Daily Archives: May 18, 2019

पणजीचा कौल

संपूर्ण गोव्याचे लक्ष ज्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे, त्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. ही पोटनिवडणूक सरकारच्या स्थैर्यासाठी किती महत्त्वाची आहे हे स्वतः भाजपचे केंद्रीय नेेते नितीन गडकरी यांनीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत सांगितले असल्याने भाजपाच्या लेखी या निवडणुकीला किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ... Read More »

अमेरिका-इराण युद्धाचा पांञ्चजन्य

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जेंव्हा अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर निघते आहे त्या वेळी देखील जर पाकिस्तानने अफगाण तालीबानची बाजू घेतली तर अफगाणिस्तान व युरेशियन देशांकडे जाण्यासाठी भारताला इराणचीच मदत घ्यावी लागेल. युरोपियन देश जास्त स्तरावर अमेरिकेच्या विरोधात जाऊ शकणार नाहीत. कारण अमेरिकेचा आर्थिक प्रकोप किंवा सामरिक मदत बंदी त्यांना परवडणारी नाही. गतवर्षी मे महिन्यामध्ये अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ‘इराण न्यूक्लियर डील ... Read More »

युद्ध हवं की बुद्ध हवा?

 प्रा. रमेश सप्रे अलिकडच्या काळात भारतानं सार्‍या जगाची नजर चुकवून जे दोन चाचणी-अणुस्फोट घडवले, त्यांच्या यशस्वितेचे सांकेतिक शब्द होते ‘बुद्ध हसला’ नि ‘बुद्ध पुन्हा हसला’. अणुस्फोट नि बुद्ध यांच्यातला हा विरोधाभास नव्हता तर संवाद होता. कारण आपल्या देशाचं आरंभापासूनचं ध्येयच आहे मुळी, ‘शांतीसाठी अणुशक्ती (ऍटम्स फॉर पीस). ते तिघंजण एकमेकांचे घट्ट मित्र असले तरी त्यांची दृष्टी एकमेकापेक्षा भिन्न होती. सूर्याखालच्याच ... Read More »

उन्हाळा गावाकडचा!

सुनेत्रा कळंगुटकर अवघ्या थोड्याच दिवसांत आभाळातून पाऊसपक्षी थेंबांची पिसे सांडत अलगद वसुंधरेवर उतरणार असतो. रसरंगगंधनादाची अनंत हस्तांनी उधळण करणारा, मुलाबाळांना रिझवणारा, मनामनाला आल्हाद देणारा चैतन्यदायी उन्हाळा पुढील वर्षी पुन्हा येण्याचे वचन देऊन सृष्टीचा निरोप घेण्यासाठी सज्ज होतो… फाल्गुनी पौर्णिमेला होळी साजरी होते आणि आभाळातून, झाडांवरून गावात उन्हाळा उतरायला लागतो. उन्हाची धग हळूहळू वाढू लागते. उन्हाच्या काहिलीने झाडं-झुडपं, जनावरांची तगमग होऊ ... Read More »

पणजीत प्रचारतोफा थंडावल्या

>> सिद्धार्थांच्या कारवर अज्ञातांचा हल्ला >> भाजप-कॉंग्रेसचे परस्परांवर आरोप पणजी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी काल संध्याकाळी ५ वाजता शमली असून उद्या १९ मे रोजी या प्रतिष्ठेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. काल शेवटच्या दिवशी सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस यांच्याबरोबरच गोवा सुरक्षा मंच व आम आदमी या पक्षानेही जोरदार प्रचार केला. दरम्यान, भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या कारवर गुरुवारी मध्यरात्री ... Read More »

कॉंग्रेसने सरकार स्थापनेची दिवास्वप्ने विसरावी ः मुख्यमंत्री

गोव्यात पुढील विधानसभा निवडणुकीतही भाजपचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. २४ मे रोजी गोव्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, अशी दर्पोक्ती करणार्‍या बाबुश मोन्सेर्रात यांनी दिवास्वप्ने पाहू नयेत, असा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला. घटक पक्ष असलेला गोवा फॉरवर्ड, अपक्ष आमदार असलेले रोहन खंवटे, गोविंद गावडे व प्रसाद गावकर ... Read More »

मतमोजणीनंतर गोव्यात सत्तापालट

>> लुईझिन फालेरो यांचा दावा लोकसभा आणि गोवा विधानसभेच्या चार मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीनंतर गोव्यात आणि केंद्रात सत्तापालट होणार आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी कॉंग्रेसच्या आमदारांसमवेत कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, आन्तोनियो फर्नांडिस, क्लाफासियो डायस, फ्रान्सिस सिल्वेरा, ... Read More »

पुन्हा पूर्ण बहुमताचे सरकार येईल : मोदी

निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून आपल्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे असे सांगत पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेले सरकार येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी काल पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या देशाचे आभार ... Read More »

दहावी परीक्षेचा मंगळवारी निकाल

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०१९ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी सकाळी ११.३० वाजता पर्वरी येथे जाहीर करण्यात येणार आहे. २३ मे रोजी सकाळी ९ ते १.३० यावेळेत गुणपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. गोवा शालान्त मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २३ एप्रिल या काळात घेण्यात आली होती. ही परीक्षा २८ केंद्रांतून घेण्यात आली असून ... Read More »

दहावी परीक्षेचा मंगळवारी निकाल

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०१९ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी सकाळी ११.३० वाजता पर्वरी येथे जाहीर करण्यात येणार आहे. २३ मे रोजी सकाळी ९ ते १.३० यावेळेत गुणपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. गोवा शालान्त मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २३ एप्रिल या काळात घेण्यात आली होती. ही परीक्षा २८ केंद्रांतून घेण्यात आली असून ... Read More »