Monthly Archives: April 2019

नकारात्मक

आश्वासने देणे आणि ती पाळणे यामध्ये जमीन आणि अस्मानाएवढेे अंतर असते. आश्वासने देणार्‍याने आपल्याला ती पाळता येतील की नाही याची खातरजमा करणे खरे तर अपेक्षित असते. कॉंग्रेसने नुकताच आपला जो भव्य दिव्य निवडणूक जाहीरनामा जारी केला आहे, त्यामध्ये आश्वासने उदंड आहेत, परंतु ती व्यवहार्य ठरतील की नाही याचा विचार मात्र गांभीर्याने झाला असावा असे वाटत नाही. कॉंग्रेसने या लोकसभा निवडणुकीसाठी ... Read More »

पाणीयुद्धाच्या दिशेने…

शैलेंद्र देवळणकर हवामान बदल, पर्यावरणाचा र्‍हास, वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा बेसुमार वापर यांमुळे आगामी काळात जगाला विशेषतः आशिया खंडाला प्रचंड मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याच्या शक्यता विविध आंतरराष्ट्रीय संघटनांच्या अहवालातून व्यक्त करण्यात येत आहेत. चीनला याची चाहूल ङ्गार पूर्वीच लागली असून या देशाने ब्रह्मपुत्रा, सिंधु, सतलज, कोझी या नद्यांवर प्रचंड मोठ्या आकाराची धरणे बांधण्याचा सपाटा लावला आहे. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय ... Read More »

लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा जिंकू

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मडगाव पत्रपरिषदेत व्यक्त केला विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे उद्दिष्ट साध्य केले. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारली. ही लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या दोन्ही तसेच तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मडगाव येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार ... Read More »

लोकसभा, विधानसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज सादर करण्याचा आज अंतिम दिवस

>> उद्या छाननी, अर्ज मागे घेण्याची तारीख ८ एप्रिल लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गुरुवार ४ एप्रिल ही अंतिम तारीख आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ४ रोजी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी काल दिली. गेल्या २८ मार्चपासून लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ ... Read More »

खासदारकीच्या कारकीर्दीत उत्तर गोव्याचा सर्वांगीण विकास

>> श्रीपाद नाईक यांचा पत्रकार परिषदेत दावा आतापर्यंतच्या चार वेळेच्या आपल्या खासदारकीच्या कारकीर्दीत उत्तर गोव्यात १ हजार विकास प्रकल्प पूर्ण केले आहे. त्यामुळे उत्तर गोवा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्याचे श्रीपाद नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. काल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाईक यांनी आपण केलेल्या विकासकामांचा अहवाल पत्रकारांसमोर ठेवला. २०१४ ते २०१९ या काळात ३२२ प्रकल्प प्रस्तावित ... Read More »

मगो निवडणुकीत उतरला नसल्याने आपले नुकसान नाही ः श्रीपाद नाईक

मगो पक्ष आता भाजप आघाडी सरकार बरोबर नसला तरी लोकसभा निवडणुकीत आपणाला कोणतेही नुकसान होणार नसल्याचे श्रीपाद नाईक यांनी काल पत्रकार परिषदेतून बोलताना स्पष्ट केले. जर मगो पक्ष निवडणूक रिंगणात उतरला असता, तर त्याचा थोडासा फटका आपणाला बसला असता, असे नाईक यांनी यावेळी मान्य केले. सुधीर कांदोळकर यांच्यामुळे म्हापसा मतदारसंघात भाजपला थोडीशी मते गमवावी लागतील याचीही कबुली त्यांनी प्रांजळपणे दिली. ... Read More »

बांबोळीत १० रोजी नरेंद्र मोदींची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० एप्रिल रोजी पणजीत जाहीर सभा होणार असून ती दुपारच्या वेळी होणार असल्याने लोकांना रणरणत्या ऊन्हात बसावे लागू नये यासाठी आम्ही ही सभा बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. मोदी यांच्या या सभेला राज्यभरातून सुमारे ३० हजार ... Read More »

आयपीएल बेटिंग प्रकरणी दाबोळी-चिखलीत छापा

>> २९ लाख रोख व कागदपत्रे हस्तगत गोवा आयकर विभागामार्फत दाबोळी चिखळी येथील सरकारी उपजिल्हाधिकारी इस्पितळामागील एका बंगल्यात छापा मारून २८ लाख रुपये रोख माल तसेच काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. छापा मारण्याचे छत्र मंगळवार दि. २ एप्रिलपासून सुरू होते. ते बुधवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत सुरू होते. प्राप्त माहितीनुसार दाबोळी चिखली उपजिल्हा इस्पितळामागे एका मोठ्या बंगल्यात गोवा ... Read More »

मुंबईने रोखला चेन्नईचा विजयरथ

मुंबई इंडियन्सने काल बुधवारी वानखेडे स्टेडियमवर आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने चेन्नई सुुपर किंग्सचा विजयी घोडदौडीला ब्रेक लगावला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील या १५व्या सामन्यात मुंबईने ३७ धावांनी विजय संपादन केला. हार्दिक पंड्याची अष्टपैलू चमक तसेच जेसन बेहरेनडॉर्फ व मलिंगाच्या भेदक मार्‍यासमोर चेन्नईच्या संघाने गुडघे टेकले. विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य असताना चेन्नईला ८ बाद १३३ धावाच करता आल्या. विजयासाठी १७१ ... Read More »

स्टॅमिना स्पोर्ट्‌स क्लबला अजिंक्यपद

>> तिसवाडी ‘ब’ विभाग क्रिकेट रुपेश सर्वणकरचे शानदार अर्धशतक आणि महेश भाईडकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बेतीच्या स्टॅमिना स्पोर्ट्‌स क्लबने यंग स्टार्स ऑफ मौळाचा ५१ धावांनी पराभव करीत गोवा क्रिकेट संघटना आयोजित तिसवाडी ‘ब’ विभाग क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्टॅमिनाने ३८ षट्‌कांत ६ गडी गमावत २०७ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्या ... Read More »