Monthly Archives: April 2019

श्रीलंकेतील आठ बॉम्बस्फोटांत २१५ ठार

श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरात काल सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत विविध ठिकाणच्या चर्च व चार पंचतारांकीत हॉटेल्समध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेत २१५ जण ठार व ४५० हून अधिक नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये ३५ विदेशी नागरिक असून त्यात तीन भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. जगभरात काल ईस्टर संडे साजरा होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या हल्ल्यांमुळे संपूर्ण जग हादरले असून याप्रकरणी ७ जणांना ताब्यात ... Read More »

यावेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार : श्रीपाद नाईक

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचा आपण विकास साधला असून विकासकामे करीत असल्यानेच मतदारांनी आतापर्यंत आपणाला चारवेळा निवडून आणले, असे उत्तर गोवा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार श्रीपाद नाईक यानी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची काल सांगता झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधी कॉंग्रेस पक्षाने आपण निष्क्रिय खासदार असल्याचा ... Read More »

कॉंग्रेसचाही विजयाचा दावा

लोकसभा आणि तीन विधानसभांच्या पोट निवडणूक प्रचाराला कॉंग्रेस पक्षाला मतदारांकडून भरघोस प्रतिसाद लाभला असून कॉंग्रेस लोकसभेच्या दोन्ही आणि विधानसभेच्या तिन्ही जागा जिंकणार आहे, असा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष तथा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल व्यक्त केला. राज्यात निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मतदार भाजप आघाडी सरकारबाबत असलेला असंतोष व्यक्त करीत होते. मतदार आगामी निवडणुकीत ... Read More »

जाहीर प्रचार थांबला : पोलीस बंदोबस्तात वाढ

२३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या तीन पोट निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता रविवारी संध्याकाळी ५ वाजता झाली असून उमेदवारांचा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला जाहीर प्रचार थांबला आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलीस व अबकारी खात्याच्या गस्ती पथकांनी तपासणीला सुरुवात केली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल (आयएएस) ... Read More »

केंद्रात येणार बिगर भाजप सरकार : आनंद शर्मा

भाजपला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात अपयश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्या आश्‍वासनाबाबत तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत. आता, पुन्हा एकदा नवीन आश्‍वासनांची खैरात करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपच्या खोट्या व दिशाभूल करणार्‍या प्रचाराला मतदार बळी पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित आहे. केंद्रात बिगर भाजप सरकार स्थापन होणार आहे, असा ... Read More »

सनरायझर्सकडून केकेआरचा ९ गड्यांनी पराभव

>> खलिलचा भेदक मारा >> वॉर्नर- बॅअरस्टोव जोडी चमकली डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोव यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर काल रविवारी एकतर्फी मात केली. हैदराबादने विजयासाठी ठेवलेले १६० धावांचे लक्ष्य हैदराबादने १५ षटकांत केवळ १ गडी गमावून गाठले. या विजयासह हैदराबादने प्ले ऑफच्या शर्यतीतीत आपले आव्हान कायम राखले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ... Read More »

बंगलोरचा चेन्नईवर एका धावेने विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने काल रविवारी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या पर्वातील ३९व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा एका धावेने पराभव केला. बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६१ धावा फलकावर लगावल्यानंतर चेन्नईचा डाव १६० धावांत रोखला. धोनीने विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु शेवटच्या चेंडूवर आवश्यक दोन धावा चेन्नईचा संघ करू शकला नाही. ४८ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह धोनीने नाबाद ८४ धावा ... Read More »

चुरशीची लढाई

 प्रमोद ठाकूर राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे लोकसभा आणि तीन विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांत भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकासुद्धा भाजप, कॉंग्रेस आणि मगोप यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत. राज्यातील दोन लोकसभा मतदारसंघ आणि तीन विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचार शेवटच्या ... Read More »

फसण्याच्या तर्‍हा

दत्ताराम प्रभू साळगावकर मोजायला पैसे काढले तर त्यापैकी पाचशेची नोट ही पाचशे नोटीची झेरॉक्स कॉपी होती. कातरवेळच्या मंद उजेडात तिला ती समजलीही नाही. केळी गेलीच, उरलेले चारशे रुपये दिले ते गेलेच! दिवसाची सारी कमाई गेली व पाचशेची झेरॉक्स नोट हाती राहिली. आपण सर्व म्हणजेच प्रत्येकजण कधीतरी, कुठेतरी फसत असतो किंवा फसवले जात असतो. कोणाला या म्हणण्यात अतिशयोक्ती वाटेल, परंतु थोडा ... Read More »

चला सहलीला…

पौर्णिमा केरकर आज पर्यटनासाठी जगाच्या कोठल्याही कोपर्‍यात माणसे पोहोचू शकतात. काही जणांना परदेश वार्‍या, अनेकांना समुद्रकिनारे भुरळ घालतात तर अलीकडे तरुणाई गड, किल्ले, दुर्ग, पर्वतरांगा अशा खडतर प्रवासाची स्वप्नं पाहतात. कोणी मोटरसायकल, तर कोणी सायकलची सोबत घेऊन स्वैर भटकंतीसाठी रवाना होतात. ही भटकंती आनंददायी आहे. जग एवढे वैविध्यपूर्णतेने भरलेले आहे की ते अनुभवण्यासाठी माणसाने कितीही जन्म घेतले तरीसुद्धा ते अपुरेच ... Read More »