Daily Archives: May 7, 2019

पाणीटंचाईकडे लक्ष द्या

राज्याच्या धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याचा दावा जलसंसाधन खात्याने केला आहे. शेजारचे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य दुष्काळाने होरपळत असताना गोव्यामध्ये यंदाच्या ग्रिष्माची तहान भागवील इतपत पुरेसा पाणीसाठा आहे ही दिलासादायक बाब आहे. परंतु धरणांमध्ये पुरेसे पाणी असले तरी येत्या पावसाळ्यापर्यंत त्याचे मर्यादित प्रमाणात, परंतु नियमित वितरण गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे जातीने लक्ष देणे जरूरी आहे. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना ... Read More »

न्यायसंस्थेवरील विश्वास ढळता नये

देवेश कु. कडकडे मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आधी भारतीय संसद, नंतर सैन्यदले आणि आता न्यायालयाच्या विश्‍वासार्हतेबद्दल काहींकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. आज अनेक बिगर सरकारी संस्था आणि जनहित याचिका सादर करणारे तथाकथित समाज कार्यकर्ते न्यायालयात पुन्हा पुन्हा याचिका दाखल करीत असतात. आपल्या लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्यातील न्यायालयीन संस्था ही सर्वांत विश्‍वासार्ह मानली जाते. एरव्ही आपल्या देशातील एकूण न्यायव्यवस्थेची ... Read More »

कासव संवर्धन ठिकाणांच्या बांधकाम कारवाईला स्थगिती

>> अंतिम निवाड्यापर्यंत मोरजी, मांद्रे, आगोंदमधील बांधकामे पाडू नयेत ः हायकोर्ट कासवांनी अंडी घालण्याच्या जागांवरील सागरी अधिनियमांचे (सीआरझेड) उल्लंघन करून केलेली मांद्रे, मोरजी व आगोंद या किनार्‍यांवरील सर्व प्रकारची बांधकामे येत्या १० मे पूर्वी पाडण्याचा जो आदेश उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता त्याला काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली. वरील बांधकामे पाडण्याचा आदेश २ मे रोजी ... Read More »

पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान किरकोळ हिंसाचार

लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील काल ७ राज्यांमध्ये झालेल्या मतदानादरम्यान जम्मू-काश्मीर व प. बंगाल या राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर हातबॉम्ब फेकण्यात आला. अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकारही घडले. पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ततेमुळे आतापर्यंत ४२४ लोकसभा मतदारसंघांमधील मतदान पार पडले आहे. उर्वरीत ११८ मतदारसंघांमध्ये १२ व १९ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, ... Read More »

जुळ्या बालिकांवर लैंगिक अत्याचार ः एकास अटक

पाच वर्षांच्या दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी बाळकृष्ण मापारी (राहणारा हणखणे) याला अटक केली. बाळकृष्ण मापारी (वय वर्षे ३४, व्यवसाय ड्रायव्हर) याने पाच वर्षांच्या जुळ्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार या मुलींच्या आईने पेडणे पोलीस स्थानकात दिल्यानंतर पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अल्बिटो रॉड्रिग्स यांनी या प्रकरणातील संशयित बाळकृष्ण मापारी याला सोमवारी अटक केली. संशयितावर भारतीय दंड संहिता कलम ... Read More »

निवडून आल्यास भाजपात जाणार नाही ः वाल्मिकींचे प्रतिज्ञापत्र

पणजी मतदारसंघातून निवडून आलो तर आपण पक्षातून फुटून जाऊन भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे एक प्रतिज्ञापत्र आपण नोटरीकडे जाऊन तयार करून घेतले आहे. भाजपला बाहेरूनही पाठिंबा देणार नसल्याचे या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केलेले आहे, असे आम आदमी पार्टीचे पणजी पोटनिवडणुकीतील उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. आपण या प्रतिज्ञापत्राचा भंग केला तर भारतीय दंड संहितेचा कलम ३४० खाली कुणीही ... Read More »

स्मार्ट सिटीखालील कामांची माहिती द्यावी : गोसुमं

स्मार्ट सिटी योजनेखाली २०१६ सालापासून आतापर्यंत पणजीत कोणती विकासकामे केली याची सविस्तर माहिती भाजप सरकारने द्यावी, अशी मागणी काल गोवा सुरक्षा मंचने पत्रकार परिषदेत केली. स्मार्ट सिटीसंबंधीची एक श्वेतपत्रिकाही सरकारने लोकांपुढे ठेवावी, अशी मागणीही गोसुमंच्या नेत्या ऍड. स्वाती केरकर यांनी केली. आपले उमेदवार सुभाष वेलिंगकर ११ हजार मते मिळवून विजयी होतील असा दावा यावेळी आत्माराम गावकर यांनी केला. दीडशे कोटींचे ... Read More »

मुंबईचे लक्ष्य अंतिम फेरी

>> चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आज ‘क्लॉलिफायर १’ विद्यमान विजेता चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १२व्या मोसमातील पहिला प्ले ऑफ सामना आज मंगळवारी खेळविला जाणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याने उभय संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवणार आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मुरलेल्या दोन संघांमधील ही लढत क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ... Read More »

ट्रेलब्लेझर्सची सुपरनोव्हाजवर मात

वूमन टी-ट्वेंटी चॅलेंज स्पर्धेतील काल सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्स संघाने सुपरनोव्हाज संघाचा २ धावांनी पराभव केला. ट्रेलब्लेझर्सने विजयासाठी ठेवलेल्या १४१ धावांचा पाठलाग करताना सुपरनोव्हाजचा डाव १३८ धावांपर्यंत मर्यादित राहिला. सुपरनोव्हाज संघाची कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मंधानाने शानदार फलंदाजी करताना ६७ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ९० धावांची शानदार खेळी साकारली. हरलिन देओल ... Read More »

कर्करोगासंबंधी जागृत कसे व्हावे?

 डॉ. स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) सध्या हा फॅमिली-डॉक्टर नावाचा प्रकार कालबाह्य झाला आणि त्याची जागा गूगल-डॉक्टरने घेतली आहे. तर आपल्याला आपल्या शरीरात काही लक्षणे दिसली की आपण ह्या गुगलवर शोधतोे आणि हा गूगल डॉक्टर जी लक्षणे दाखवेल ती वाचतो आणि एखादा भयंकर आजार आपल्याला झाला आहे हे समजून आधीच आपला धीर खचून जातो. बर्‍याच जणांचे असे म्हणणे असते की कर्करोगाची अशी ... Read More »