Daily Archives: May 25, 2019

मोदी २.०

नरेंद्र मोदी पुन्हा एकवार आपल्या स्वप्नातील नव्या भारताचे नवे संकल्प घेऊन दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणार आहेत. त्यांची पहिली पाच वर्षे प्रशासनाच्या पारंपरिक पद्धती बदलण्यात आणि शिस्त लावण्यात गेली. कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यसंस्कृती आपल्या सरकारमध्ये आणण्याचा प्रयत्न मोदींनी या पहिल्या पाच वर्षांत केल्याचे दिसले. त्यासाठी माहिती तंत्रज्ञानासारख्या आधुनिक साधनांची आणि ब्रँडिंगच्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत त्यांनी घेतली. सरकारचा, त्याच्या विविध खात्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा ... Read More »

लष्करी कारवायांचे हीन राजकारण

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) भारतीय लष्कर मागील ७० वर्षे निष्पक्ष राहिले आहे व यापुढेही राहील. सभोवतालच्या अनेक देशांमध्ये पक्षबाधीत लष्करांनी तेथील लोकशाही सरकारे उलथवून आपली राजवट स्थापन केली. पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय लष्कराला राजकारणात ओढून आपल्या येथील राजनेते व राजकीय पक्षांनी तीच घोडचूक केली आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हीन ... Read More »

तीन नव्या आमदारांमुळे सरकार भक्कम ः मुख्यमंत्री

>> नव्या आमदारांना मंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय नाही ः जुलैत विधानसभा अधिवेशन गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आल्याने भाजप आघाडी सरकार आणखी भक्कम झाले आहे. सरकारचे संख्याबळ २३ वर पोहोचल्याने तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणार आहे. केंद्र सरकारच्या मागील दोन वर्षांत राबविण्यात न आलेल्या विविध नवीन योजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ... Read More »

सूरतेतील इमारतीस भीषण आग ः १७ विद्यार्थी मृत्यूमुखी

>> तिसर्‍या मजल्यावरून उड्या घेतल्याने मृत्यू येथील एका इमारतीला काल दुपारी भीषण आग लागल्याने त्यातील कोचिंग क्लासेसचे १७ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. आग लागल्यानंतर तेथे धुरात गुदमरल्याने या विद्यार्थ्यांनी तिसर्‍या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. त्यात ते मृत्यूमुखी पडले. या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून याप्रकरणाशी पीडितांना सर्व ती मदत द्यावी असे त्यांनी गुजरात सरकारला सुचविले ... Read More »

आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कारांसाठी चौघाजणांची निवड जाहीर

मोले-धारबांदोडा येथील रवींद्र के. गांवकर (शिक्षण), माशेल येथील जयंती वेळीप मयेकर (क्रीडा), केरी-फोंडा येथील दत्ताराम शाणू जल्मी (शेती) आणि केपे येथील श्रीमती आलेमिया डायस ( कला व संस्कृती) यांची राज्य् सरकारच्या आदिवासी कल्याण खात्याच्या आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी एका पत्रकार परिषदेत पुरस्कार विजेत्यांची घोषणा काल केली. कुडचडे येथील रवींद्र भवनामध्ये आज ... Read More »

मडगावात वादळ-पावसाचा फटका ः झाडांची पडझड

गुरुवारी रात्री ११ वाजता गडगडाट, वादळ व पावसामुळे मल्टिपर्पझ कॉलेजमध्ये मतमोजणीच्या वेळी वीज गेल्याने पत्रकारांना अंधारात राहावे लागले. यावेळी तेथील रस्त्यावरून जाणारे दोन स्कूटरस्वार घसरून पडून जखमी झाले. निवडणूक अधिकार्‍यांनी आपल्या कार्यालयात जनरेटरची व्यवस्था केली होती. पण प्रसारमाध्यमांची खोली मात्र अंधारात होती. तेथे उजेडाची व्यवस्था न केल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, नागोवा, बाणावली येथे वीजखांब कोसळून झाडांवर पडले व ... Read More »

ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांची पदत्यागाची घोषणा

Read More »

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला शॉक

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना स्वतःला भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणवणार्‍या पाकिस्तानला नवख्या अफगाणिस्तानकडून विश्‍वचषकासाठीच्या सराव लढतीत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकने विजयासाठी ठेवलेले २६३ धावांचे लक्ष्य अफगाण संघाने ४९.४ षटकांत ७ गडी गमावून गाठताना इतर संघांना इशारा दिला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संंघ पूर्ण पन्नास षटकेदेखील खेळू शकला नाही. अफगाणिस्तानच्या भेदक ... Read More »

श्रीलंकेची शरणागती

विश्‍वचषक स्पर्धेपूर्वीच्या सराव लढतीत काल दक्षिण आफ्रिकेने व्यावसायिक खेळाचे दर्शन घडवताना श्रीलंकेचा ८७ धावांनी पराभव केला. क्विंटन डी कॉक व डेल स्टेन यांना न उतरवतादेखील आफ्रिकेने या सामन्यात बाजी मारली. ३३८ धावा फलकावर लगावल्यानंतर त्यांनी लंकेचा डाव ४२.३ षटकांत २५१ धावांत संपवला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात आक्रमक खेळ दाखवला. सलामीला उतरलेला हाशिम आमला, कर्णधार फाफ ड्युप्लेसी व वेंडर दुसेन यांनी ... Read More »

‘कौशल्य प्रशिक्षण’ ः काळाची मागणी

नागेश एस. सरदेसाई (वास्को) ‘कौशल्य विकास प्रशिक्षण’ हे आजच्या गतिमान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात यशाची किल्लीच असून ते वाढणार्‍या बेरोजगारीचा दर कमी करून, गोव्यासारख्या छोट्या राज्यातसुद्धा उद्योगातील वाढती मागणी बघता नोकर्‍या मिळवून देण्यात अग्रेसर राहू शकते. मित्रांनो, दहावीचा निकाल लागलेला आहे आणि तरुणाई विविध करिअर करण्यासाठी आतुर झालेली आहे. जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे सायन्स, कॉमर्स किंवा कलेच्या क्षेत्रात पाहिजे ते ... Read More »