Daily Archives: May 10, 2019

शस्त्रसज्ज?

राज्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे हल्ली एवढे अँग्री यंग मॅन का बनले आहेत कळायला मार्ग नाही. नुकताच त्यांनी एका वरिष्ठ अधिकार्‍याचा मोबाईल रागाच्या भरात हाताने उडवून दिला. गोवा विद्यापीठात रोजगार भरतीमध्ये पंधरा वर्षे वास्तव्याच्या दाखल्याची अट दुर्लक्षिली जात असल्याबाबत बोलताना ‘गोंयकारपण’ जपण्यासाठी प्रसंगी गोमंतकीय युवकांना ‘शस्त्रसज्ज’ करू अशीही गर्जना त्यांनी केली. शस्त्रसज्ज?? म्हणजे महोदयांना नेमके काय म्हणायचे आहे? गोवा फॉरवर्डला ... Read More »

निवडणूक रणधुमाळीत ऐकावे ते नवलच!

शंभू भाऊ बांदेकर विविध पक्षांतील विविध नेते शेरेबाजीद्वारे आचारसंहितेचा भंग करीत आहेत आणि यात ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असे शहाणपण कुणी दाखवताना दिसत नाही. शेवटी या सार्‍या बाता, वार्ता, कुवार्ता किंवा सुवार्ता वाचून, ऐकून ऐकावे ते नवलच! असे म्हणण्याखेरीज आपल्या हातात तरी काय आहे? लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठी सोमवार दि. ६ मे रोजी मतदान पार पडले. यात ७ राज्ये आणि ... Read More »

मेरशी दुहेरी खूनप्रकरणी आरोपींना जन्मठेप

बाल न्यायालयाने मेरशी येथील दुहेरी खून प्रकरणानंतर खून करण्यात आलेल्या नायक दाम्पत्याच्या दोन मुलांचे अपहरण, लैंगिक छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या ओस्बान लुकस फर्नांडिस (मेरशी) आणि रमेश बागवे (मूळ – मालवण) या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ६.७० लाख रुपये दंडाची शिक्षा काल ठोठावली. पणजी येथील बाल न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निवाडा दिला. ३० एप्रिलला आरोपींना दोषी जाहीर ... Read More »

खटल्यांच्या प्रसिद्धीसाठी भाजपची मोन्सेरात यांच्याविरुद्ध तक्रार

पणजी पोट निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांच्यावरील खटल्याबाबत वृत्तपत्रातून माहिती प्रसिद्ध न केल्याप्रकरणी भाजपने येथील मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे काल तक्रार केली. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना त्यांच्याविरोधातील खटल्याची माहिती जाहीर करणे सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशान्वये बंधनकारक केले आहे. कॉँग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खटल्याबाबत माहिती दिलेली आहे. परंतु, मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली तरी वृत्तपत्रातून खटल्याबाबत माहिती प्रसिद्ध केलेली ... Read More »

सरदेसाईंच्या ‘त्या’ वक्तव्याशी माविन गुदिन्हो असहमत

उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या गोंयकाराच्या हितरक्षणासाठी प्रसंगी युवकांच्या हाती शस्त्रे देण्याच्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचे पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍या नेत्यांनी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करताना भान ठेवण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री सरदेसाई यांचे वैयक्तिक मत असावे. राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असेही ... Read More »

पर्रीकरांनी पाठिंबा घेतला तेव्हा खटल्यांची माहिती नव्हती का?

>> बाबुशबाबत कॉंग्रेसचा भाजपला सवाल गोवा विधानसभेच्या २०१७ च्या पणजीतील पोट निवडणुकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा भाजपचे उमेदवार स्व. मनोहर पर्रीकर यांनी बाबूश मोन्सेरात यांचा पाठिंबा घेतला त्यावेळी बाबूश यांच्या विरोधातील खटल्याची माहिती भाजपला नव्हती का? असा प्रति प्रश्‍न कॉंग्रेस पक्षाने भाजपला काल केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर भ्रष्टाचारी नेते शुद्ध होतात. भाजप सरकारमधील मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री विश्‍वजित राणे, आमदार पांडुरंग ... Read More »

‘‘उद्धवच्या धमकीमुळे बाळासाहेबांचा नाईलाज झाला…’’

>> नारायण राणे यांच्या आगामी आत्मचरित्रातील स्फोटक प्रकरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे राज्यसभेचे खासदार श्री. नारायण राणे यांचे *** हे अत्यंत स्फोटक इंग्रजी आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. हार्पर कॉलीन्स या प्रख्यात प्रकाशनसंस्थेने खास नवप्रभेच्या वाचकांसाठी दिलेले हे त्यातील एक महत्त्वाचे प्रकरण — मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, मी अनेकदा अपेक्षांहून सरस ठरलो. खरे सांगायचे तर लोकांच्या माझ्याकडून खूप कमी ... Read More »

राहुल गांधी नागरिकत्वाबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वासंबंधीची याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा निकालात निघेपर्यंत त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यास देऊ नये असे निर्देश निवडणूक आयोगाला देण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात जय भगवान गोयल व सी. पी. त्यागी यांनी दाखल केली होती. तसेच भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्रीय मंत्रालयाला राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी संशय ... Read More »

दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई सुपर किंग्सचे लक्ष्य अंतिम फेरी

>> आज विशाखापट्टणमध्ये क्वॉलिफायर-२ लढत दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज विशाखापट्टणमध्ये आयपीएलच्या १२व्या पर्वाचा क्वॉलिफायर-२ सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सला प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी आहे. परंतु त्यांना तीन वेळच्या जेत्या आणि चार वेळच्या उपविजेत्या अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर मात करावी लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने चेपॉकवर झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर ८० धावांनी ... Read More »

सुपरनोव्हाजची वेलोसिटीवर मात

जेमिमा रॉड्रिगीजच्या दमदार नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने वेलोसिटी संघावर १२ धावांनी मात करीत वूमन टी-२० चॅलेंज स्पर्धेत शानदार विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले आहे. सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम लढत रविवार ११ मे रोजी जयपूर येथे होणार आहेत. काल जयपुरमध्ये झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिगीजच्या दमदार नाबाद अर्धशतकामुळे सुपरनोव्हाज संघाने २० ... Read More »