Monthly Archives: April 2019

मतिमंद मुलांची शाळा ः ‘दिलासा’

अनुराधा गानू (आल्त सांताक्रूझ, बांबोळी) त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित व्हावी यासाठी काही उपक्रम राबवले जातात. त्यांना योगासनं शिकवली जातात. नृत्यकला शिकवतात. म्युझिक थेरपीचाही उपयोग केला जातो. आपल्या देशात प्राचीन काळापासून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले असा कंठशोष करणार्‍यांना उत्तर म्हणजे वैदिक वाङ्‌मय आणि इतिहासात गौरवपूर्ण उल्लेख असलेल्या लोपामुद्रा, विश्‍ववारा, अदिती, श्रद्धा, यमी, गौतमी, गार्गी, सरमा या विदुषी होत. यांनी ... Read More »

बहिष्कार घालू नका!

काणकोण तालुक्यातील मार्ली – तिरवाळ ह्या ग्रामीण वस्तीवरील नागरिकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्याची माहिती मिळताच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. कुणाल यांनी सहकार्‍यांसह तेथे जाऊन त्या ग्रामस्थांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला हे प्रशंसनीय आहे. निवडणूक अधिकार्‍यांच्या विनंतीचा मान राखून मार्लीचे ग्रामस्थ येत्या निवडणुकीत मतदानात सहभाग घेतील अशी आशा आहे. मार्लीचे हे ग्रामस्थ आपल्या वस्तीकडे येणारा रस्ता ... Read More »

नक्षली – जिहादी अभद्र सांगडीचा ओनामा?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) दंतेवाडामधील नक्षली हल्ला हा केवळ एका आमदाराचा मृत्यू झाला म्हणून महत्त्वाचा नाही; तर नक्षल्यांच्या पोस्टर्सवर जम्मू काश्मिर लिबरेशन ङ्ग्रंट आणि त्याचा प्रमुख यासिन मलिकच्या पहिल्यांदाच आलेल्या नावामुळे नक्षली-जिहादी अभद्र सांगडीचा ओनामा तर झाला नाही ना अशी कोणाला शंका आल्यास ती रास्तच असेल. काही दिवसांपूर्वीच नक्षल्यांनी छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात एका आयईडी स्फोटात बस्तरचे भाजपा आमदार भीमा मंडावींच्या ... Read More »

जाहीर प्रचाराची उद्या सांगता

येत्या २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता रविवार २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार असून अंतिम टप्प्यात निवडणूक प्रचाराचा जोर वाढला आहे. अंतिम टप्प्यात प्रमुख राजकीय पक्षांनी शनिवारी अनेक ठिकाणी जाहीर प्रचार सभांचे आयोजन केले आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच दोन्ही जिल्ह्यात केंद्रीय राखील ... Read More »

करकरेबद्दल वक्तव्य; साध्वी प्रज्ञांची माफी

मुंबई एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अखेर काल संध्याकाळी आपले शब्द मागे घेतले. माझ्या वक्तव्यामुळे देशाच्या शत्रूंचा फायदा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेत असून त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करते. मात्र, ते माझे वैयक्तिक दु:ख आहे, असे साध्वी प्रज्ञा यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. Read More »

नाराज व्यापार्‍यांची मोदींकडून स्तुती

भाजपचा हक्काचा मतदार समजला जाणारा व्यापारी वर्ग नोटाबंदी, जीएसटीमुळे सध्या काहीसा नाराज असल्याने व्यापारी वर्गाला चुचकारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये व्यापार्‍यांच्या संमेलनात बोलताना मोदींनी व्यापार्‍यांवर स्तुतिसुमने उधळली. व्यापार्‍यांनी नेहमी देशाचाच विचार करत स्वत:ला झोकून दिले. जगाच्या कानाकोपर्‍यात व्यापार्‍यांनीच देशाच्या संस्कृतीचा प्रसार केला. त्यांच्या मेहनतीचा माझ्यावर प्रभार असल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका ... Read More »

मुलायमसिंह – मायावती २४ वर्षांनी एकाच व्यासपीठावर

गेल्या २४ वर्षांपासूनचे टोकाचे वैर विसरून समाजवादी पक्षाचे आधारस्तंभ मुलायमसिंह यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती काल मैनपुरी येथे एकाच व्यासपीठावर अवतरले. यावेळी बोलताना दोघांनीही एकमेकांचे भरभरून कौतुक केले. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील हा ऐतिहासिक क्षण ठरला. १९९५ मध्ये घडलेले ‘गेस्ट हाउस कांड’ हे सपा आणि बसपातील शत्रुत्वाचे प्रमुख कारण होते. मायावती यांनी त्या घटनेचा उल्लेख करतच आपल्या भाषणाला सुरुवात केली. ‘गेस्ट ... Read More »

संपादित जमिनीचे पैसे शिरोडकरांना देण्यास स्थगिती

माजी आमदार तथा भाजपचे शिरोडा मतदारसंघातील उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या वेदांत रियल इस्टेट डेव्हलपर्स या कंपनीला ९.२४ कोटी रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश निवडणूक आयोगाने काल दिला. राज्य सरकारने शिरोडकर यांची शिरोडा येथील जमीन संपादित केली आहे. सरकारी अधिकार्‍यांनी निवडणूक आचारसंहितेच्या काळात जमीन संपादनाबाबतच्या रक्कमेतील ९.२४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यासाठी प्रयत्न चालविले ... Read More »

कोळसा हाताळणी बंद खोलीत करण्याचा प्रस्ताव ः पंचायतमंत्री

मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीमुळे वास्को शहर व आसपासच्या गावात होत असलेल्या कोळसा प्रदूषणाची आम्हांलाही चिंता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ही कोळसा हाताळणी मुरगाव बंदरात एका घुमटीवजा बंद खोलीत करणे शक्य असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येणार असल्याचे पंचायतमंत्री व दाबोळी मतदारसंघाचे आमदार मॉविन गुदिन्हो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. काल मुरगावचे माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व ... Read More »

रॉयल चॅलेंजर्स काठावर पास !

>> कोलकाता नाईट रायडर्सचा १० धावांनी निसटता पराभव रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आंद्रे रसेल व नितीश राणा यांचा कडवा प्रतिकार मोडून काढत काल शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा ३५वा सामना ईडन गार्डन स्टेडियमवर खेळविण्यात आला. बंगलोरने विजयासाठी ठेवलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने ५ बाद २०३ धावांपर्यंत मजल मारली. विशाल लक्ष्याचा ... Read More »