Daily Archives: April 29, 2019

शनिवारच्या पावसानंतर राज्यात उकाडा वाढला

राज्यातील काही भागात शनिवारी रात्री पावसाचा शिडकावा झाल्यानंतर राज्यात उष्णतेच्या प्रमाणात आणखीन वाढ झाल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. येत्या दोन दिवसात राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. पावसाच्या शिडकाव काही भागात होऊ शकतो, असे हवामान विभागाने कळविले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील हवामानात बदल झाला आहे. हवामान विभागाने देशातील अनेक भागात पावसाची शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाने ... Read More »

पवनहंस हेलिकॉप्टर कंपनीही सापडली आर्थिक संकटात

>> कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत कगङ्गिशर आणि जेट एअरवेजनंतर आता पवनहंस ही हेलिकॉप्टर कंपनीही आर्थिक संकटात सापडली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून आता कंपनीकडे कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. सन २०१८-१९ मध्ये कंपनीला सुमारे ८९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्जही आहे. अशा परिस्थितीत कंपनीकडे एप्रिल महिन्याचे पगार देण्याचीही आर्थिक परिस्थिती नाही. सरकारने ... Read More »

ताळगाव ग्रामपंचायतीसाठी ७०.९० टक्के मतदान

>> २८ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद, आज मतमोजणी ताळगाव ग्रामपंचायतीच्या दहा प्रभागांसाठी काल घेण्यात आलेल्या निवडणुकीत ७०.९० टक्के मतदान झाले. मतदानाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार न घडला नाही. निवडणूक रिंगणातील २८ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत सीलबंद झाले आहे. मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता कांपाल येथील बालभवनाच्या आवारात केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तिसवाडीचे मामलेदार फ्रॅकलीन फेर्रांव यांनी दिली. ताळगाव ... Read More »

आरसीबीचा १६ धावांनी पराभव

>> तब्बल सात वर्षांनी दिल्ली ‘प्ले ऑफ’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर १६ धावांनी मात करुन दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमाच्या प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. काल मोसमातील ४६व्या सामन्यात दिल्लीने विजयासाठी दिलेले १८८ धावांचे आव्हान बंगलोरला पेलविले नाही. त्यांना केवळ १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह दिल्लीची तब्बल ७ वर्षांची प्रतीक्षा फळाला आली. २०१२ साली ‘दिल्ली’ फ्रेंचायझी ... Read More »

केंद्रीय विद्यालयाच्या स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंची चमक

>> राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी ७ खेळाडूंची निवड केंद्रीय विद्यालय संघटना मुंबईच्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंनी चमक दाखवली. केंद्रीय विद्यालय आयएनएस मांडवी येथे २६ ते २७ एप्रिल रोजी झालेल्या या स्पर्धेत गोव्याच्या ७ खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. भुवनेश्‍वर येथे राष्ट्रीय स्पर्धा होईल. स्पर्धेत गोव्यासह मुंबई, पुणे नाशिक, नागपूर, यवतमाळ येथील केंद्रीय विद्यालयाच्या खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत एकूण ७५ ... Read More »