ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: May 2019

त्सित्सिपासची प्रगती; प्लिस्कोवा द्वितीय

ग्रीसचा युवा स्टार स्टेफानोस त्सित्सिपास याने एटीपी क्रमवारीत वैयक्तिक सर्वोत्तम सहावे स्थान मिळविले आहे. रोममधील शानदार कामगिरीच्या बळावर त्सित्सिपासने उन्नती साधली आहे. उपांत्य फेरीत राफेल नदालकडून पराभूत होण्यापूर्वी त्सित्सिपासने जान्निक सिन्नर व फाबियो फॉनिनी यांचा पराभव केला होता. केई निशिकोरीची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. ‘टॉप १०’मध्ये हा एकमेव बदल झाला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दिएगो श्‍वाटर्‌‌झमन याचे ‘अव्वल २०’मध्ये ... Read More »

आसिफ, वहाब, आमिरचा समावेश

>> पाकिस्तान संघात ऐनवेळी तीन बदल इंग्लंडकडून एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खावा लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पाकिस्तानने विश्‍वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या यापूर्वीच्या संघात तीन मोठे बदल केले आहेत. अनुभवी वहाब रियाझ व मोहम्मद आमिर या दुकलीसह नवोदित स्फोटक फलंदाज आसिफ अली याला १५ सदस्यीय संघात स्थान देताना डावखुरा जलदगती गोलंदाज जुनेद खान, अष्टपैलू फहीम अश्रफ व फलंदाज आबिद अली यांना बाहेरचा ... Read More »

प्रथमेश ः एक सुंदर स्वप्न

डॉ. सुषमा किर्तनी (बालरोगतज्ज्ञ, पणजी) आईवडलांनी त्याला एवढं कामात बिझी ठेवलं की तो दमून आल्यावर त्याला शांत झोप व त्यामुळे निरोगी मन व शरीर यांचा लाभ होईल. त्यामुळे त्याच्या डोक्यात काही वेड्यावाकड्या विचारांना वावच नव्हता. त्याची दिनचर्या जणू त्यांनी आखूनच दिली होती. असा हा प्रथमेश! दातेंनी खरंच एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचा प्रथमेश म्हणजे गणेश बनवला!! ‘डाऊन सिंड्रोम’ किंवा ... Read More »

उन्हाळी फळे आणि त्यांची उपयुक्तता

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) वास्तविक रणरणत्या उन्हामुळे सर्वत्र कोरडेपणा वाढत असताना कलिंगड, द्राक्षं, आंब्यासारखी रसरशीत फळे निसर्ग कसा बरे उत्पन्न करतो? हे एक नवलच आहे. पण उन्हाळ्यातील उष्णतेला आणि कोरडेपणाला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी निसर्गाची ही खास योजना समजावी. आयुर्वेदशास्त्रानुसार दूध व फळे सेवन करण्याच्या वेळात सुमारे दोन तासांचे अंतर ठेवावे. दूध व फळे एकत्र करून कधीच खाऊ नये. ... Read More »

मोदींची तपस्या

गेले दोन – तीन महिने चाललेला सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचा गदारोळ अखेर शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर थांबला. त्यामुळे वादळापूर्वीची शांतता जणू आज देश अनुभवतो आहे. येत्या २३ रोजी निवडणुकीचे निकाल येतील आणि पुन्हा सत्तास्थापनेची धामधूम सुरू होईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ – बद्रिनाथच्या दर्शनाला निघून गेले. निवडणुकीच्या एवढ्या धकाधकीच्या प्रचारसत्रानंतर विश्रांतीसाठी कोणी निघून गेले असते. अटलबिहारी वाजपेयी निवडणुकीनंतर मनालीला निघून जायचे, ... Read More »

घटनात्मक संकटाचा बागुलबोवा

ल. त्र्यं. जोशी खरे तर इथे न्या. गोगोईंचा व्यक्तिगत प्रश्नच नाही. प्रश्न आहे न्यायपालिकेच्या स्वतंत्रतेचा आणि तो प्रस्तुत प्रकरणापेक्षा खूप मोठा आहे. त्या स्वातंत्र्यात बाधा उत्पन्न करण्याचे प्रयत्न न्यायपालिकेच्या लक्षात आले, पण त्याबाबत स्वत: निष्कर्ष काढण्याची घाईही तिने केली नाही. ते शोधून काढण्यासाठी न्या. पटनायक यांच्या नेतृत्वाखाली निवृत्त न्यायमूर्तींची समिती तिने स्थापन केली आहे. तिचे निष्कर्ष अधिक महत्वाचे राहणार आहेत. ... Read More »

पणजी पोटनिवडणुकीत ७५.२५ टक्के मतदान

विधानसभेच्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काल ७५.२५ टक्के मतदान झाले. मतदानाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. या पोटनिवडणुकीसाठी २२,४८२ मतदारांपैकी १६, ९१८ मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुष ८११९ आणि महिला ८७९९ मतदारांचा समावेश आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पणजीत ७८.३८ टक्के आणि २०१७ च्या पोट ... Read More »

पणजीत विजयी होण्याचा सर्वच पक्षांचा दावा

पणजी पोटनिवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानानंतर सत्ताधारी भाजप, कॉंग्रेस, गोवा सुरक्षा मंच व आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षांनी आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा केला आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर म्हणाले की, भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेंकर हे किमान ८०० मतांची आघाडी घेऊन पणजीतून विजयी होतील. पक्षाने पणजी मतदारसंघात नियोजनबद्धरित्या प्रचार केल्याचे सांगून कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ पक्षाला निश्‍चितच मिळेल, असा ... Read More »

लोकसभा ः अंतिम टप्प्यात ६४ टक्के मतदान

लोकसभेसाठी काल झालेल्या अंतिम सातव्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. पं. बंगाल व पंजाबात हिंसाचाराच्या घटना घडल्या. मात्र अन्यत्र मतदान शांततेत पार पडले. विशेष म्हणजे सर्वाधिक ७३.४० टक्के एवढे मतदानही पं. बंगालमध्येच झाले आहे. तर या टप्प्यातील देशभरातील एकूण ५९ मतदारसंघांमध्ये ६४ टक्के एवढे मतदान झाले आहे. शेवटच्या टप्प्यात रिंगणात ९१८ उमेदवार उभे आहेत. या आधीच्या सहा टप्प्यांमध्ये ६६.८८ टक्के ... Read More »

निकालाआधी मायावती सोनिया गांधींना भेटणार

एनडीएविरोधात निवडणूक निकालानंतर महाआघाडी उभारण्यासाठी बसपा नेत्या मायावती २३ मेपर्यंत युपीएच्या नेत्या सोनिया गांधी व कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तेलगू देसमचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी अलीकडेच याच दृष्टीकोनातून सोनिया, राहुल गांधींसह शरद पवार व अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे. नायडू यांनी पुन्हा काल (रविवारी) उभयतांची भेट घेतली. ते लखनौत मायावती यांनाही भेटले आहेत. Read More »