ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: May 2019

चेन्नई सुपरकिंग्स फायनलमध्ये

>> अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी भिडणार चेन्नई सुुपर किंग्सने ‘क्वॉलिफायर २’ सामन्यात काल शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी व ६ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणार्‍या अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सशी दोन हात करावे लागणार आहेत. आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची चेन्नईची ही आठवी वेळ आहे. दिल्लीच्या संघाने विजयासाठी ... Read More »

‘युनिक’ बुद्धिबळ स्पर्धेचे सतीश कुमारला जेतेपद

पहिल्या ‘युनिक’ अखिल भारतीय १५५० रेटिंगखालील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद ४५वे मानांकन लाभलेल्या तमिळनाडूच्या २४वर्षीय सतीश कुमार जी. याने पटकावले. स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत त्याने गोव्याच्या एएफएम शिवांक कुंकळ्येकर (१४४६) याचा पराभव करत मुसंडी मारली. युनिक चेस अकादमीनेे केपे बुद्धिबळ संघटनेच्या साहाय्याने केपे सरकारी कॉलेजमध्ये ७ ते ९ मे या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन केले होते. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय ... Read More »

स्पर्धात्मक परीक्षा ः काळाची गरज

 नागेश एस. सरदेसाई आयुष्यात शिक्षणाच्या काळातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे १०वी व १२वी. १२वीनंतर कोणत्या प्रवाहात प्रवेश घ्यायचा आणि त्यासाठी कोणत्या अभिक्षमतात्मक परीक्षा द्याव्या, यासाठी सर्वच विद्यार्थी सज्ज झाले असणार. पण १०वी नंतर असणार्‍या सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षांबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे, असे दिसून येते. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. ‘द नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (एनटीएसई)’- ही परीक्षा माध्यमिक शाळा स्तरावरच्या परीक्षांमधील ... Read More »

चित्रपश्चिमा द ट्रीप टू द मून – चंदेरी दुनिेयेतील चंद्रावरची सफर

– यती लाड भारताने आपले दुसरे चांद्रयान यावर्षी ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरेल अशी घोषणा केली आहे. चंद्र आणि त्यावरची सृष्टी ही केवळ कवी आणि लेखकांनाच नव्हे तर वैज्ञानिकांना व अंतराळवीरांना जशी साद घालत आली, तशीच चित्रपटसृष्टीलाही. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवण्याच्या कित्येक वर्षे आधी एका कलंदराने चंदेरी दुनियेत मानवाला चंद्राची सफर घडविली होती. त्याविषयी – विज्ञान हे मानवी जीवनाला लाभलेले वरदान. ... Read More »

पेडणे आता बदललेय…

 शरच्चंद्र देशप्रभू स्वभाववैशिष्ट्यांचे अनोखे नमुने. काही व्यक्ती परंपरेला धरून चालणार्‍या, रितीरिवाज पाळणारे, चौकटीत राहणारे, जमीनजुमल्याच्या कामात व्यस्त राहणारे तर काही नवी क्षितिजे धुंडाळणारे परिस्थितीमुळे किंवा उफाळलेल्या ऊर्मीमुळे. काही शिक्षणामुळे किंवा नोकरीधंद्यामुळे मुंबईला तात्पुरते स्थायिक झालेले. परंतु यांची नाळ कधी मूळ वास्तुपासून तुटली नाही. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पेडण्याला जाणे घडले. कै. मेघःश्याम ऊर्फ मदनबाबा देशप्रभू म्हणजे आजोबा, यांनी अक्षयतृतीयेप्रीत्यर्थ श्री रवळनाथ मंदिरात ... Read More »

शस्त्रसज्ज?

राज्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे हल्ली एवढे अँग्री यंग मॅन का बनले आहेत कळायला मार्ग नाही. नुकताच त्यांनी एका वरिष्ठ अधिकार्‍याचा मोबाईल रागाच्या भरात हाताने उडवून दिला. गोवा विद्यापीठात रोजगार भरतीमध्ये पंधरा वर्षे वास्तव्याच्या दाखल्याची अट दुर्लक्षिली जात असल्याबाबत बोलताना ‘गोंयकारपण’ जपण्यासाठी प्रसंगी गोमंतकीय युवकांना ‘शस्त्रसज्ज’ करू अशीही गर्जना त्यांनी केली. शस्त्रसज्ज?? म्हणजे महोदयांना नेमके काय म्हणायचे आहे? गोवा फॉरवर्डला ... Read More »

निवडणूक रणधुमाळीत ऐकावे ते नवलच!

शंभू भाऊ बांदेकर विविध पक्षांतील विविध नेते शेरेबाजीद्वारे आचारसंहितेचा भंग करीत आहेत आणि यात ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असे शहाणपण कुणी दाखवताना दिसत नाही. शेवटी या सार्‍या बाता, वार्ता, कुवार्ता किंवा सुवार्ता वाचून, ऐकून ऐकावे ते नवलच! असे म्हणण्याखेरीज आपल्या हातात तरी काय आहे? लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठी सोमवार दि. ६ मे रोजी मतदान पार पडले. यात ७ राज्ये आणि ... Read More »

मेरशी दुहेरी खूनप्रकरणी आरोपींना जन्मठेप

बाल न्यायालयाने मेरशी येथील दुहेरी खून प्रकरणानंतर खून करण्यात आलेल्या नायक दाम्पत्याच्या दोन मुलांचे अपहरण, लैंगिक छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या ओस्बान लुकस फर्नांडिस (मेरशी) आणि रमेश बागवे (मूळ – मालवण) या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ६.७० लाख रुपये दंडाची शिक्षा काल ठोठावली. पणजी येथील बाल न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निवाडा दिला. ३० एप्रिलला आरोपींना दोषी जाहीर ... Read More »

खटल्यांच्या प्रसिद्धीसाठी भाजपची मोन्सेरात यांच्याविरुद्ध तक्रार

पणजी पोट निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांच्यावरील खटल्याबाबत वृत्तपत्रातून माहिती प्रसिद्ध न केल्याप्रकरणी भाजपने येथील मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे काल तक्रार केली. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना त्यांच्याविरोधातील खटल्याची माहिती जाहीर करणे सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशान्वये बंधनकारक केले आहे. कॉँग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खटल्याबाबत माहिती दिलेली आहे. परंतु, मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली तरी वृत्तपत्रातून खटल्याबाबत माहिती प्रसिद्ध केलेली ... Read More »

सरदेसाईंच्या ‘त्या’ वक्तव्याशी माविन गुदिन्हो असहमत

उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या गोंयकाराच्या हितरक्षणासाठी प्रसंगी युवकांच्या हाती शस्त्रे देण्याच्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचे पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍या नेत्यांनी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करताना भान ठेवण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री सरदेसाई यांचे वैयक्तिक मत असावे. राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असेही ... Read More »