद्ध हसला’ नि ‘बुद्ध पुन्हा हसला’. अणुस्फोट नि बुद्ध यांच्यातला हा विरोधाभास नव्हता तर संवाद होता. कारण आपल्या देशाचं आरंभापासूनचं ध्येयच आहे मुळी, ‘शांतीसाठी अणुशक्ती (ऍटम्स फॉर पीस). ते तिघंजण एकमेकांचे घट्ट मित्र असले तरी त्यांची दृष्टी एकमेकापेक्षा भिन्न होती. सूर्याखालच्याच ... Read More »

उन्हाळा गावाकडचा!

सुनेत्रा कळंगुटकर अवघ्या थोड्याच दिवसांत आभाळातून पाऊसपक्षी थेंबांची पिसे सांडत अलगद वसुंधरेवर उतरणार असतो. रसरंगगंधनादाची अनंत हस्तांनी उधळण करणारा, मुलाबाळांना रिझवणारा, मनामनाला आल्हाद देणारा चैतन्यदायी उन्हाळा पुढील वर्षी पुन्हा येण्याचे वचन देऊन सृष्टीचा निरोप घेण्यासाठी सज्ज होतो… फाल्गुनी पौर्णिमेला होळी साजरी होते आणि आभाळातून, झाडांवरून गावात उन्हाळा उतरायला लागतो. उन्हाची धग हळूहळू वाढू लागते. उन्हाच्या काहिलीने झाडं-झुडपं, जनावरांची तगमग होऊ ... Read More »