Monthly Archives: April 2019

काऊंटीत खेळणार सात भारतीय खेळाडू

टीम इंडियाचे सात खेळाडू काऊंटी क्रिकेट खेळण्यास सज्ज झाले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीजशी दोन हात करण्यापूर्वी ‘ड्यूक्स’ चेंडूचा सराव करण्यासाठी कसोटी स्पेशलिस्ट खेळाडूंना काऊंटीत खेळण्याची परवानगी ‘बीसीसीआय’कडून देण्यात आली आहे. काऊंटीसाठी परवानगी देण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, मयंक अगरवाल, रविचंद्रन अश्‍विन व इशांत शर्मा यांचा समावेश आहे. पुजाराचा यॉर्कशायरशी ... Read More »

प्रवासी पक्षी

ताळगावचे बाहुबली नेते बाबूश मोन्सेर्रात यांना पणजी विधानसभा पोटनिवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे विद्यमान भाजप सरकारमध्ये सामील असलेल्या गोवा फॉरवर्डचे जोखड त्यांनी अलगद फेकून दिले आहे आणि बृहन्पणजी पीडीएच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. २०१५ साली त्यांची पक्षविरोधी कारवायांमुळे आपल्या पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करणार्‍या कॉंग्रेसने आता मात्र झाले गेले विसरून त्यांच्यासाठी पक्षाची दारे सताड उघडली आहेत. आपल्या पक्षातून एकामागून एक ... Read More »

बाबांनो, हे वागणे बरे नव्हे!

शंभू भाऊ बांदेकर निवडणूक आचारसंहिता लागू असूनही अनेक पक्षांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध आक्षेपार्ह विधाने करीत असल्याचे, हीन शेरेबाजी करीत असल्याचे दिसते. बाबांनो, बायांनो हे वागणे बरे नव्हे, असे त्यांना आवर्जून सांगण्यापलीकडे आम्ही मतदार तरी दुसरे काय करू शकतो? देशभरातील लोकसभेच्या आणि काही राज्यांतील विधानसभा, पोटनिवडणुका आदिंचा कार्यक्रम एकूण सहा टप्प्यांमध्ये पूर्ण होणार असून यातील दोन टप्पे पूर्ण होत आले आहेत. निवडणूक ... Read More »

शाश्‍वत खाण व्यवसायाचे कॉंग्रेस पक्षाकडून आश्‍वासन

>> जाहीरनाम्यात स्थानिक मुद्यांवर भर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक मुद्यांचा समावेश असलेला जाहीरनामा काल प्रसिद्ध केला. शाश्‍वत खाण व्यवसाय, पर्यटन विकास बँक, नद्यांचे राष्ट्रीयीकरण रद्द आदी आश्‍वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. राज्यातील बंद पडलेल्या खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. खाण बंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेले कामगार, उद्योजक यांना साहाय्य केले जाणार आहे. सीआरझेड, पर्यटन ... Read More »

सरकारमधील घटक पक्षांचा भाजपला पाठिंबा : मुख्यमंत्री

भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्ष गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांचा भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एनडीएच्या पत्रकार परिषदेत बोलताना काल केला. यावेळी महसूल मंत्री रोहन खंवटे, आरडीए मंत्री जयेश साळगावकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची उपस्थिती होती. कॉँग्रेस पक्षाला पराभव दिसू लागल्याने वैफल्यग्रस्त बनली आहे. कॉंग्रेस पक्ष गोव्याच्या बाबतीत गंभीर ... Read More »

नितीन गडकरींची भूमिका दुटप्पी

>> मगोकडून गडकरींच्या वक्तव्याचा निषेध केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मगोपचे नेते ढवळीकर बंधूंवर केलेली टीका अनाठायी आहे. गडकरी महाराष्ट्रातील प्रचार सभेत पक्ष बदलूंना धडा शिकवण्याचे आवाहन करतात. तर, गोव्यात पक्ष बदलू राजकारण्याला पाठिंबा देतात. त्यांची ही भूमिका दुटप्पी असल्याचे टीका मगो पक्षाचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी ‘मगो पक्षाला हद्दपार करा’ या केंद्रीय मंत्री ... Read More »

मोन्सेर्रात यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

माजी मंत्री बाबुश मोन्सेर्रात यांनी पणजी विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काल कॉंग्रेस पक्षात रीतसर प्रवेश करून अखेर घरवापसी केली. त्यांच्या प्रवेशाने आगामी निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या मताधिक्यात वाढ होण्यास मदत होणार आहे, असा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष तथा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मोन्सेर्रात यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी पणजी विधानसभा मतदारसंघात जोरदार ... Read More »

कॉंग्रेसच्या चार पिढ्यांनी देशाला लुटले : फडणवीस

गरिबी हटावच्या नावाखाली कॉंग्रेसच्या चार पिढ्यांनी देशाला लुटण्याचे काम केल्याने देशात गरिबी वाढतच गेली व असंख्य समस्या उभ्या राहिल्या. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊन अनेक योजनांद्वारे खर्‍या अर्थाने गरिबी हटाव मोहीम हाती घेतली. देशाची सुरक्षा व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी जनता पुन्हा एकदा देश मोदींच्या हाती सोपविण्यासाठी सज्ज झाली आहे, असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल साखळी ... Read More »

मुंबईकडून दिल्लीचा ४० धावांनी फडशा

>> पंड्या बंधूंची अष्टपैलू कामगिरी ठरली ‘टर्निंग पॉईंट’ इंडियन प्रीमयर लीग स्पर्धेतील काल गुरुवारी झालेल्या ३४व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ४० धावांनी फडशा पाडला. विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य असताना दिल्लीचा संघ ९ बाद १२८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. या विजयासह मुंबईने वानखेडेवर दिल्लीकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला. मुंबईप्रमाणेच दिल्लीच्या डावाची सुरुवात चांगली झाली. शॉ व धवन यांनी आक्रमकता व बचाव ... Read More »

श्रीलंका संघात घाऊक बदल

>> विश्‍वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने काल गुरुवारी विश्‍वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. मंडळाने काही कठोर पावले उचलताना सातत्याने टुकार कामगिरी केलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात निरोशन डिकवेला, दनुष्का गुणथिलका, दिनेश चंदीमल, उपुल थरंगा व अकिला धनंजया यांचा समावेश आहे. फलंदाजीसह डाव्या हाताने संथगती गोलंदाजी करणारा मिलिंदा सिरीवर्धने, लेगस्पिन गोलंदाजी करणारा अष्टपैलू जीवन मेंडीस ... Read More »