Daily Archives: May 2, 2019

गडचिरोलीचे शहीद

कालच्या महाराष्ट्र दिनी त्या राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सोळा जवान शहीद झाले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगढच्या दांतेवाडात भाजपचे आमदार भीमा मंडावी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला चढवून नक्षलवाद्यांनी त्यांचा बळी घेतला होता. वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवादी अशा प्रकारे अधूनमधून डोके वर काढून आपले अस्तित्व दाखवून देत असतात. देशाच्या बर्‍याच भागांतून नक्षल्यांचे उच्चाटन जरी झालेले असले, तरी अजूनही ही कीड संपलेली ... Read More »

पाकिस्तानला व्यापारी दणका

शैलेंद्र देवळणकर भारत -पाकिस्तान व्यापारासंदर्भात अलीकडेच अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेत पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट ङ्गेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेण्यात आला. आता जम्मू आणि काश्मिरच्या उरी आणि पूंछमधील नियंत्रण रेषेवरून होणारा व्यापार बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानची आर्थिक आणि व्यापारी कोंडी होणार आहे. भारत -पाकिस्तान व्यापारासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण ... Read More »

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी

भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कूटनीतीला एका दशकानंतर यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) काल दि. १ मे रोजी मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील निर्णयाचे स्वागत केले असून भारताच्या १२५ कोटी ... Read More »

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १६ जवान शहीद

गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी काल बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या नक्षली हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलींचा हिंसाचार खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना वंदन करतो. त्यांचे बलिदान ... Read More »

भाजप – बाबुश यांचे ‘सेटिंग’चे राजकारण!

>> सुभाष वेलिंगकर यांचा आरोप पणजी मतदारसंघात भाजपने गेली कित्येक वर्षे कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांच्याशी सेटिंगचे राजकारण केले. हे सेटिंगचे राजकारण बंद करण्यासाठी मतदारांनी गोवा सुरक्षा मंचाला साथ द्यावी, असे आवाहन वेलिंगकर यांनी काल केले. गोवा सुरक्षा मंचाच्या पणजी मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते. या सेटिंगच्या राजकारणामुळे पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार उभा केला नाही. ताळगाव ... Read More »

पणजी पोटनिवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती

भाजपने येत्या १९ मे रोजी होणार्‍या पणजी पोट निवडणुकीसाठी खास रणनीती तयार केली आहे. भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी यांना प्रचार कार्यासाठी मतदान केंद्रांची जबाबदारी देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी घेण्यात आलेल्या खास बैठकीत पोट निवडणुकीच्या खास रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पणजी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या विजयासाठी भाजपची पूर्ण ताकद उभी करण्याचा ... Read More »

मतमोजणीपूर्वी सभापती निवडीस कॉंग्रेसची हरकत

सभापतीची निवड करण्यासाठी गोवा सरकार येत्या २० मे रोजी गोवा विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलावू पाहत असल्याची माहिती आम्हांला मिळाली आहे. मात्र, चार विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होण्यापूर्वी हे अधिवेशन भरवण्यास कॉंग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. ... Read More »

पर्यावरणाचा समतोल राखून खाण उद्योग सुरू करा

>> राज्यातील कामगार संघटनांची जाहीर सभेत मागणी गोवा खाण महामंडळाची स्थापना आणि पर्यावरणाचा समतोल राखून राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा. कामगार कायद्यात बदल करू नये, अशा मागण्या राज्यस्तरीय कामगार दिन कार्यक्रमात काल करण्यात आल्या. आयटक आणि सीटू या कामगार संघटनांनी कामगार दिनानिमित्त शहरातून भव्य रॅली काढली. कदंब बसस्थानकाजवळील क्रांती सर्कलजवळून रॅलीला सुरुवात करण्यात आली. येथील ... Read More »

कॅपिटल्सचा ९९ धावांत खुर्दा

>> दिल्लीवरील विशाल विजयासह चेन्नई पुन्हा टॉपवर कर्णधार धोनीची अष्टपैलू कामगिरी व फिरकीपटूंच्या भेदक मार्‍याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला ८० धावांनी लोळवून गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील ५०व्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७९ धावा उभारून दिल्लीचा डाव ९९ धावांत गुंडाळला. १८० धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली. दिल्लीचा सलामीवीर ... Read More »

धेंपो-साळगावकर लढत गोलबरोबरीत

>> गोवा प्रो-लीग फुटबॉल धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने पिछाडीवरून दमदार उभारी मारताना दुसर्‍या सत्रात दोन गोल नांेंदवित साळगावकर फुटबॉल क्लबविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत सोडवित गुण विभागून घेतले. बरोबरीमुळे धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचे २० सामन्यांतून ४८ गुण झाले ते गोलफरकाच्या आधारे अव्वल स्थानी पोहोचले आहेत. गोवन एफसी संघाचेही ४८ गुण झालेले असून ते दुसर्‍या स्थानी आहेत. परंतु त्यांनी धेंपोपेक्षा एक सामना कमी ... Read More »