Daily Archives: May 6, 2019

रंग भरू लागले

येत्या १९ मे रोजी होणार असलेल्या पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत रंग भरू लागले आहेत. भाजप, कॉंग्रेस, आप आणि गोवा सुरक्षा मंच अशी ही मुख्यत्वे चौरंगी लढत आहे. दोघे अपक्षही रिंगणात आहेत. सत्ताधारी भाजपसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे, कारण दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होते आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष ह्या पोटनिवडणुकीवर आहे. पर्रीकरांचा मतदारसंघ ... Read More »

आजवरच्या मतदानाचा अन्वयार्थ

ल. त्र्यं. जोशी या लाटेचे मानसशास्त्रही असे आहे की, निकालांपूर्वी तिचा प्रचारासाठी वापर केला जातो. तिचा प्रत्यय मात्र निकालांनंतरच येतो, पण लाट नसली तर सरकार बदलतेच असेही खात्रीपूर्वक म्हणता येत नाही… तसाच विचार केला तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या सातही फेर्‍या आटोपेपर्यंत, एवढेच नव्हे तर २३ मे रोजी मतमोजणी होईपर्यंत झालेल्या मतदानावर भाष्य करण्यात फारसा अर्थ नाही. हे सर्वांना समजतेदेखील, ... Read More »

प्रमुख धरणांत पाण्याचा योग्य साठा उपलब्ध

राज्यात पाण्याचा पुरवठा करणार्‍या प्रमुख धरणांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला योग्य प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे. सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणातील पाण्याचा साठा २० टक्के तर दक्षिण गोव्याला पाण्याचा पुरवठा करणार्‍या साळावली धरणामध्ये पाण्याचा साठा ५४ टक्के एवढा आहे. आमठणे, पंचवाडी आणि चापोली धरणात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा आहे. ओपा पाणी प्रकल्पाला पाण्याचा पुरवठा करणार्‍या खांडेपार नदीत योग्य प्रमाणात पाण्याचा साठा आहे, ... Read More »

स्मार्ट सिटी : भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने फेटाळले

पणजी ‘स्मार्ट सिटी’च्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा कॉंग्रेस पक्षाने केलेला आरोप काल भाजपने फेटाळून लावला. खासदार बोलताना नरेंद्र सावईकर म्हणाले की, सिध्दार्थ कुंकळ्येंकर यानी पणजीच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उडी घेतल्यानंतरच कॉंग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावरुन हे आरोप खोटे आहेत हे सिध्द होत आहे. सिध्दार्थ कुंकळ्येकर यानी पणजीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच गिरीश चोडणकर यांना स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार झाल्याचे ... Read More »

भाजपच्या उमेदवारीसाठी मोन्सेर्रात आले होते भाजप कार्यालयात : तेंडुलकर

बाबुश मोन्सेर्रात पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होऊन दोन-तीन दिवसानंतर भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात आले होते असा गौप्यस्फोट प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यानी काल पत्रकार परिषदेत केला. आम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना परत पाठवले, असे तेंडुलकर म्हणाले. २३ मे नंतर राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार स्थापन करून दाखवण्याची भाषा मोन्सेर्रात हे आता बोलू लागले असल्याचे सांगून त्यांच्यात ... Read More »

‘तुमच्या वडिलांचा शेवट भ्रष्टाचारी नं. वन ने झाला’

>> पंतप्रधानांचा राहुलवर घणाघात उत्तर प्रदेशमधील एका निवडणूक प्रचार सभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. राहुल गांधी यांचा नामोल्लेख न करता मोदी म्हणाले की तुमच्या वडिलांना अन्य देशांनी जरी क्लिन चीट दिली असली तरी त्यांचे आयुष्य भ्रष्टाचारी क्रमांक एक म्हणून संपले. ‘मिस्टर क्लीन’ म्हणून कॉंग्रेसजन तुमच्या वडिलांना संबोधत राहीले. मात्र त्यांचा शेवट भ्रष्टाचारी ... Read More »

बसपा-सपात पंतप्रधान मोदी फूट घालू पाहतात : मायावती

समाजवादी पार्टी व बहुजन समाजवादी पार्टी यांच्यात उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डाव असल्याचा आरोप काल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी काल केला. उत्तर प्रदेशमध्ये उभय पक्षांची युती झालेली असून बसपा ३८ तर सपा ३७ जागा लढवित आहे. या आघाडीने अमेठी व रायबरेली या जागा कॉंग्रेससाठी व तीन जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला सोडण्यात आल्या आहेत. Read More »

गोमेकॉच्या मोफत शववाहिका सेवेला खासगी चालकांचा विरोध

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मोफत शववाहिका सेवेला खासगी शववाहिका चालकांनी विरोध दर्शविला आहे. सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी खासगी शववाहिका चालकांना पाठिंबा दर्शविल्याने आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी नापसंती व्यक्त केली आहे. मोफत शववाहिका प्रकरणावरून आमदार सिल्वेरा यांनी जीएमसीचे डीन डॉ. बांदेकर यांना धमकी दिल्याचा आरोप आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल केला. हॉस्पिटलने जीव्हीकेच्या साहाय्याने मोफत शववाहिका सेवा ... Read More »

किंग्स पंजाबचा विजयी समारोप

>> चेन्नई सुपर किंग्सचा ६ गडी व १२ चेंडू राखून पराभव सलामीवीर लोकेश राहुलचे दणकेबाज अर्धशतक आणि त्याला यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याच्या लाभलेल्या साथीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात ६ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. चेन्नईने विजयासाठी ठेवलेले १७१ धावांचे माफक लक्ष्य पंजाबने १८ षटकांत गाठले. पंजाबचे या स्पर्धेतील आव्हान या सामन्यापूर्वीच संपुष्टात आले ... Read More »

चर्चिलवरील विजयासह धेंपो पुन्हा टॉपवर

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने चर्चिल ब्रदर्सवर काल रविवारी ३-२ असा निसटता विजय मिळवक गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील सामन्यात पूर्ण तीन गुणांची कमाई केली. उतोर्डा येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. धेंपोने या विजयासह गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे. या विजयानंतर त्यांचे २१ लढतींतून ५१ गुण झाले आहेत. गोवन एफसी व त्यांचे समान गुण ... Read More »