Daily Archives: May 16, 2019

‘रोड शो’ मध्ये राडा

कोलकात्यात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक ‘रोड शो’ च्या दरम्यान मंगळवारी रात्री राडा झाला. मंगळवारच्याच अंकात ममता – मोदी संघर्ष या अग्रलेखात आम्ही पश्‍चिम बंगालातील भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील सध्याच्या रक्तरंजित संघर्षाची कारणमीमांसा केली होती. या संघर्षाची तीव्रता लक्षात घेता परिस्थिती अधिक बिघडू शकते याची अटकळ होतीच. अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान ती बिघडली ... Read More »

महासत्तांचे व्यापारयुद्ध आणि भारत

शैलेंद्र देवळणकर जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारी अमेरिका आणि दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा चीन यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून व्यापारयुद्ध सुरू आहे. हे युद्ध संपण्याच्या शक्यता दिसत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घोषित केला. परिणामी, हे युद्ध नव्या वळणावर पोहोचले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका – चीन यांच्यामध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. हे ... Read More »

पश्‍चिम बंगालमध्ये प्रचाराचा कालावधी घटवला

>> निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निर्णय >> कलम ३२४चा देशात प्रथमच वापर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील ९ मतदारसंघांमधील निवडणूक प्रचाराचा कालावधी २० तासांनी घटवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून येथील प्रचार थांबवण्याचे आदेश आयोगाने जारी केले आहेत. निवडणूक आयोगाने प्रथमच कलम ... Read More »

बाबुश प्रकरणातील मुलीचा शोध जारी

>> मुख्यमंत्री : सत्य लवकरच उघड माजी मंत्री बाबुश मोन्सेर्रात यांच्या विरोधातील कथित बलात्कार प्रकरणातील बेपत्ता युवतीचा शोध सुरू असून सत्य लवकरच बाहेर येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. सरकारने य्ुवतीच्या बेपत्ता प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून युवतीला ठेवण्यात आलेला आश्रम, शिक्षण घेत असलेले महाविद्यालय व इतर ठिकाणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. ... Read More »

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कुंकळ्येकरांविरोधात तक्रार

ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी भ्रष्टाचार विरोधी शाखेकडे भाजपचे पणजी पोट निवडणुकीतील उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तक्रार काल दाखल केली आहे. भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात २६० एकर जमीन विकत घेतली आहे. ही जमीन सात कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली आहे. कुंकळ्येकर ईडीसी, जीएसआयडीसी आणि स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर कार्यरत होते. त्यामुळे जमीन ... Read More »

पंचवाडी येथील धरणात बुडून सावर्डेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

मापा, पंचवाडी येथील म्हैसाळ धरणात सावर्डे येथील विद्यालयात शिकणार्‍या भगतसिंग गंगासिंग दैया (वय १७) या विद्यार्थ्याचे काल बुधवारी बुडून निधन झाले. ही दुर्घटना संध्याकाळी साडेचार वाजता घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या विद्यार्थ्याचे कुटुंब मूळ राजस्थान येथील असून, ते व्यवसायानिमित्त सावर्डे येथे राहतात. भगतसिंग याने आपण ट्यूशन क्लासला जातो असे सांगून मित्रांसह मापा-पंचवाडी म्हैसाळ धरणाच्या ठिकाणी पोहायला आला होता. ... Read More »

पणजीत जाहीर प्रचाराची उद्या सांगता

गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. निवडणूक प्रचाराचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले असून १७ रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. येत्या रविवार १९ मे रोजी पणजी मतदारसंघात मतदान घेण्यात येणार आहे. या पोट निवडणुकीत एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी चुरशीची चौरंगी लढत अपेक्षित आहे. भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर, कॉंग्रेसचे बाबुश ... Read More »

भाजपचे सांतइनेज नाला सफाईचे आश्‍वासन हवेत विरले

>> कॉंग्रेस पक्षाची टीका >> पंचवीस वर्षे उलटूनही अपयश भाजपने १९९४ ची गोवा विधानसभा निवडणूक लढविताना पणजी शहरातील महत्त्वपूर्ण अशा सांतइनेज खाडीची साफसफाई करण्यात येईल असे जाहिरातीच्या माध्यमातून आश्‍वासन दिले होते. परंतु, २५ वर्षे उलटली तरी भाजपला सांतइनेज खाडीची साफसफाई करता आलेली नाही. या खाडीच्या दुरवस्थेला भाजप जबाबदार आहे, अशी टिका कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड. यतीश नाईक यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या ... Read More »

इंग्लंडकडून पाकचा दारुण पराभव

>> जॉनी बॅअरस्टोवचे तडाखेबंद शतक >> इमाम उल हकचे दीडशतक व्यर्थ जॉनी बॅअरस्टोवने केवळ ७४ चेंडूंत ठोकलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानचा ६ गडी व ३१ चेंडू राखून दारुण पराभव केला. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेले ३५९ धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडने सहज गाठले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. खेळपट्टी फलंदाजीस पोषक असल्याचे जाणूनही इंग्लंडचा कर्णधार ऑईन ... Read More »

बांगलादेश विजयी

तमिम इक्बाल व लिट्टन दास यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशने काल आयर्लंडने विजयासाठी ठेवलेले २९३ धावांचे लक्ष्य ४३ षटकांत गाठले. पॉल स्टर्लिंग (१३०) व विल्यम पोर्टरफिल्ड (९४) या द्वयीच्या शानदार फलंदाजीवर आरुढ होत आयर्लंडने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २९२ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यापूर्वीच आव्हान आयर्लंडचे स्पर्धेतील आव्हान आटोपले होते. त्यामुळे या सामन्याला फारसे महत्त्व नव्हते. १७ रोजी ... Read More »