Daily Archives: May 23, 2019

कौल कोणाला?

शेवटी तो क्षण येऊन ठेपला आहे! सात टप्प्यांमध्ये झालेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. तमाम मतदानोत्तर पाहण्यांनी आजचे निकाल कसे असतील याचे अंदाज वर्तवले आहेत, ते खरे मानले तर नरेंद्र मोदी पुन्हा एकवार धुँवाधार पुनरागमन करतील असे दिसते. या मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष तपासले तर काही अंदाज लक्षवेधी ठरतात. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या भरभक्कम संख्याबळाचा कणा ... Read More »

इकडे आड, तिकडे विहीर

शैलेंद्र देवळणकर पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली आहे. या अर्थव्यवस्थेचा आकार ३०० बिलियन डॉलर्स इतका आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर घटला आहे. सध्या केवळ ३.५ टक्के दराने ती विकसित होत आहे. त्या तुलनेत बांग्लादेश हाही इस्लामिक देश आहे. पाकिस्ताननंतर काही वर्षांनी या देशाची निर्मिती होऊन या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर ७ ते ८ टक्के आहे. पाकिस्तान सध्या प्रचंड आर्थिक गर्तेत ... Read More »

अब की बार किसकी सरकार? आज फैसला

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या प्रदीर्घ व कडव्या रणधुमाळीनंतर अखेर देशात सरकार कोणाचे याचा फैसला आज होणार आहे. सात टप्प्यांत झालेल्या मतदान प्रक्रियेच्या समाप्तीनंतर आज सकाळी ८ वाजल्यापासून देशभरातील मतमोजणी केंद्रांवर लोकसभेच्या ५४२ जागांसाठी मतमोजणी सुरू होणार असून रात्री उशिरा अधिकृत निकाल स्पष्ट होणार आहे. काही राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणीही आज होणार आहे. देशातील अनेक संस्थांनी या निवडणुकीचे एक्झिट पोल अंदाज जाहीर ... Read More »

फ्रान्समधील राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

येथील उपनगरात असलेल्या भारताच्या राफेल पथकाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री झाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्प व्यवस्थापन पथकाचे हे पॅरिसमधील कार्यालय फ्रान्समध्ये सुरू असलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या उत्पादनाचे काम पाहते. तसेच हवाई दलाची एक प्रशिक्षण तुकडीही येथे आहे. या घटनेची माहिती हवाई दलाकडून दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाला दिली आहे. पॅरीसमधील वरील कार्यालयातील तुकडीचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन दर्जाच्या अधिकार्‍याकडून ... Read More »

विश्‍वजित राणे यांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

>> आदेशाचा मसुदा अभिप्रायासाठी पाठविला कायदे तज्ज्ञाकडे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे अपात्रता प्रकरणाच्या आदेशाचा मसुदा अभिप्रायासाठी कायदे तज्ज्ञाकडे पाठविण्यात आल्याने अपात्रता प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी काल दिली. प्रभारी सभापती लोबो यांनी आरोग्य मंत्री राणे अपात्रता याचिकेवरील निवाड्यासाठी २२ मे २०१९ ही तारीख निश्‍चित केली होती. ... Read More »

व्हीव्हीपॅटविषयक विरोधी पक्षांची मागणी आयोगाने फेटाळली

मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम पाच व्हीव्हीपॅट यंत्रांची पडताळणी करावी. तसेच फेरफार आढळल्यास यंत्रांची पडताळणी करावी. तफावत आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅट स्लिपप्सची मोजणी करावी ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगाने काल फेटाळली. २२ पक्षांच्या शिष्टमंडळाने तशी मागणी आयोगाकडे केली होती. कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली २२ पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करताना म्हटले होते की व्हीव्हीपॅटची पडताळणी करताना जर काही ... Read More »

वेर्ले पोफळी कत्तलप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आदेश

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेर्ले – सांगे येथील नागरिकांच्या बागायतीच्या नासधूस प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्वरी येथे एका उच्चस्तरीय बैठकीत या बागायत नासधूस प्रकरणाचा आढावा घेतला असून पोलीस खात्याकडून चौकशीचा आदेश काल दिला. या उच्चस्तरीय बैठकीला स्थानिक आमदार प्रसाद गावकर, मुख्य सचिव परिमल रॉय, माजी मंत्री रमेश तवडकर, मुख्य वनपाल आणि शेतकरी यांची उपस्थिती ... Read More »

मतमोजणीवेळी इव्हीएमवर नजर ठेवणार ः कॉंग्रेस

लोकसभेसह विधानसभा पोटनिवडणुकांच्या आज २३ मे रोजी होणार्‍या मतमोजणीच्या वेळी आमची मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) करडी नजर असेल, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले. मतदान यंत्रे तसेच व्हीव्हीपॅट मोजणीवरही आमचे बारीक लक्ष असेल, असे चोडणकरम्हणाले. पत्रकार व छायापत्रकार यांनाही मतमोजणीच्या सभागृहात प्रवेश देण्यात यावा, अशी कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे. जर सरकारला काहीही लपवायचे नाही व पारदर्शकता बाळगायची आहे ... Read More »

विंडीजचा शेय होप पाचव्या स्थानी

>> ‘टॉप १०’ अष्टपैलूंत नाही एकही भारतीय विंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज शेय होप याने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ‘अव्वल पाच’मध्ये प्रवेश केला आहे. पाच स्थानांची उडी घेत त्याने चौथे स्थान प्राप्त केले आहे. आयर्लंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील दमदार कामगिरीच्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे. आघाडी फळीतील या फलंदाजाचे ८०८ गुण झाले आहेत. तिरंगी मालिकेत त्याने २ शतके व ... Read More »

टीम इंडिया लंडनमध्ये दाखल

म इंडिया काल २२ मे रोजी मुंबई येथून  आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी लंडनला रवाना झाली. काल उशिरा भारतीय संघ लंडन दाखल झाला. ३० मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेटच्या या महाकुंभात भारताच्या अभियानाची सुरुवात ५ मे रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या लढतीने होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने १०८३साली कपिल देव याच्या तर २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जगज्जेतेपद प्राप्त केले होते. २१ मे रोजी ... Read More »