Daily Archives: May 15, 2019

तिला न्याय द्या

पणजीतील येत्या विधानसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेर्रात यांच्यावरील बलात्काराच्या गंभीर आरोपावर अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच त्या प्रकरणातील तक्रारदार व प्रथम साक्षीदार असलेली पीडित मुलगी अचानक गायब होणे धक्कादायक आहे. येत्या तीन जूनला या कथित बलात्कार प्रकरणातील आरोपनिश्‍चितीबाबत निर्णय होणार असताना अचानक ही पीडिताच गायब होणे आणि तब्बल दहा दिवस त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हाही नोंदवू नये ही बाब गंभीर आहे. ... Read More »

पायरसीची गदा उपजीविकेवर

ऍड. प्रदीप उमप चित्रपट उद्योगासमोर सध्या चाचेगिरीचे अर्थात पायरसीचे मोठे आव्हान उभे आहे. पायरसीमुळे चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांच्या उपजीविकेवरच संकट आले आहे. त्यामुळे या उद्योगातून पायरसीविरोधात आवाज उठत आहेत आणि एकीही दिसून येत आहे. परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी कोणतीही जाणीवजागृती दिसत नाही. चित्रपटांची डिजिटल चोरी करण्याची म्हणजेच पायरसीची समस्या आजकाल अक्राळविक्राळ रूप धारण करताना दिसत आहे. कोणत्याही नव्या चित्रपटाचे डिजिटल ... Read More »

अमित शहांच्या ‘रोड शो’वेळी हिंसाचार

>> कोलकातात तणाव >> शहांच्या वाहनावर दगडफेक >> लाठ्याही भिरकावल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान काल मंगळवारी संध्याकाळी मोठा हिंसाचार झाला. कोलकाता विद्यापीठाजवळून अमित शहा यांचा रोड शो जात असताना अमित शहा उभे असलेल्या ट्रकच्या दिशेने लाठ्या भिरकावण्याबरोबरच दगडफेक करण्याची घटना घडली. यानंतर भाजप आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते भिडल्याने गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा ... Read More »

बाबुशला अडचणीत आणण्यासाठी ‘त्या’ युवतीला गायब केले : कॉंग्रेस

पणजी पोट निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांना निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणण्यासाठी कथित बलात्कार प्रकरणातील युवतीला गायब करण्यात आल्याचा संशय गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल व्यक्त केला. भाजप केवळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी कुठल्याही थरावर जाऊ शकतो. यापूर्वी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी अनेक गैरव्यवहार केलेले आहेत. कथित बलात्कार प्रकरणातील पीडित युवती बेपत्ता होण्यासाठी ... Read More »

खनिज डंपचा जूनमध्ये ई-लिलाव

राज्यातील सुमारे ५ मॅट्रिक टन खनिजाचा ई – लिलाव जून महिन्यात केला जाणार असून खनिज डंप धोरण जुलै महिन्यात तयार केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण व्यावसायिक आणि खाण खात्याच्या अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. या बैठकीत राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला आहे. राज्यातील खाणींवर पडून असलेल्या जुन्या खनिजाचा लिलाव ... Read More »

विरोधकांकडे मुद्दा नसल्यानेच स्मार्ट सिटीबाबत अपप्रचार ः कुंकळ्येकर

स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणार्‍या विकास कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या निकषांनुसार विकास कामांवर निधी खर्च केला जात आहे. विरोधकांकडे निवडणूक प्रचारासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने स्मार्ट सिटीमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा अपप्रचार केला जात आहे, असा दावा भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल केला. स्मार्ट सिटी ही एक पारदर्शक प्रक्रिया आहे. केंद्र सरकारने ... Read More »

कॅसिनो बंद करण्याची गोवा फॉरवर्डची मागणी

सरकारने कॅसिनोसाठी धोरण तयार करण्याची गरज आहे. कॅसिनोचा गोमंतकीयांना लाभ होत नसल्यास कॅसिनो बंद करावेत, अशी मागणी गोवा फॉरवर्डने पत्रकार परिषदेत काल केली. पणजी पोट निवडणुकीसाठी कॅसिनो हा एक मुद्दा बनलेला आहे. गोवा फॉरवर्डच्या कॅसिनोबाबत भूमिका जाहीर करताना पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी वरील माहिती दिली. अचानकपणे कॅसिनो बंद केल्यास गोमंतकीय युवकांचा रोजगार बुडू शकतो. परंतु, कॅसिनोवर जास्त गोमंतकीय काम ... Read More »

गडकरींची १६ रोजी पणजीत प्रचारसभा

विधानसभेच्या पणजी पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १६ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल दिली. केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. गोव्यातील मतदार प्रक्रिया पूर्ण झालेल्या तीन पोट निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत, असा दावा तेंडुलकर यांनी केला. पणजी मतदारसंघात ... Read More »

लक्ष्मी ठरल्या पहिल्या महिला सामनाधिकारी

पहिल्यावहिल्या महिला सामनाधिकारी होण्याचा बहुमान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारताच्या जी.एस. लक्ष्मी यांना प्रदान केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक यांनी नामिबिया विरुद्ध ओमान यांच्यातील सामन्यात पंचांची भूमिका पार पाडली. आयसीसीची मान्यता असलेल्या पुरुषांच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. यानंतर आयसीसीने भारताच्या लक्ष्मी यांना सामनाधिकारीपदी नियुक्त करत नारीशक्तीला बळकट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. ... Read More »

गोवा वेल्हा, मयडे संघाची आगेकूच

>> जीएफए प्रथम विभागीय लीग गोवा वेल्हा स्पोटर्‌‌स क्लबने काल ’ंगळवारी युनायटेड क्लब ऑफ तळावलीचा ३-० असा पराभव केला. जीएफए प्रथम विभागीय लीग स्पर्धेतील हा सामना आंबेली मैदानावर खेळविण्यात आला. सामन्यातील तिन्ही गोलांची नोंद दुसर्‍या सत्रात झाली. ५८व्या मिनिटाला इरफान याडवाड याने डाव्या बगलेतून जोरदार मुसंडी मारताना एकहाती प्रयत्नाद्वारे तळावलीच्या बचावफळीला भेदत उजव्या पायाने मारलेला जोरदार फटका गोलजाळीत विसावला. यावेळी ... Read More »