Monthly Archives: April 2019

पणजीसाठी सुभाष वेलिंगकर गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार

गोवा सुरक्षा मंचने सुभाष वेलिंगकर यांची पणजी पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार म्हणून निवड जाहीर केली. वेलिंगकर आज आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. काल पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत मंचचे ज्येष्ठ नेते अरविंद भाटीकर यांनी सुभाष वेलिंगकर यांच्या नावाची घोषणा केली. वेलिंगकर यांची पक्षाने एकमताने निवड केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आयाराम गयारामांचा पराभव करून तत्त्वांचे राजकारण पुढे नेण्यासाठी सुभाष वेलिंगकर ... Read More »

निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी कर्मचार्‍यांना कामाचा आदेश

>> मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन ः ‘आप’चा दावा राज्यात दोन लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी दि. २३ रोजी ड्युटीवर असलेल्या व सलग सुमारे ३० तास काम केलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना २४ रोजी सुटी न देता कामावर रुजू होण्याचा जो आदेश काढण्यात आला त्याबाबत राज्यातील मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी खुलासा करावा, अशी मागणी काल आम आदमी पार्टीने केली. यासंबंधी माहिती देताना ... Read More »

गायक दलेर मेहंदी भाजपमध्ये दाखल

सुप्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी काल केंद्रीय मंत्री विजय गोयल व दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे लोकसभा उमेदवार तथा सुफी गायक हंसराज हंस व केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन हेही यावेळी उपस्थित होते. हंस यांच्या मुलाशी मेहंदी यांच्या मुलीचा विवाह झाला आहे. Read More »

बलात्कारप्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी जाहीर

>> ३० रोजी शिक्षा सुनावणार विविध आरोपांखाली सध्या तुरुंगात असलेल्या आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याला काल येथील सत्र न्यायालयाने बलात्कारप्रकरणी दोषी असल्याचा निवाडा दिला. त्याला दि. ३० एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. एका भाविक महिलेने नारायण साई याच्याविरुद्ध २०१३ साली बलात्काराची तक्रार दाखल केली होती. सूरत पोलिसांनी आरोपींवर २०१४ साली ११०० पानांचे आरोपपत्र सादर केले होते. ४७ ... Read More »

पुन्हा मोदी सरकारसाठी लोकांची तयारी

>> वाराणसीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा दावा केंद्रात पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आणण्याचा निर्धार केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेच्या वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भाजपसह एनडीएच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत येथील निवडणूक अधिकार्‍यांसमोर सादर केला. भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, विदेश मंत्री सुषमा स्वराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य नाथ, बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार, केंद्रीय ... Read More »

मुंबई इंडियन्सने चेन्नईला नमविले

कर्णधार रोहित शर्माचे दमदार अर्धशतक आणि मलिंगासह इतर गोलंदाजांच्या सूत्रबद्ध मार्‍याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला ४६ धावांनी पराभूत करीत आयपीएलच्या १२व्या पर्वात आपल्या ७व्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे मुंबईने ११ सामन्यांतून १४ गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे. मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज संघ पूर्णपणे ढेपाळला. ... Read More »

वुमन्स टी-२० चॅलेंज स्पर्धेचे संघ घोषित

>> स्मृती, हरमनप्रीत, मितालीकडे नेतृत्व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या धर्तीवर भारतात एका छोटेखानी ‘वुमन्स टी-२० चॅलेेंेज’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ६ ते ११ मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी हे ३ संघ एकमेकांशी लढणार आहे. स्ममृती मंधाना (ट्रेलब्लेझर्स), हरमनप्रीत कौर (सुपरनोव्हाज) आणि मिताली राज (व्हेलॉसिटी) या तिघी संघाचे नेतृत्व ... Read More »

अध्ययनात ‘चेतक’ महत्त्वाचा

प्रदीप मसुरकर एखादे शैक्षणिक साधन चांगले कुतूहल निर्माण करणारे असेल तर आपोआपच ते अगदी चुंबकाप्रमाणे मुलाचे लक्ष वेधून घेते. आवड व कुतूहल या दोन्हींच्या बेरजेतून सहभाग वाढीस लागतो. मूल प्रतिसाद देऊ लागते. उत्तर देण्यास किंवा प्रश्‍न विचारण्यास सुरुवात करते. ते एखादी कृती स्वतः करून पाहण्यास धडपडते. त्याद्वारे शिक्षकाच्या अध्यापन क्रियेत सहभागी होते. ‘‘किती जीव तोडून, ओरडून शिकवलं तरीही मुले शिकत ... Read More »

दादर ः मध्यमवर्गीयांचे आश्रयस्थान

 शरच्चंद्र देशप्रभू चाळकरी आता चाळीत फक्त शरीराने राहत असल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरील भाव व देहबोलीतून दिसत आहे. मन अन्य निवास प्राकाराकडे ओढ घेत असल्याचे स्पष्ट जाणवते. तसा हा चाळसंस्कृती ते टोलेजंग टॉवर प्रवास कष्टाचा अन् वेदनादायक. परंतु स्थित्यंतर झाल्यावर चाळसंस्कृतीची नामोनिशाणी राहत नाही. मागच्या आठवड्यात दादरला तीन-चार दिवस मुक्काम करण्याचा योग आला. गिरगाव व दादर म्हणजे मुंबईतील मध्यमवर्गीयांचे आश्रयस्थान. चाळसंस्कृती इथेच ... Read More »

‘राज’कीय वादळ!

महाराष्ट्रात सध्या एक मोठे राजकीय वादळ घोंगावते आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे करीत सध्या ते मुंबईत आणि तेथून नवी मुंबईत पोहोचले आहे. हे वादळ आहे राज ठाकरे यांच्या सभांनी निर्माण केलेले. त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उभा नाही, परंतु तरीही केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करीत राज ठाकरे यांच्या ह्या सभा ... Read More »