Daily Archives: May 11, 2019

नराधमांना सजा

सहा वर्षांपूर्वी गोव्याला हादरवून सोडणार्‍या दुहेरी खून खटल्यात ऑस्बान लुकास फर्नांडिस आणि रमेश बागवे या दोघा आरोपींना बाल न्यायालयाने जन्मठेपेची सजा ठोठावली आहे. आरोपी कसले, या दोघांना नराधमच म्हणायला हवे एवढा हा घृणास्पद आणि अमानुष गुन्हा आहे. जन्मठेपेची शिक्षाही अपुरी वाटावी आणि फाशीच्या सजेचा आग्रह धरला जावा अशा तीव्रतेचे हे हत्याकांड होते. ऑस्बान या कंत्राटदाराने आपल्याकडे कामाला असलेल्या मजुराला खांबाला ... Read More »

आयसिस ः आभास की वास्तव?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांच्या प्रचंड सामरिक दडपणाखाली इस्लामिक स्टेटची शकले होणे सुरु झाले आणि सीरियातील युफ्रेटीस नदीच्या तीरावरील बघऊझ गावाच्या पाडावानंतर इस्लामिक स्टेटची सांगता झाली. मध्यपूर्वेत मुस्लिम खलिफत स्थापन करण्याचे अबू बक्र अल बघदादीचे स्वप्न त्या दिवशी मृतप्राय झाले. परंतु तरीही जगभरातील हजारो मुस्लिम पुरुष आणि स्त्रिया त्याच्या विचारसरणीकडे आकर्षित होत आहेत… १९२८ मध्ये हसन अल ... Read More »

पणजीत चौपदरी मार्ग, बहुस्तरीय पार्किंग सुविधा

गोवा विधानसभेच्या पणजी पोट निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आले. भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजपचे नगरसेवक यांची उपस्थिती होती. सांतइनेज सर्कल ते करंजाळे आणि रूआ द ओरे खाडी, मळा, भाटले ते ताळगाव व दोनापावल रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. पीडब्लूडी ... Read More »

मोन्सेरातांवर आरोप करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही

>> भाजपकडे मुद्दे नाहीत ः कॉंग्रेस कॉंग्रेसच्या प्रचारातील विकास आणि स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार या दोन मुद्यांना उत्तर देण्यासाठी भाजप नेते आणि उमेदवाराकडे योग्य मुद्दे नसल्याने त्यांनी मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवारावरील न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याचा विषय पुढे केला जात आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला केला. भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर ... Read More »

पोरस्कडेतील अपघातात शिक्षिका मृत्यूमुखी

अमेरे-पोरस्कडे येथे मुख्य रस्त्यावर काल कार गाडीचा स्कूटरला धक्का बसून झालेल्या अपघातात उगवे येथील दिपाली बेनित फर्नांडिस (वय ४१ वर्षे) ठार झाल्या. त्या उगवे येथील सेंट जोसेफ विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होत्या. याबाबत वृत्त असे की दिपाली फर्नांडिस काल पेडणे येथून चर्चची प्रार्थना संपवून आपल्या स्कूटरवरून उगवे येथे घरी जात होत्या. अमेरे-पोरस्कडे येथे पोचल्या असताना जीए-०६-ई-०६७९ या कारने त्यांच्या ... Read More »

‘ते’ कॉंग्रेस पक्षाचे मत नाही

>> सॅम पित्रोडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉंग्रेसची स्पष्टोक्ती शीखांविरोधातील १९८४ च्या दंगलींच्या संदर्भात सॅम पित्रोडा यांच्या ‘हुआ तो हुआ’ या वादग्रस्त वक्तव्यानंतर गदारोळ उडाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने प्रसिद्धीपत्रक जारी करून ते वक्तव्य हे पित्रोडा यांचे वैयक्तिक मत असल्याचे जाहीर केले. पित्रोडा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस पक्षावर टीकेची झोड उठविली. सॅम पित्रोडा यांनी ‘१९८४ च्या दंगलीचे काय घेऊन बसलात? जे ... Read More »

राफेल निवाडा ः फेरआढाव्याच्या याचिकेवरील निकाल राखून

भारत-फ्रान्स यांच्यातील ३६ राफेल जेट विमाने खरेदी कराराविरोधातील याचिका फेटाळणार्‍या गेल्या १४ डिसेंबरच्या निवाड्याचा फेरआढावा घ्यावा अशी मागणी करणार्‍या याचिकेवरील निवाडा सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. माजी भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी तसेच ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी वरील कराराची गुन्हेगारी स्वरुपाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. मात्र न्यायालयाने ती ... Read More »

चेन्नई सुपरकिंग्स फायनलमध्ये

>> अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी भिडणार चेन्नई सुुपर किंग्सने ‘क्वॉलिफायर २’ सामन्यात काल शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी व ६ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणार्‍या अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सशी दोन हात करावे लागणार आहेत. आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची चेन्नईची ही आठवी वेळ आहे. दिल्लीच्या संघाने विजयासाठी ... Read More »

‘युनिक’ बुद्धिबळ स्पर्धेचे सतीश कुमारला जेतेपद

पहिल्या ‘युनिक’ अखिल भारतीय १५५० रेटिंगखालील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद ४५वे मानांकन लाभलेल्या तमिळनाडूच्या २४वर्षीय सतीश कुमार जी. याने पटकावले. स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत त्याने गोव्याच्या एएफएम शिवांक कुंकळ्येकर (१४४६) याचा पराभव करत मुसंडी मारली. युनिक चेस अकादमीनेे केपे बुद्धिबळ संघटनेच्या साहाय्याने केपे सरकारी कॉलेजमध्ये ७ ते ९ मे या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन केले होते. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय ... Read More »

स्पर्धात्मक परीक्षा ः काळाची गरज

 नागेश एस. सरदेसाई आयुष्यात शिक्षणाच्या काळातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे १०वी व १२वी. १२वीनंतर कोणत्या प्रवाहात प्रवेश घ्यायचा आणि त्यासाठी कोणत्या अभिक्षमतात्मक परीक्षा द्याव्या, यासाठी सर्वच विद्यार्थी सज्ज झाले असणार. पण १०वी नंतर असणार्‍या सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षांबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे, असे दिसून येते. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. ‘द नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (एनटीएसई)’- ही परीक्षा माध्यमिक शाळा स्तरावरच्या परीक्षांमधील ... Read More »