Daily Archives: May 8, 2019

राम माधवांची स्पष्टोक्ती

भारतीय जनता पक्ष या लोकसभा निवडणुकीत कदाचित स्वबळावर बहुमताचा आकडा पार करू शकणार नाही. तसे झाले तर त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी नुकतीच केली आहे. एकीकडे पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते अरुण जेटली वगैरे भाजप पुन्हा स्वबळाचे सरकार केंद्रात स्थापन करील असा ठाम विश्वास पुन्हा पुन्हा व्यक्त करीत ... Read More »

निर्णय स्वागतार्ह; पण…

ऍड. प्रदीप उमप खासगी क्षेत्रात १५ वर्षे कामाचा अनुभव असलेल्या प्रतिभावंतांना प्रशासकीय सेवेत संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न मूर्तरूप धारण करेल अशी आशा आहे. अर्थात, अशा नियुक्त्यांच्या प्रक्रियेत काही आव्हानेही आहेत. पूर्वीपासून नियुक्त असलेले नोकरशहा नव्या अधिकार्‍यांशी जुळवून घेतीलच असे सांगता येत नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाने निवड केलेल्या असाधारण योग्यतेच्या नऊ तज्ज्ञांची ... Read More »

सरकार पाडण्याचे धाडस कोणातही नाही ः मुख्यमंत्री

भ्रष्टाचार म्हणजे काय आणि भ्रष्टाचार कुणी केला आहे, हे २३ तारखेनंतर दाखवून दिले जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या पणजी मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काल केले. भाजप आघाडी सरकार तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. विरोधकांच्या अपप्रचारावर कुणी विश्वास ठेवू नये. कुणाकडेही भाजप आघाडी सरकार पाडण्याचे धाडस नाही, असा दावा डॉ. सावंत यांनी केला. ... Read More »

शिरगाव येथील लईराई देवीचा जत्रोत्सव दि. ९ रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त मंदिरावर अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. Read More »

दहा कोटी रु. जमा करण्याचे कार्तींना आदेश

माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने मे व जून महिन्यात विदेशात जाण्यासाठी आधी दहा कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आयएनएक्स मिडिया व एअरसेल मॅक्सिस या प्रकरणांमध्ये असेलल्या आरोपांप्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ईडी व सीबीआयतर्फे कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्धच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास केला जात आहे. त्यांनी गेल्या जानेवारीतही १० कोटी रुपये ... Read More »

सुदिन ढवळीकरांचे गैरव्यवहार उघडकीस आणणार ः पाऊसकर

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कार्यकाळात झालेले गैरव्यवहार उघडकीस आणणार आहे, असे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल जाहीर केले. ढवळीकर यांच्या कार्यकाळातील विकास कामांतील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी आल्या असून या तक्रारीची चौकशी करून जून महिन्यात अधिकृत बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे, असेही पाऊसकर यांनी सांगितले. बांधकाम खात्याच्या ... Read More »

बिहारात हॉटेलमध्ये ठेवली इव्हीएम!

>> निवडणूक अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस बिहारात पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना मुझफ्फरपूर येथे एका हॉटेलच्या खोलीत सहा मतदान यंत्रे (ईव्हीएम) घेऊन राहिलेल्या एका निवडणूक अधिकार्‍याला काल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र या ईव्हीएमचा वापर झालेला नाही किंवा सीलही तोडलेले नाही अशी ग्वाही जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी दिली आहे. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या संदर्भात अनेक स्थानिक राजकीय ... Read More »

मनपा आयुक्त दबावाखाली

>> महापौर ः हॉटेल्स, रहिवासी सोसायट्यांना आयुक्तांच्या नोटिसा महानगरपालिका क्षेत्रातील तारांकीत हॉटेल्स आणि ४० रहिवासी सोसायट्यांना कचरा विल्हेवाटीबाबत नोटीस पाठविताना आयुक्तांनी महानगरपालिका मंडळाला विश्‍वासात घेतले नाही. महानगरपालिका आयुक्तांनी कुणाच्या तरी दबावाखाली येऊन पोट निवडणुकीच्या तोंडावर नोटिसा पाठविल्या आहेत, असा आरोप महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला. महानगरपालिकेकडून हॉटेल्स, इमारत प्रकल्पात राहणार्‍यांकडून कचरा शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे ... Read More »

वाहतूक खात्याने १०४३ जणांची ड्रायव्हिंग लायसन्स केली निलंबित

वाहतूक खात्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी १०४३ वाहन चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. वाहतूक पोलीस आणि वाहतूक खात्याच्या अधिकार्‍याकडून नोंद केली जाणारी प्रकरणे कारवाईसाठी वाहतूक खात्याच्या संबंधित कार्यालयाकडे सादर केली जातात. दारूच्या नशेत वाहन चालविणार्‍या ३०६ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्‍या २३० जणांचे परवाने निलंबित करण्यात ... Read More »

नोकर भरतीसाठी १५ वर्षांची रहिवासी दाखला सक्ती हवी

>> मंत्री विजय सरदेसाई यांची स्पष्टोक्ती गोमंतकियांच्या हिताच्या रक्षणासाठी गोवा विद्यापीठ आणि सरकारी खात्यातील नोकरभरतीसाठी १५ वर्षाचा रहिवासी दाखला सक्तीचा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना काल येथे केले. यावेळी गोवा फॉरवर्डचे नेते तथा जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, आरडीए मंत्री जयेश साळगावकर, मडगावच्या नगराध्यक्ष बबिता आंगले ... Read More »