Daily Archives: May 9, 2019

कारवाईचे इशारे

भारतीय जनता पक्षाच्या सरकारला वेळोवेळी टेकू पुरवणार्‍या सुदिन ढवळीकरांच्या दिशेनेच अखेर भाजप नेत्यांनी तोफा वळवल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सुदिन यांचे ग्रह तूर्त पालटल्याची ही निशाणी आहे. नूतन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी ढवळीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले आहेत आणि आचारसंहिता संपताच त्यांचा पर्दाफाश करण्याचा जाहीर इशाराही दिला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही भ्रष्टाचार कोणी केला ... Read More »

अफगाणिस्तानात शांततेचा चकवा

शैलेंद्र देवळणकर अङ्गगाणिस्तानातून अमेरिकन ङ्गौजा पूर्णतः माघारी गेल्यानंतर काय होणार याची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आली आहे. रशियन ङ्गौजांनी अङ्गगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतर उद्भवलेल्या यादवी परिस्थितीचे चटके जगाने सोसले होते. तशीच स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी अमेरिकेने थेट तालिबानसोबतच चर्चा सुरू केली. तथापि, ही चर्चा ङ्गलद्रुप होताना दिसत नाही.. अङ्गगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावे यासाठी जगातील जवळपास सर्वच ... Read More »

बालाकोटमध्ये ठार झाले होते १७० दहशतवादी

>> भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकसंदर्भात विदेशी पत्रकाराचा दावा भारतीय हवाई दलाने गेल्या २६ फेब्रवारी रोजी पाकिस्तानमधील जैश ए महंमद संघटनेच्या बालाकोट येथील तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे १७० दहशतवादी ठार झाले, अशी माहिती एका इटालियन महिला पत्रकाराने एका वृत्तांतात दिली आहे. फ्रान्सिस्का मारिनो असे या महिला पत्रकाराचे नाव असून बालाकोट हवाई हल्ल्यात कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नसल्याचा पाकिस्तानचा ... Read More »

मोन्सेरात यांच्यावरील आरोप निश्‍चितीचा निर्णय ३ जून रोजी

>> अल्पवयीन युवतीवरील कथित बलात्कारप्रकरण पणजी जिल्हा न्यायालय् माजी मंत्री तथा पोट निवडणुकीतील कॉँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरातवर अल्पवयीन युवतीवर कथित बलात्कार प्रकरणी आरोप निश्‍चितीबाबत ३ जून २०१९ रोजी निर्णय घेणार आहे. न्यायालयात या कथित बलात्कार प्रकरणातील आरोप निश्‍चितीवर काल सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणी आरोप निश्‍चितीवर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. सुनावणीच्या वेळी न्यायालयात बाबूश मोन्सेरात यांची उपस्थिती होती. २०१६ मध्ये ... Read More »

नीरव मोदीला तिसर्‍यांदा जामीन नाकारला

भारतातील अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांना गंडवून विदेशात पळून गेलेल्या नीरव मोदी याला काल येथील न्यायालयाने तिसर्‍यांदा जामीन नाकारला. जामीन अर्जावरील कालच्या सुनावणीवेळी ४८ वर्षीय नीरव मोदी उपस्थित होता. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने मुख्य न्यायदंडाधिकारी एम्मा आरबथनॉट यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी नीरव येथील आपल्या फ्लॅटमध्ये २४ तास उपलब्ध राहील. तसेच सुरक्षा अनामत रक्कम म्हणून २० लाख पौंड भरण्याची तयारी असल्याचे ... Read More »

मोन्सेरात यांनी त्यांच्यावरील खटल्यांची माहिती जाहीर करावी

>> भाजपची पत्रकार परिषदेत मागणी पणजी पोट निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांच्यावरील न्यायालयात प्रलंबित खटल्यांची माहिती जाहीर करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते दामू नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराला त्याच्यावरील न्यायालयात प्रलंबित खटल्याची माहिती वृत्तपत्रातून जाहीर करणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कॉंग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी खटल्याची माहिती जाहीर करावी, ... Read More »

दक्षिण गोव्यातील आचारसंहिता शिथिल करण्यासाठी विनंती

राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थानिक निवडणूक कार्यालयाला एक पत्र पाठवून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे. दक्षिण गोव्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची विकासकामे हाती घेण्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. मुख्य सचिव राय ... Read More »

बघ्याची भूमिका घेतल्याने पोलीस शिपाई निलंबित

सांतइनेज पणजी येथे निवडणूक कार्यालयाच्या गस्ती पथकातील अधिकारी आणि बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांत झालेल्या शाब्दिक चकमक प्रकरणी पोलीस शिपाई समीत जल्मी याला निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी आणि बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकातील शाब्दिक चकमक सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मोन्सेरात यांच्या दोघा समर्थकांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर निवडणूक अधिकार्‍याने हटविल्याने शाब्दिक चकमक ... Read More »

युवकांच्या हाती शस्त्र’ विधानासाठी कॉंग्रेसकडून विजय सरदेसाईंचा निषेध

उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्या गोव्याच्या हितरक्षणार्थ प्रसंगी युवकांच्या हाती शस्त्र देण्याच्या विधानाचा कॉंग्रेस पक्षाने निषेध केला असून उपमुख्यमंत्री सरदेसाई यांनी वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी काल केली. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पणजी येथील कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष सरदेसाई यांनी गोयकारपणाच्या रक्षणासाठी युवकांच्या हाती शस्त्र देण्यबाबत वक्तव्य केले आहे. सरदेसाई यांचे वक्तव्य हिंसेला प्रोत्साहन देणारे असून निषेधार्ह ... Read More »

व्हाळशी डिचोली अपघातात एक ठार

व्हाळशी डिचोली येथे डिचोली ते म्हपसा या मुख्य रस्त्यावर काल दि. ८ मे रोजी सकाळी झालेल्या एका अपघातात व्हाळशी येथे राहणारे प्रेमानंद पांडुरंग सावंत यांचा म्रूत्यू झाला. रस्ता ओलांडताना त्यांना भरधाव वेगाने येणार्‍या स्कुटरने जोरदार धडक दिली. सदर घटना बुधवारी सकाळी घडली. उपलब्ध माहितीनुसार प्रेमानंद सावंत हे मुळ केळ पीर्ण येथील असून गेली अनेक वर्ष ते व्हाळशी डिचोली येथे राहत ... Read More »