Monthly Archives: April 2019

बजरंग पुनियाला सुवर्णपदक

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने चीनच्या शियानमध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आकर्षक कामगिरी करीत सुवर्णपदक प्राप्त केले. त्याचे हे आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे सुवर्णपद होय. अंतिम लढतीत कझाखस्तानच्या सायतबेक ओकासोव्ह याला १२-७ अशा फरकाने पराभूत करत ६५ किलो वजनी गटात पुनियाने ही सुवर्ण कामगिरी केली. अंतिम लढतीत एकवेळ बजरंग प्रारंभी २-७ अशा पिछाडीवर पडला होता होता. परंतु ... Read More »

चला, मतदान करूया!

गोव्यासह तेरा राज्ये आणि दोन संघप्रदेशांत मिळून लोकसभेच्या ११५ मतदारसंघांमध्ये आणि गोव्यात तीन विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये कमी उत्साह असतो, परंतु लोकसभेची निवडणूकही विधानसभेइतकीच महत्त्वाची आहे, कारण ती देशाचे भवितव्य घडवीत असते. आपला देश पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हाती सोपवला जाणार आहे, त्याचा निर्णय लोकसभेची ही निवडणूक करीत असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ... Read More »

भारतीय लोकशाही आणि घराणेशाही

देवेश कु. कडकडे कोणताही पक्ष मोठा होतो तो कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर; परंतु जेव्हा सत्तेची गोड फळे चाखायची पाळी येते, तेव्हा घराण्याच्या वारसदारांची निवड होते. सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षापुरता मर्यादित राहतो. आज अनेक पक्ष अशा घराणेशाहीच्या दावणीला बांधले गेले आहेत… आजचा राज्यकर्ता हा एखाद्या घराण्यातूनच निवडला जात नाही तर देशातील प्रत्येक मतदाराने केलेल्या मतदानाच्या माध्यमातून निवडला जातो. देशात प्रत्येक नागरिक, मग तो ... Read More »

आज गोव्यात मतदान

>> लोकसभेसह पोटनिवडणुकांसाठी राज्यातील दोन लोकसभा आणि विधानसभेच्या तीन पोट निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून आज दि. २३ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ यावेळेत मतदान घेण्यात येणार असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लोकसभेच्या १२ आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीतील १६ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय मतदार घेणार आहेत. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात प्रमुख लढत होत आहे. ... Read More »

मतदानाची टक्केवारी वाढणार

>> मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची माहिती लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी निश्‍चित वाढणार आहे. साधारण ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी काल दिली. लोकसभेच्या वर्ष २००९ च्या निवडणुकीत ५५.२७ टक्के मतदान झाले होते. तर, वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७६.८६ टक्के मतदान झाले होते. ... Read More »

न्यायालयाकडून सरकारसह निवडणूक आयोगालाही नोटीस

>> मगो आमदार विलीनीकरण मगो पक्षाच्या दोन आमदारांच्या भाजपमध्ये विलीनीकरणप्रकरणी गोवा विधानसभेच्या सभापतींनी २७ मार्च रोजी दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्यात आले. ही आव्हान याचिका ऍड. सदानंद वायंगणकर यांनी दाखल केली असून या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीनंतर खंडपीठाने सभापती, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर, राज्य सरकार, निवडणूक आयोग व इतरांना नोटीस जारी केली असून ... Read More »

कॅपिटल्सचा ‘रॉयल’ विजय

शिखर धवन व पृथ्वी शॉ यांच्या भक्कम सलामीनंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने काल सोमवारी यजमान राजस्थान रॉयल्सचा ६ गडी व ४ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ४०वा सामना सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळविण्यात आले. राजस्थानने विजयासाठी ठेवलेले १९२ धावांचे विशाल लक्ष्य दिल्लीने १९.२ षटकांत गाठले. पराभवामुळे राजस्थानच्या अजिंक्य रहाणेने ठोकलेले ... Read More »

डॅझलिंग बॉईज, रौनक क्रिकेटर्स उपांत्यपूर्व फेरीत

म्हापसाच्या डॅझलिंग बॉईज आणि रौनक क्रिकेटर्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत बाबू ब्रदर्स क्रिकेटर्सतर्फे माजी रणजीपटू राजेश घोडगे यांच्या स्मरणार्थ आयोजित ९व्या बाबू ब्रदर्स लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कुडचडे येथील सागच्या क्रीडा संकुल मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेतील कालच्या पहिल्या सामन्यात डॅझलिंग बॉईज संघाने एसके वॉरियर्सचा ९५ धावांनी पराभव केला. तर दुसर्‍या लढतीत रौनक क्रिकेटर्सने मंगलमूर्ती ... Read More »

श्रीलंकेतील मृत्युतांडव

श्रीलंकेमध्ये काल ईस्टर संडेला दहशतवाद्यांनी घडवून आणलेले मृत्यूचे तांडव भयावह आहे. एका परीने ही भारताच्याच उंबरठ्यावर दिली गेलेली दस्तक आहे. जगाचा कोणताही कोपरा आज दहशतवादापासून सुरक्षित नाही हेच श्रीलंकेतील या भीषण बॉम्बस्फोट मालिकेने जगाला दाखवून दिले आहे. खरे म्हणजे तब्बल तीस वर्षे धुमाकूळ घालणार्‍या लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलमसारख्या जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवादी संघटनेचा समूळ निःपात करण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीलंकेमध्ये ... Read More »

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

ल. त्र्यं. जोशी सर्वोच्च न्यायालयाने जाणीव करुन दिल्यानंतर का होईना पण निर्वाचन आयोग उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा नेत्या मायावती, सपा नेते आजमखान प्रभृतींवर प्रचारबंदी लागू करु शकले. अशा आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करणे हा त्याचा अधिक्षेप करण्याचाच प्रकार ठरतो. याचा अर्थ आपला आयोग परिपूर्ण आहे, त्यात कोणत्याही त्रुटी नाहीत असा मात्र नाही. सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या दोन फेर्‍या आटोपल्या आहेत आणि ... Read More »