Daily Archives: May 3, 2019

मसूदवर बंदी

जैश ए महंमदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला अखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. त्यामुळे आजवर त्याला आणि त्याच्या प्याद्यांना पंखांखाली घेणार्‍या पाकिस्तानला त्याच्या मालमत्तेवर टांच आणावी लागेल, त्याला आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी करावी लागेल आणि त्याला शस्त्रास्त्र खरेदीसही मनाई करावी लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काश्मीरमध्ये त्याच्याकरवी जैशच्या माध्यमातून पाकिस्तानची आयएसआय आजवर ज्या काही कारवाया करीत आलेली होती, ... Read More »

निवडणुका आणि घराणेशाही

शंभू भाऊ बांदेकर सोनिया गांधी यांची एका वाहिनीसाठी मुलाखत घेताना घराणेशाहीबाबत विचारले गेले, तेव्हा सोनिया गांधी उत्तरल्या होत्या,‘ डॉक्टरचा मुलगा जर डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा जर इंजिनियर होऊ शकतो, तर आमची मुले राजकारणात येणे नैसर्गिकच!’ आपल्या देशातील गेल्या २०-२५ वर्षांतील राजकारणात ‘घराणेशाही’ हा शब्द निवडणूक काळात प्रकर्षाने कानावर पडतो. त्या निवडणुका मग ग्रामपातळीपासून राज्यपातळीपर्यंत आणि जिल्हा स्तरापासून लोकसभेपर्यंत कुठल्याही असोत, आपला ... Read More »

पणजी पोटनिवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात

>> भाजप, कॉंग्रेस, गोसुमं व आपमध्ये चुरस >> उमेदवारांचा घरोघरी प्रचारावर भर गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोट निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार अनिश बकाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पणजी पोट निवडणुकीसाठी भाजप, कॉंग्रेस, गोसुमं व आपच्या उमेदवारांमध्ये चुरशीची चौरंगी लढत होणार आहे. पणजी पोट निवडणुकीसाठी भाजपचे सिद्धार्थ ... Read More »

विश्‍वजित राणे अपात्रता प्रकरणी २२ रोजी निवाडा

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याविरोधातील अपात्रता याचिकेवरील युक्तिवाद काल पूर्ण झाला असून येत्या २२ मे रोजी निवाडा जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती हंगामी सभापती मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी जुलै २०१७ मध्ये आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याविरोधात अपात्रता याचिका सभापतींसमोर दाखल केली आहे. या अपात्रता याचिकेवरील पहिली सुनावणी ऑगस्ट २०१७ आणि दुसरी सुनावणी ... Read More »

सभापतीपद नको, मुख्यमंत्री होण्याची इच्छा!

>> मायकल लोबो यांचे वक्तव्य गोव्याचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण, भाजपने अजूनपर्यंत संधी दिलेली नाही. सभापती होण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट मत हंगामी सभापती मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केले. भाजपने आपणाला सभापतीपदाची ऑफर दिली आहे. परंतु, आपणाला सभापतीपद नको आहे. आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण, भाजपने या इच्छेची पूर्तता केलेली नाही. भाजपकडून इच्छेची पूर्तता कधी ... Read More »

किनारी विभाग प्राधिकरणाला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका

>> आदेश न पाळल्याने १ कोटी दंड गोव्यातील कासव संवर्धन केंद्रातील बेकायदा तात्पुरत्या बांधकामावर कारवाई करण्याच्या आदेशाचे पालन न केल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला १ कोटीचा दंड ठोठावला आहे. पर्यावरण नुकसान भरपाईपोटी हा दंड ठोठावण्यात आला असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एका आठवड्यात दंडाची रक्कम भरण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने नोव्हेंबर २०१७ मध्ये गोवा ... Read More »

थिवीतील पती – पत्नी दिल्लीत अपघातात ठार

माडेल, थिवी येथे राहणारे साबांखाचे निवृत्त अभियंते कुरियाकोस टी. झेव्हियर व त्यांची पत्नी सुमा यांचे काल सकाळी दिल्ली येथे रस्ता अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून आमला या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. कुरियाकोस बायको, मुली व नातीसह दिल्ली येथील नातेवाइकांकडे सहा दिवसांपूर्वी फिरायला गेले होते. काल सकाळी ते फा. अनीश यांची ... Read More »

स्मार्ट सिटीचे काम महापौरांनी बंद पाडले

महापौर उदय मडकईकर यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत कांपाल येथे बालभवनाच्या समोरील पदपथावर पदपथ खोदून केबल घालण्याचे काम काल सकाळी बंद पाडले. दरम्यान, महापौर मडकईकर आणि काही नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांना घेराव घालून पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने मनपा क्षेत्रात सुरू असलेली सर्व कामे बंद करण्याची मागणी केली. महानगरपालिका क्षेत्रात ३० एप्रिलनंतर कोणतेही काम न करण्याची सूचना करण्यात आली होती. तथापि, कांपाल येथे पदपथ ... Read More »

मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल

>> सुपर ओव्हर’मध्ये सनरायझर्स हैदराबादवर केली मात थरारक लढतीत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ‘सुपर ओव्हर’मध्ये काल गुरुवारी पराभव केला. या विजयासह मुंबईने इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील ‘प्ले ऑफ’मध्ये पात्रता मिळविली. चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्सनंतर प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा मुंबई हा तिसरा संघ ठरला. विजयासाठी मुंबईने हैदराबादसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी सात धावांची आवश्यकता ... Read More »

गोव्याच्या डेसी, कॅरनची निवड

>> अंडर १७ मुलींचे फुटबॉल प्रशिक्षण शिबिर ज्युनियर मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या समाप्तीनंतर निवड समितीच्या बैठकीत ३४ प्रमुख खेळाडूंची व १३ राखिव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारताच्या सीनियर महिला संघाच्या प्रशिक्षक मायमोल रॉकी, साहाय्यक प्रशिक्षक चौबा देवी व आलेक्स अँब्रोज यांनी खेळाडूंची निवड केली. या संघात डेसी क्रास्टो, कॅरन इस्रोसियो यांच्या रुपात दोन गोमंतकीय आहेत. भारतात पुढील वर्षी ... Read More »