Daily Archives: May 4, 2019

‘फणी’चा तडाखा

गेले कित्येक दिवस ज्याचा गाजावाजा चालला होता, ते फणी (खरा बांगलादेशी उच्चार फोणी) वादळ काल उडिसात येऊन धडकले. एम्स भुवनेश्वरसह अनेक इमारतींची त्या धडाक्यात वाताहत झाली आहे आणि काही बळीही गेले आहेत. या वादळातून नेमकी किती जीवितहानी झाली वा मालमत्तेचे नुकसान झाले ते कळायला अजून वेळ लागेल, कारण या वादळाच्या मार्गात उडिसातलीच जवळजवळ ५२ शहरे आणि दहा हजार गावे आहेत. ... Read More »

हिममानवाची पावले ः आभास की वास्तव?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) भारतीय सेना मागील सात दशके हिमालयात गिर्यारोहणाचा सराव करते आहे. अशा प्रकारच्या विशाल गूढ मानवाच्या फंदात ती या आधी कधीच पडली नव्हती. पण या वेळी पहिल्यांदाच सेनेने अशा प्रकारची जाहीर घोषणा केली, त्यामुळे सोशल मीडियामधील यतीप्रेमींमध्ये उत्सुकतेची प्रचंड लाट आली… भारतीय सेनेच्या १८ सैनिकांचे गिर्यारोहण पथक मार्च ते मे महिन्यात त्यांच्या हिमालयीन मोहिमे अंतर्गत ८००० मीटर ... Read More »

मडगाव अर्बनवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध

>> खातेधारकांना ६ महिन्यांत काढता येणार ५ हजार मडगाव अर्बन सहकारी बँकेला आर्थिक परिस्थिती सुधारण्यास संधी देऊनही अपयश आल्याने रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी कडक निर्बंध लादले असून खातेधारकांना सहा महिन्यांत एकदाच पाच हजार रुपये काढण्यास परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशामुळे हजारो खातेदारांमध्ये खळबळ माजली असून व्यापारी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे. बँकेच्या संचालक मंडळाला डबघाईस गेलेल्या बँकेची आर्थिक ... Read More »

मतदानयंत्रे ठेवलेल्या इमारतीजवळ मडगावात आग ः स्ट्रॉंग रूम सुरक्षित

बोर्डा, मडगाव येथील मल्टिपर्पज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान प्रयोग शाळेत काल फ्रीजला दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ माजली. या इमारतीच्या विस्तारित इमारतीत लोकसभा व शिरोडा विधानसभा निवडणुकीतील मतदान यंत्रे सीलबंद असल्याने राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, स्ट्रॉंग रुमला आगीचा फटका बसला नाही. सुदैवाने आग त्या खोलीपर्यंत पोचली नाही. बोर्डा सरकारी मल्टिपर्पजच्या जुन्या शैक्षणिक इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील उच्च माध्यमिक ... Read More »

पणजीत मगोचा बाबुशना पाठिंबा

पणजी मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत आम्ही कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल सांगितले. मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक काल झाली. या बैठकीत आम्ही पणजी मतदारसंघात १९ मे रोजी होणार असलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे दीपक ढवळीकर म्हणाले. सत्ताधारी ... Read More »

रस्ते खोदण्याच्या कामांसाठी सरकारची १५ मे पर्यंत मुदत

स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते यांनी रस्ता खोदण्याची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करावी, असा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी काल दिला. उत्तर गोव्यातील पावसाळ्यापूर्वीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी घेतला आहे. महानगरपालिका, नगरपालिका, पंचायतींनी गटारांच्या साफसफाईचे काम हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. या साफसफाईच्या कामांचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली ... Read More »

आजगावकर व पाऊसकरांना अपात्र करा

>> मगोची हंगामी सभापतींकडे अपात्रता याचिका सादर मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले आपले एकेकाळचे सहकारी मनोहर उर्फ बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर यांच्या विरुद्ध काल मगो पक्षाचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पक्षांतर बंदी कायद्याखाली हंगामी सभापती मायकल लोबो यांच्याकडे अपात्रता याचिका सादर केली आहे. मगो पक्षातून फुटून गेलेल्या वरील दोन्ही नेत्यांना पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र ठरवण्यात ... Read More »

फनी वादळाने ओडिशात हाहाकार

>> १२ लाख नागरिकांचे स्थलांतर : ८ ठार ओडिशातील पुरीच्या किनारपट्टीवर काल धडकलेल्या फनी वादळाने ओडिशात हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे येथील घरे, वृक्ष जमीनदोस्त झाली असून अनेक भाग जलमय झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला असून १६० जण जखमी झाले आहेत. या शिवाय फनीच्या तडाख्यात सापडलेल्या १२ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले ... Read More »

चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसीला गोवा विभाग अजिंक्यपद

गटफेरीतील शेवटच्या लढतीत धेंपो स्पोर्ट्‌स क्लबला २-२ असे बरोबरीत रोखत चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाने एआयएफएफ अंडर-१५ यूथ लीग स्पर्धेचे गोवा विभागाचे राज्य अजिंक्यपद पटकाविले. या अजिंक्यपदाबरोबरच चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाने कोलकाता येथे होणार्‍या स्पर्धेच्या अखिल भारतय अंतिम फेरीसाठीही पात्रता मिळविली आहे. जुने गोवे येथील एला मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात पहिल्या सत्रात कर्णधार मेवन डायसने चर्चिल ब्रदर्स-जीएफडीसी संघाचे खाते खोलले होते. पहिल्या ... Read More »

इच्छापूर्ती करणारी ‘अक्षय तृतीया’

 श्रीमती लक्ष्मी जोग (खडपाबांध-फोंडा) या दिवशी सुरू केलेले कोणतेही काम अक्षय टिकते असा दृढभाव असल्यामुळे लोक हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधतात. या दिवशी आपण केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीच क्षय होत नाही. देव व पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते अक्षय होते. गौर पुसे शंकरासी | स्वामी विनंती परियेसी | मज पाठवा माहेरासी | ... Read More »