Daily Archives: May 17, 2019

निवडणूक अधिकारी कुणाल यांचे भाजपला झुकते माप : कॉंग्रेस

गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल पक्षपातीपणा करून भाजपला झुकते माप देत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे समन्वयक ट्रॉजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला. येत्या १९ मे रोजी होणारी पोट निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांच्या जागी निःपक्षपाती काम करू शकणार्‍या अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी डिमेलो यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. पणजी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव ... Read More »

हॉटेल्स, निवासी सोसायट्यांचा कचरा स्वखर्चाने उचलणार

>> महापौर उदय मडकईकर यांची माहिती >> मनपा आयुक्तांनी दिला होता नकार पणजी महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील तारांकित हॉटेल्स आणि काही निवासी सोसायट्यांना नोटिसा पाठवून कचरा उचलणार नसल्याचे कळविले असले तरी या हॉटेल्स आणि निवासी सोसायट्यांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. या हॉटेल्स व सोसायट्यांतील कचरा महानगरपालिकेने न उचलल्यास पर्यायी व्यवस्था होईपर्यंत खासगीरीत्या कचरा उचलण्याची व्यवस्था केली जाईल, असे महापौर उदय ... Read More »

सेझा फुटबॉल अकादमी चॅम्पियन

>> जीनो – जीएफए प्रथम विभागीय लीग फुटबॉल सेझा फुटबॉल अकादमीने सां मिंगेल दी ताळगाव संघाचा काल गुरुवारी १-० असा पराभव केला. धुळेर मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. या विजयासह सेझाने जीनो जीएफए प्रथम विभागीय लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सेझाने ३९ पैकी ३४ गुण मिळवताना ११ विजय, १ बरोबरी व १ पराभव अशी कामगिरी केली. कालच्या सामन्यातील निर्णायक गोल सेझाचा ... Read More »

ब्रेंडन, सुसाईराजची शिबिरासाठी निवड

भारतीय फुटबॉल संघाचे नूतन प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनी किंग्स कप फुटबॉल स्पर्धेपूर्वी नवी दिल्ली येथे २० मे पासून होणार्‍या तयारी शिबिरासाठी ३७ खेळाडूंची निवड केली आहे. थायलंडमधील बुरिराम येथे ५ ते ८ जून या कालावधीत सदर स्पर्धा होणार आहे. २०१८-१९च्या आयएसएल मोसमातील ब्रेंडन फर्नांडिस, राहुल भेके, मायकल सुसाईराजसह अनेकांच्या चांगल्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. दुखापतग्रस्त जेजे लालपेखलुआ, हालिचरण नार्झारे, ... Read More »