ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: May 2019

विंडीजचा शेय होप पाचव्या स्थानी

>> ‘टॉप १०’ अष्टपैलूंत नाही एकही भारतीय विंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज शेय होप याने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ‘अव्वल पाच’मध्ये प्रवेश केला आहे. पाच स्थानांची उडी घेत त्याने चौथे स्थान प्राप्त केले आहे. आयर्लंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील दमदार कामगिरीच्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे. आघाडी फळीतील या फलंदाजाचे ८०८ गुण झाले आहेत. तिरंगी मालिकेत त्याने २ शतके व ... Read More »

टीम इंडिया लंडनमध्ये दाखल

म इंडिया काल २२ मे रोजी मुंबई येथून  आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी लंडनला रवाना झाली. काल उशिरा भारतीय संघ लंडन दाखल झाला. ३० मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेटच्या या महाकुंभात भारताच्या अभियानाची सुरुवात ५ मे रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या लढतीने होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने १०८३साली कपिल देव याच्या तर २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जगज्जेतेपद प्राप्त केले होते. २१ मे रोजी ... Read More »

विरोधकांची मोर्चेबांधणी

सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आता दोन दिवसांवर येऊन राहिले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी नावाचे तुफान देशात आले आणि त्याने विरोधकांची पार दाणादाण उडवली. विरोधकांना पुन्हा सावरायला बराच काळ जावा लागला. मात्र, हळूहळू विरोधकांनी आपले गमावलेले मनोबल पुन्हा मिळवले आणि मोदीविरोधाची राळ उडवली. नोटबंदी, जीएसटीपासून राफेलपर्यंत आणि असहिष्णुतेपासून हुकूमशाहीपर्यंतचे आरोप मोदींवर केले. निवडणुकीचे सर्व टप्पे आता संपुष्टात आलेले असल्याने मोदींचे ... Read More »

सत्तर वर्षांत काहीच झाले नाही असे कसे म्हणता?

प्रल्हाद भ. नायक (कुडचडे) आपण दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याऐवजी, त्याविषयी बोलण्याऐवजी मोदी गेल्या ७० वर्षांत कॉंग्रेस पक्षाने देशाची कशी वाट लावली त्यावर बोलत राहिले. देशासमोर असलेले प्रश्‍न, बेकारी न सुटण्यास कॉंग्रेस पक्ष कसा जबाबदार व गेल्या ७० वर्षांत देशात काहीच घडलेले नाही हे ते सांगत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही शासन पद्धत स्वीकारली. लोकांनी, लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही, या ... Read More »

राज्यात एक हजार कोटी खर्चून वीज वहन – वितरण सुधारणार

राज्यातील विजेचे वहन व वितरण यात सुधारणा घडवून आणण्याचा वीज खात्याने निर्णय घेतलेला असून त्यासाठीच्या यंत्रणेत १ हजार कोटी रुपये खर्चुन सुधारणा घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती काल खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. हे काम हाती घेण्यासाठी यापूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लोकसभेसाठीची आचार संहिता मागे घेण्यात आल्यानंतर ह्या कामासाठीच्या निविदा काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. विजेसाठीच्या साधनसुविधेत सुधारणा व ... Read More »

गोव्यात मॉन्सूनचे आगमन आठवडाभराने लांबणे शक्य

गोव्यात मान्सूनचे आगमन यंदा आठवडाभराने लांबणीवर पडण्याचा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे. यंदा नैऋत्य मान्सूनचे राज्यात १२ ते १५ जून ह्या दरम्यान आगमन होण्याची शक्यता पणजी वेधशाळेतील सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्यात नैऋत्य मान्सूनचे आगमन ७ जून अथवा ७ जूनच्या आसपास होत असते. मात्र एखाद्या वर्षी काही कारणामुळे हे आगमन लांबते. गेल्या ५ वर्षांत मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर ८ ते ... Read More »

वेर्ले-सांगेत ४०० सुपारी झाडांची कत्तल

>> लागवड करणार्‍या ग्रामस्थांची वन खात्याविरुद्ध तक्रार ः अधिकार्‍यांकडून आज पाहणी नेत्रावळी सांगे अभयारण्य क्षेत्रातील वेर्ले गावात गावकर्‍यांनी लागवड केलेल्या सुपारी झाडांपैकी ४०० झाडांची कत्तल अभयारण्य वनरक्षकांनी केल्याची रितसर तक्रार सांगे पोलीस स्टेशन, सांगे उपजिल्हाधिकारी, सांगे मामलेदार, आमदार व नेत्रावळी ग्रामपंचायतीला सादर केली. या प्रकारामुळे वन खात्याविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी वेर्लेवासियांची बैठक ... Read More »

ऐश्‍वर्या राय मिम्सप्रकरणी विवेक ओबेरॉयला नोटीस

एक्झिट पोल म्हणजे अंतिम अधिकृत निकाल नव्हे असे वक्तव्य करणारे अभिनेते सलमान खान, अभिषेक बच्चन तसेच अभिनेत्री ऐश्‍वर्या राय यांच्या मिम्सचा अभिनेता विवेक ओबेरॉयने फोटो पेस्ट केल्याप्रकरणी त्याला महाराष्ट्राच्या तसेच केंद्रीय महिला आयोगानेही नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी विवेक ओबेरॉय याच्यावर बॉलिवूड कलाकारांसह राजकीय व्यक्तींनीही खरपूस टीका केली आहे. मात्र ओबेरॉयने आपले काही चुकले नसल्याचा दावा केला आहे. ‘लोक मला ... Read More »

पैकुळ सत्तरी येथे युवकाचा बुडुन मृत्यू

पैकूळ-सत्तरी येथील नदीवर सहलीसाठी आलेल्या तरुणांपैकी हजरत अली (वय वर्षे २४, राहणारा पांजरखण कुंकळ्ळी) या युवकाचे नदीत बुडुन निधन झाले. पैकुळ येथील नदीच्या परिसरात सहलीसाठी अठरा जणांचा गट आला होता. सायंकाळी चारच्या दरम्यान हजरत अली हा युवक नदीत बुडाला. त्यामुळे काल सकाळ पासून हजरतची शोध मोहीम वाळपई व फोंडा अग्निशमन दलाकडून जारी करण्यात आली. सकाळी नऊच्या दरम्यान हजरत अलीचा मृतदेह ... Read More »

रस्ता अपघातांत एप्रिलमध्ये गेले २७ जणांचे बळी

एप्रिल महिन्यात राज्यात झालेल्या रस्ता अपघातात २७ जणांचे बळी गेल्याची माहिती वाहतूक खात्यातील अधिकार्‍यांने दिली. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांत सहा पादचारी व एक सायकलचालकाचा समावेश आहे. वाहतूक संचालनालयाने तयार केलेल्या आपल्या मासिक अहवालात एप्रिल महिन्यात एकूण २८४ रस्ता अपघात झाल्याचे नमूद केले आहे. ह्या अपघातापैकी २४ अपघात हे जीवघेणे ठरले. त्यापैकी ६ अपघात उत्तर गोव्यात तर १८ अपघात दक्षिण गोव्यात ... Read More »